पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/107

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ लो० टिळकांचे केसरींतील लेख प्रतिपादन झालेलेंही आहे. असे असताही मलबारी शेटजींनीं तिकडे लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड डफरिन यांची भेट घेऊन कमिटी नेमिली, अशी एखादी तार इकड येऊन पोहोंचली की कायदेवाल्या मंडळीत महानंद होऊन जिकडे तिकडे टिच्या बडविण्याचा मात्र ध्वनि ऐकू येतो; पण कायदा नको असे म्हणणाच्या लेखकांची व वाचकांची समजूत घालण्याचा प्रकार कोठे दिसून येत नाहीं याचे कारण काय असेल ते हरि जाणे ! सुधारणेच्या आचीनें ज्याचे अंग तापून गेले आहे त्यांनी एकदा लोकांपुढे येऊन जर एकदोन प्रश्नाचा उलगडा केला तर वर्तमानपत्रांमध्ये जो व्यर्थ हमरीतुमरीचा प्रकार चालतो तो बंद होणार नाहीं काय ?* शेषं कोपेन पूरयेत् ’ असेंच जर त्याचे व्रत असेल तर त्यांस आमचे कांहीं म्हणणें नाहीं; पण गरम सुधारकास जर आपली सुधारणाचमु वाढली जावी अशी इच्छा असेल, तर त्यांनी प्रथमत: अपशब्दाचा व अपसिद्धातांचा त्याग केला पाहिजे व युक्तीच्या वादानें लढाई केली पाहिजे. उगीच शिवया असमंजस पत्राचे अनुकरण करून आपला कंठशोष करावयाचा व त्याने जय मिळवावयाचा, असाच जर त्याचा इरादा असला तर त्यांनी अक्षरजननस खुशाल शिणवावें. पण असें करिताना त्यांनीं एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ज्याची वकिली पत्करून हा अट्टाहास आरंभिला आहे, त्याचे यत्किचित्ही कल्याण न होतां उलट त्यांची स्थिति दुर्धर मात्र होणार आहे. पहिला प्रश्न असा आहे की कायद्यानें १०। १२ वर्षेपर्यंत मुलीचे लग्न करूं नये असें ठरविले तर अपक्व युवायुवतीचा जो आता संगम घडतो तो बंद होईल काय ? हा प्रश्न आजचा आणि म्हणून नवीन आहे असे नाहीं १८८४ सालींच या प्रश्नाचा उद्भव झाला आहे व या प्रश्नास समाधानकारक असें उत्तर कायदेभक्ताकडून मिळाले आहे, अस आम्हांस वाटत नाहीं. मुलीच्या अठराव्या अगर निदान सोळाव्या वर्षी तिला अवयवपूर्णत्व प्राप्त होतें व ह्या सुमारास सशक्त गर्भ धारण करण्याची अवस्था नैसर्गिक नियमाअन्वये प्राप्त होते, तर ह्या वयाच्या सुमारासच-कधीही आधीं नाहीं-नवरानवरीची गाठ पडेल; आई, सासू., नणंदा, भावजया, जावा इत्यादिकाची वेडी माया नाहींशी होईल आणि रतियोग्य झाल्यानंतर त्या सुखाचा अनुभव दंपत्यें घेत राहातील असे परिणाम उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे हें कायदावश मंडळीनें आम्हास सागावें. पूर्वोक्त कायद्याच्या आटोक्यात न येणाच्या गोष्टी विद्येनेंच मात्र प्राप्त होणार, इतर मार्गानें नाही अशी आमची बालंबाल खातरी झालेली आहे ह्या असल्या मनोनिग्रहाची विद्या शिकविण्याचे कार्यही कायद्याकडेच जाणार आहे काय ? आणि मुलास आपल्या सतराव्या वर्षी व मुलीस तिच्या तेराव्या वर्षी आपआपले मनोविकार दमन करण्याचे सामथ्र्य कायद्यानें येणार आहे काय ? जॉपर्यंत आमचा शिमगा भर ज्वानींत आहे, जॉपर्यंत तमाशे, छकडी, गलिच्छ प्रहसने, रेनाल्डच्या कादंबया इत्यादि मदनज्वराची उपकरणें आप