पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्रकत्र्याच्या स्फुट सूचना १२१ निदान गौण तरी आहेच व या गौणतेस आचाराची भर घातल्यानें कदाचित त्यास अप्रशस्तता येऊं शकेल. पण हा विचार अगदी भिन्न आहे; व त्याचे विवेचन शास्त्राचाराची एक वाक्यता करतांना केले पाहिजे. आज आपणास नुसता शास्राचा विचार कर्तव्य आहे, तेव्हां जरी विवाहोष्टमवर्षीयाः इत्यादि वचनांचा रावब. वैद्य यांनी केलेला अर्थ कोणास संमत नसला तरी एकंदरीनें आठ वर्षीचा काल प्रशस्त आहे, १० वर्षाचा प्रशस्ततर आहे, १० पासून ऋतू प्राप्तीपर्यंत विहित आहे व ऋतुप्राप्तीपासून पुढे तीन वर्षे गैौण आहे, इतके केोणासही कबूल करावें लागेल. इतके झाले तरी बस्स आहे. आता कित्येक तीव्र सुधारक कीं ज्यास पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षांच्या मुली अविवाहीत राहणें इष्ट वाटत असेल, त्यास हा शास्त्रार्थाचा खटाटेप पसंत पडणार नाही; व त्यांस हा प्रयत्न कदाचित अनुपयेोगीही वाटल. त्यास अशा लोकासाठी हा लेख लिहिला नाहीं हेंच उत्तर आहे. सरते शेवटी रावब. चितामणराव वैद्य यानीं जो उद्योग आरंभिला आहे. व त्यासाठी आपल्या वेळेचा व पैशाचा जो ते व्यय करीत आहेत, त्याबद्दल त्याचे आभार मानून व काही बाबतीत आमचा त्याचा मतभेद असल्यास तो स्पष्टपणे कळविल्याबद्दल त्याची माफी मागून हा लेख पुरा। करतो. हे चार लेख रावब. वैद्य यांनी पदरच्या खचीनेंच प्रसिद्ध केले आहेत. या पुढचे ओझे तरी लोकांनी आपल्या अंगावर घेऊन त्यास मदत करणे जरूर आहे व त्याप्रमाणे कांहीं तरी तजवीज होईल अशी आमची आशा आहे. पत्रकत्र्याच्या स्फुट सूचना* रा. रा. मुधोळकर याची पत्नी नुकतीच निवर्तल्यामुळे मुधोळकरांस उपदेश करण्याची कांहीं पत्रकारांस ही एक अमेोल्य संधीच सापडला आहे. आपणावर जेव्हा जव्हा प्रसंग येतील तेव्हा तेव्हा ज्याने त्याने आपल्या बोलण्याप्रमाणे चालार्वे हें योग्य व सर्वासच हितकारक आहे, तथापि सरकार सेवा करूं देईना म्हणून स्वदेश सेवा करण्यास तयार झालेल्या पत्रकारानीं ऐन दुःखाच्या प्रसंगी आपल्या पुढाच्यांस अशा तन्हेनें टॅौचार्वे हे पाहून कोणासही क्षणभर आश्वर्य वाटल्यावाचून राहाणार नाहीं. आमच्या मतें प्रत्येक सुधारणानुवादकानें वैधव्यपंकांत पडलेल्या गाई उद्धरण्याचा मक्ताच घेतला आहे हे म्हणणे बयाच अंशीं आतिशयोक्तीचे आहे. सवै जग ब्रह्ममय असून आत्मपरभेद मोहाचे व मायेचे फल आहे असें प्रतिपादन करणाच्या स्वामीवर जेव्हा गजराजाची मर्जी सुप्रसन्न होऊन स्वामीमहाराज पेंचांत सांपडले व यःपलायन करण्याच्या बेतांत

  • [ केसरी तारीख ९ फेब्रवारी १८९२ ]

१५