पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/146

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह, १३१ कीं, शास्रांत प्रायश्चित नसलें तर दोष कसचा ? अथवा दोष मानला तर बटाटे खाणारांस तरी ती कां लागू नये ? हिंदुशास्रकारास माहीत नसलेलीं जनावरें व पक्षी खाल्ले असतां चालेल काय ? साराश, शास्रकाराच्या वेळी जे पदार्थ अज्ञात असतील त्याचा विचार सादृश्यानें करावा लागतो. तसा विचार कला म्हणजे ब्राह्मणेतर लोकाच्या हातचा चहा घेण्यांत व अन्नगृहण करण्यात कादे खाण्यापेक्षा किती तरी कमी दोष सागितला आहे असे कोणासही स्पष्ट दिसून येईल. वादोस या अपराधाचा जेो बाऊ वाटत आहे तो त्याच्या अज्ञानाचे, आग्रहाचे, दुरभिमानाचे व असद्बुद्धीचे फळ आहे या बागुलबुवास पेोरें फसतील, माहीतगार मंडळी फसणार नाहीत. asssarossssssssssssssssss पुनर्विवाह. गेला महिना दीड महिना गावात मोठ्या धामधुमचा गेला. कोटें दुष्काळाची विवंचना, कोठे ग्रामण्याची वाटाघाट व कोठे इलेक्शनाची खटपटमिळून एकंदर लोक काहीं तरी गडबडीत नेहमी दिसून येतच होते; परंतु ह्या सार्वजनिक बाबीपेक्षांही घरोघर लग्नमुंजीची एकच गर्दी उसळून गेल्यामुळे ताशेचौघड्याचे कलकलाट, भिक्षुकाची धावपळ, बायकाच्या मिरवणुकी व लाडवाची चैगळ ह्यांनीं जी सर्वत्रांची जिकड तिकडे विलक्षण धादल उडाली होती ती पुढे राष्ट्रहित, लोकहित, सुधारणा वगैरे शिळेोप्याच्या वेळच्या चटसाच्या विषयांना थोडा वेळ रजा मिळाली यात नवल नाहीं. पुण्यात म्हणजे काहींना काहीं चळवळ चालू नाही असें कधीं व्हावयाचे नाही; पण हल्लीं सर्व हालचालीला मंदी आल्यासारखी दिसत. लोकाचा अति आवडता विषय जो ग्रामण्य त्या संबंधानेही फारशी आस्था दिसून येत नाहीं. किंबहुना साक्षात् जगद्गुरूकडून प्रतिनिधि शास्री आलै असता व वादीप्रतिवादीकडून अतेनात कंठशेोष होत असतांही ग्रामण्य-कमिशनास जाण्याविषयीं पोरासीराखेरीज कोणी फारशी उत्सुकताही दाखविली नाहीं. दुष्काळाच्या वर्षी लग्नादिकासारखे फाजील ख चांचे समारंभ कमी होतात असा जगाचा साधारण नियम आहे;पण आम्ही सर्वच साधारण नियमाना अपवाद आहोंत; तेव्हां यंदा येथे लग्नकायाँचे कमी तर नाहीच, पण उलट दरवर्षापेक्षा थोडेबहुत जास्तीच प्रमाण आहे ह्यात आश्चर्य नाहीं. खेड्यापाड्यातून हजारों गरीब लोक धन्याच्या टंचाईमुळे एव्हांपासून निवडुगावर उपजीविका करूं लागले आहेत. पोटाकरिता घरदार सोडून बाहेर जाणाराची संख्या उत्तरेतर वाढत आहे. व ह्याहून अधिक वाढत जाण्याचा संभव दिसत आहे. यंदाचे साल सुखरूप कसें पार पडतें व पुढील वर्षी काय स्थिति होते ह्याची सर्वास मोठी काळजी लागली आहे असे असून ही मोतीचूर जिलब्थाची प्रयोजनावर प्रयो