पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मलबारी शेटजींचा उद्योग. 4\S त्यांचे परस्पर वादविवाद चालले असतां असा जरी भास होतो कीं, हे एकमेकांचे कट्टे दुष्मन आहेत, यांच्यांत कोणत्याही गोष्टींविषयीं मतैक्य नाहीं, तथापि तिन्ही वर्ग सुधारणाप्रिय आहेत, नवद्वेषी नाहीत, त्यांच्यांतील भिन्नभाव कायतो इष्टकार्य साधण्याच्या मार्गाबद्दलचा आहे. कांहीं वर्षापूर्वीचीं व हल्लींचीं वर्तमानपत्रे चाळून पाहिलीं तर ही गोष्ट आमच्या मतें स्पष्ट होईल कीं, सुधारणेला प्रतिकूल, निदान उघडपणें तरी तसे, असे लेखक हल्लीं फार कमी आढळतात. सुधारणेला प्रतिकूल असाही लेख लिहिणें असला तरी आरंभीं ‘सुधारणा आम्हास पाहिजे आहे' असे म्हणण्याचा परिपाठ पडत चालला आहे. यावरून हें स्पष्ट होतें कीं, सुधारकाच्या टकळीचा परिणाम लोकमतावर घडला यांत काहीं शंका नाहीं. दगडाला देखील टाकीचे घाव सोसायला लावले तर त्याच्या आगी देवकळा आणितां येते; तेव्हा समंजस माणसांच्या कानींकपाळी तेच तेच विचार सारखे ओरडत राहिले तर त्याचा कांहीच परिणाम कसा होऊ नये ? आतां पूर्वीप्रमाणे सुधारणा, सुधारक हे शब्द ऐकल्याबरोबर जुन्या माणसाचे पित्त खवळत नाहीं, किंवा पायाची आग मस्तकांत जाऊन भिडत नाहीं. कदाचित् जुन्याच्या अंगीं हा फरक दिसत आहे हा केवळ त्याच्या विचारात फरक झाल्यामुळेच असेल असें खात्रीने सागवत नाही. काहींना असेही वाटू लागलें असेल कीं हें कलिमाहात्म्य, हे असे प्रकार व्हावयाचेच, तेव्हां तुकोबाच्या सागीप्रमाणें ‘उगे रहावें, आणि जे जे होईल तें रो पहार्वे' असे असले तरी हल्ली सुधारणेविषयीं जिकडे तिकडे उत्सुकता-निदान बेोलण्यांत तरी-जारीनें दिसू लागली आहे, आणि आमच्यामतें ही जागृतावस्था येण्यास पुष्कळ अंशी मलबारी शेटजींचे पहिले लेख-ते अतिशयोक्तीनें भरले होते तरी-व त्यानंतर त्यानीं “सारा देशभर बीब करून सोरला? आणि कायद्यासाठी जे प्रचंड वावटळ उभारले-हीं कारणे झाली. काहींनीं पारशी आपल्या संसारांत ढवळाढवळ करूं पाहतो म्हणून रागावून, काहींनी आपण कांहींच करीत नाही आणि त्रयस्थलोक इतकी कळकळ दाखवितात हें लक्षात येतांच लाजून, काहींनी आपल्यास हा एक नवीन जोर मिळाला म्हणून उमेदीनें पुढे सरसावून,-तात्पर्य, कोणी या कोणी त्या कारणासाठी या सुधारणेच्या प्रश्नाचा विचार करण्याचें मनावर घेतले आणि त्या प्रयत्नाचा परिणामही लोकमतावर झाला; आणि याबद्दलचे श्रेय मलबारी शेटजींना आपण दिले पाहिजे. आमचे हे विचार आमच्या वाचकापैकीं कित्येकांना रुचणार नाहीत. त्यांस आमचे असे सांगणें आहे कीं, या गोष्टीचा त्यानीं आपल्या मनाशीं शांतपणें विचार करावा. मलबारी शेट पारशी खरे, त्यांनीं असल्या कामात पडावयाचे नव्हतें, निदान पहिला लेख लिहिण्यापूर्वी माहिती मिळवावयाची होती; पण झाली ती गोष्ट होऊन गेली, आतां काय त्याचे ? त्यांनी कोणत्याही वाईट हेतूनें हें केले नाहीं आणि शेवटीं परिणाम कांही वाईट झाला नाहीं; थोडी कडक शब्दाची लढाई झाली; पण अशा लढाईत कोणी जाया होत नाहीं. सामाजिक