पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/149

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ ली० टिळकांचे केसरींतील लेख बालविवाहानें ग्रासून टाकलेल्या हिंदुस्थानांतच नव्हे तर स्वयंवराचा पूर्ण अनुभव घेणा-या पाश्चात्य देशांतूनही अंत:करणात कळवळा आणि तिरस्कार उत्पन्न कर णारी उदाहरणें सापडतात. परंतु आमच्या देशांत त्याला जें एक प्रकारचे व्यवस्थित स्वरूप आले आहे व लोकांमध्येही त्याविषयीं जी निर्विकार बुद्धि दिसून येते ती मात्र दुस-या कंठे आढळाधयाची नाहीं. पुरुषासंबंधानें तरी एक प्रकारचा बाजार अशीच लोकाची समजूत झालेली दिसते. गाय, म्हैस, घोडा, कुत्रा, वगरंपैकीं एखार्दै मेले किवा निकामी झालें म्हणजे जसें दुसरें घ्यावयाचे त्याचप्रमाणें एक बायको मेली कीं दुसरी करावयाची अशीच बहुतेकाची कल्पना. लग्नामध्ये धर्मचाथ च कामच असें शपथपुरस्सर जिचे पाणीग्रहण केलें, आपल्या संसाराचा जिर्ने अधी बोजा शिरावर घेतला, पतीचा सुखदुःखात वाटेकरी होणें जी आपले कर्तव्य समजत होती, व जिच्या समागमांत आनंदानें अनेक वर्षे गेलीं ती काळाच्या फेच्यात सापडून किंवा अनेक वेळा नवयाचाच जाचामुळे अकालीं परलेोकवासी झाली तर दहा दिवसाच्या आतच तिला सवत शोधू लागणे व महिना दोन महिने झाले नाहीं तोंच किंबहुना तेराव्याच दिवशीं पुनः संसारी बनणे ह्यासारखे आपली कृतघ्नता, निर्दयपणा व नीचत्व प्रगट करणारें दुसरे कोणतेही कृत्य नसेल. प्रेमातिरेकानें स्रीविरह दुःसह होऊन सदा विरक्त होण्याची गोष्ट तर लांबच; पण निदान मनलज्जा व लेोकलज्जा बाळगून काहीं काळ तरी विधुरावस्था पाळण्याचे कोणाच्या मनांत येत नाहीं; इतर्केच नाहीं तर एखाद्याने तसा निश्चय केलाच तर त्याचे अभिनदन होण्याचे एकीकडे राहून उलट सर्व आप्तवर्गाकडून मूर्खपणा मात्र पदरी ध्यावा लागतो. प्रथम स्रीच्या वर्षश्राद्धानंतर वर्षे दोन वर्षे तरी पुन: लग्न करूं नये असा आमच्या शास्रकारानी निर्बध केला; कारण येणें करून तरी लेोकाच्या उच्छृखल कामविकारांचे कांहीं काळ बंधन व्हावें व इंद्रियनिग्रहाची लेोकाना संवय लागावी. पण आमचे लोक कसले वस्ताद ! शास्त्रकाराचा मूळ उद्देश एकीकडेच राहून निबंधातून पळून जाण्याकरितां वर्षाचे आतच पुनर्लग्न करण्याचा त्यांनीं प्रघात सुरू केला ! आमच्यामतें वरील निबंध आणखी कडक केला असता तर पहिली बायको मरण्यापूर्वीच आमच्या विषयलंपट बहाद्दरानीं दुसरीची ततूंद करून ठेवण्यास मार्गेपुढे पाहिलें नसतें. वरील प्रकार एखाद-दुसरा वेळ घडेल तर क्षम्य होईल; पण अनेक वेळा पुनरावृति करूनही पुन: व्यवहारात उजळ माथ्यानें हिंडणारे संभावीत लोक आमच्यांत थोडेथोडके नाहीत; व तेही अज्ञान धर्मवेड्या, जुन्या मतांच्या लोकांतच आढळतात असें नाहीं, तर इरएक सुधारणेच्या कामीं पुढाकार घेणा-या व भूतदयेनें विरघळून जाणाच्या शहाण्या सुधारक चमूंतही पुष्कळ आहेत हें अत्यंत लज्जास्पद नाही काय ? आजन्म राहीच, पण दोनचार वर्षे तरी विधुरावस्थेत घालविण्यापुरताही इंद्रियनिग्रह ज्यांना करवत नाहीं त्यांच्या हातून समाजसुधारणा