पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/123

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० ८ ली० टिळकांचे केसरींतील लेख नाहीं. कोणतेही भिन्न भिन्न असे दोन समाज एकत्र आले असतां एकाचे आचारविचारांचा दुस-यावर साहजिक जो परिणाम घडतो तसा इंग्रजी विद्येचा व रीतीभातींचा आमच्यांपैकी शिकलेल्या लोकांच्या मनावर परिणाम घडत आहे. हा आपणांवर घडत असलेला परिणाम बंद पडावा अशी ज्यांची इच्छा असेल, त्यांनीं एक तर इंग्रज लोकांस येथून हाकून देण्याची तजवीज केली पाहिजे अगर आपण मेलों व जग बुडालें, या न्यायानें स्वत:चे चेबूगवाळे आटपून हिमालयाच्या अत्युच्च प्रदेशी की जेथे इंग्रजांच्या विमानांचे वारेदेखील लागणार नाहीं, अशा प्रदेशीं जाऊन राहिले पाहिजे. ही किंवा अशाच प्रकारची दुसरी काहीं तरी बिनतोड युक्ति काढल्याखेरीज पाश्चात्यविद्येने आपणांवर जे संस्कार घडत आहेत, ते नाहीसे करण्याची आशा राहिली नाहीं. सुदैवानें म्हणा अगर दुर्दैवानें म्हणा, हिंदुस्थान देश सर्व जगाच्या भाँवण्यात सापडून इतर देशांबरोबर त्यास आजमित्तीस फिरावें लागत आहे, व राष्ट्राच्या शर्यतीत आपलें पाऊल मार्गे न पडण्याची आपण उमेद बाळगिली व हिमतीने व धैर्यानें ती गोष्ट सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला तरच आपण आपलें कर्तव्य बजाविलेंसें होईल. इंग्रजी सरकारांनीं किंवा मलबारी शेटजींसारख्या परजातीयांनीं त्या कामीं पडून काहीं उपयोग होणार नाहीं, हें म्हणणें निराळे आणि आम्हांला मुळींच कांहीं हलावयास नको, आमची आहे तीच स्थिति चांगली आहे, हा पक्ष निराळा. आजचा आमचा लेख किंवा रा० वैद्य यांचे पुस्तक दुस-या पक्षास उद्देशून लिहिलेले नाही, हें उघड आहे. तथापि गैरसमज दूर होण्याकरितां या गोष्टीचा येथे उल्लेख करणे जरूर होतें. ज्यांस आमच्या समाजांत काहींही सुधारणा व्हावयास नकोत असे वाटत असेल, त्यांच्या तर्फेनें कोणताही महत्त्वाचा मुद्दा पुढे आणता येणार नाहीं, असें आम्ही म्हणत नाहीं; परंतु सध्या तो पक्ष बाजूस ठेवून ज्यास सुधारणा होणे इष्ट वाटत आहे त्यांच्या संबंधानेंच येथे विचार केला आहे. हिंदुसमाजांत सुधारणा झाली पाहिजे असें प्रतिपादन करणारे लोकाचे सजातीय व विजातीय असे प्रथमतः दोन भद करिता येतील. पैकीं परक्या जातीच्या मनुष्यानें कितीही शुद्ध अंत:करणार्ने आपणास उपदश केला तरी तो आपणास कदापिही चांगलासा रुचणार नाहीं,असें म्हणण्यांत कांहीं मोठेसें साहस नाही. परजातीयांस एक तर आमच्या व्यवहारांतलें खरें मर्म समजण्याची मोठी मुष्कील असते; व यदाकदाचेत् तें मर्म कळलें असले तरी बोलल्याप्रमाणे चालण्याची किती पंचाईत असते याचा त्यांस अनुभव नसल्यामुळे त्यांच्या सूचना ब-याच अंशी फाजीलपणाच्या होतात. याचे उत्कृष्ट उदाहरण मलबारी शेटजींचेच होय. यांनीं या विषयावर जितका विचार केला आहे व जितकें लिहिले आहे, तितकं किंबहुना त्याहून जास्तही आमच्या लोकांनी लिहिलेले आढळेल; परंतु मलबारी शेट हिंदु नसल्यामुळे बोलल्याप्रमाणें कृति करून दाखविण्याची वेळ आली असतां आमच्या सुधारकांची जशी गाळण होते व स्वत: मोठ्या इर्षेर्ने व उत्साहानें प्रतिपादन