पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपला धर्म. १२५ एकंदर सर्व धर्मग्रंथांची तुलना करता तत्त्वविचाराच्या संबंधानें हिंदुस्थानचाच नंबर वर येईल अशी हळुहळू खातरी होत चालली. सारांश, आमच्या घरांत काय आहे त्याचे दिग्दर्शन जेव्हां परकीयांनी केलें तेव्हांच आम्हांस त्याची योग्यता कळू लागली ! व आम्ही गेल्या पांचपंचवीस वर्षात जेो फुकट उपव्द्याप केला त्याची निरर्थकता आम्हांस भासू लागली. आमच्या धर्मविचारास हृल्ली जें हें वळण लागत आहे तेंच चालू राहून कायम झाल्यास त्यापासून एकंदर राष्ट्राचे पुष्कळ हित होणार आहे. वरील विचार आज सुचण्याचे कारण असें कीं, इंग्लंडांतील प्रसिद्ध संस्कृतज्ञ प्रोफे. म्याक्समुलर यानीं धर्मीवर इंग्लंडांत व्याख्यानें देण्यास सुरवात केली आहे व त्या व्याख्यानामुळे तिकडे बरीच चळवळ उपस्थित होऊन ती पुस्तकरूपानें लवकरच छापून प्रसिद्ध होतील असा संभव आहे. हिंदुलोकांच्या तत्त्वावचार ग्रंथांकडे पाश्चिमात्य लोकांचे जितकें लक्ष जावयास पाहिजे होतें तितकें अद्याप गेले नाहीं व दुस-याचा जीव कसा घ्यावा याचा अभ्यास न केल्यामुळे हिंदुलोक आज परचक्रात सापडले आहेत ही मोठया दुःखाची गोष्ट आहे असे माक्समुलर साहेबानी एका व्याख्यानात बोलून दाखविले. अशा रीतीनें हिंदुस्थानाबद्दल खया कळवळ्याच उद्गार काढणारे थेोडेच युरोपियन सांपडतील. हिंदुस्थानावर आज हचारों वर्षे जो परकीय राजांचा अम्मल गाजत आहे त्यास म्याक्समुलर म्हणतात तेवढेच कारण आहे किंवा दुसरी कांही कारणें झाली आहेत याचा आज आपणांस विचार कर्तव्य नाहीं. आमची आजची दुर्बलावस्था कशाही रीतीनें आलली असेो. किंबहुना आमचे तत्त्वविचारक ग्रथही त्यास थोडेबहुत कारणीभूत झाले असतील असें मानले तरी त्यामुळे सदर ग्रंथाची योग्यता कमी होत नाहीं. ज्या वेळेस जगांतील बहुतेक देश अज्ञानात बुडाले होते व धर्म म्हणजे काम-याची ही त्यास पुरी ओळख झाली नव्हती. त्यावेळीं या देशांत धर्माचे खरें स्वरूप लोकास अवगत झाले होते इतकेंच नव्हे, तर जीं तत्त्वें अलीकडे लोकांस समजलीं आहेत असे आपणांस वाटतें त्या तत्त्वांचा पूर्ण ऊहापोह करून आमच्या ऋषीनी मागेच निर्णय केला आहे. जीवाचे धर्म ईश्वरांत केोणते आहेत अगर असण शक्य आहे, सच्चिदानंद स्वरूपी ईश्वरांत ब्रह्मज्ञानाचा आचाराशीं कितपत सबंध आहे, धर्माचे खरे स्वरूप बाह्याचार होय का तत्त्वज्ञान होय इत्यादि प्रश्नाचा उलगडा आमच्या वेदातग्रंथातून फार चांगल्या रीतीने केलला आहे. आम्ही कितीही मूल्यूंपासक असलों, जातीच्या संबंधानें भेदाभेद आमच्या आचारांत कितीही दिसून येत असला, नीतीचे व धर्माचे ऐक्य आहे असें जरी आम्ही पदोपदीं प्रतिपादन केलें, कर्म मार्गावर किती जरी आमची श्रद्धा असली अगर भक्तिमार्गानेंच परमेश्वर सामान्य जनांस, किंबहुना सर्वत्रांस शेय आहे