पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/163

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R?く ली० टिळकांचे केसरीतील लेख नेंच सुलभ झाल्या आहेत. ह्या सर्वोचा फायदा जर आपण घेतों तर ज्या समाजात राहिल्याने त्या आपल्याला मिzतात त्याचे आपण ऋणी नाहीं काय ? शेजाच्याच्या घरीं गाणे असले तर घरीं बसल्या फुकट ऐकावयास सांपडतें हा परंपरेनें त्या शजायाचा आपणावर उपकारच नव्हे काय ? सारांश, समाजांत राहिल्याने आपणांस किती फायदे होतात ह्याची, एखाद्या ओसाड अरण्यात जाऊन पडल्यास आपली काय दशा होईल हें मनांत आणल्यानें, थोडीशी कल्पना होईल तीसुद्धा अपूरतीच. कारण जगदुत्पत्तीपासून समाजाच्या संहत प्रयत्नार्ने जी सुधारणा झाली व जिचा अनुवंशिक सिद्धाताप्रमाणें जन्मतःच आपल्या मनावर सुसंस्कार घडलेला असतो तो कधीही जावयाचा नाही. तेव्हां या सर्व गोष्टींवरून त्या समाजाच्या हिताकरिता झटणे आपलें कर्तव्य नाहीं काय ? मागील पिढ्यानीं जशी आपली सोय लावून दिली तशीच पुढील पिढयांचीही तर्तृद लावण्याची प्रत्येक मनुष्यावर जबाबदारी आहे; व अक्रोडाचे झाड लावणाया म्हाताया मनुष्यानें इराणाच्या बादशहास उत्तर दिलें त्याचे तात्पर्य हेंच. असो; तर हें समाजाचें ऋण फेडण्यास आपण काय प्रयत्न करती ह्याचा प्रत्येकानें विचार करावा. चाकरी करून बायकापोराचे पोट भरल्याने हें कर्तव्य बजावलेसें होत नाहीं. इंग्लंडसारख्या देशात सार्वजनिक कामासाठीं अहोरात्र मोठमोठे लोक खपतात ते ह्याकरिताच; व आम्ही जेोपर्यंत त्याचे अनुकरण करूं लागली नाहीं तों. पर्यत आमच्या डोक्यावर कृतघ्नतेचा दीप कोणी लादला तरी वावर्गे होणार न हीं. मात्र आपल्या प्राचीन ग्रंथातून ऋणत्नयाची कल्पना आढळते तींतही हाच मुद्दा आहे. कालदेशभेदाने अक्षरार्थ न घेता तिचे तात्पर्य घेतले आहे.साराश,आपल्या आयुष्यांतील थोडाबहुत भाग सार्वजनिक उपयोगाकडे लावणें प्रत्येकाला अगत्याचे आहे, व तोही आम्ही फार मागर्ते असे नाही. हल्लीं सरासरी हिंदुस्थानातील लोकांचे आयुष्य पन्नास वर्षे; त्यापैकी पहिली वीस वर्षे अध्ययनात म्हणजे पुढील आयुष्य क्रमाच्या तयारीत किंवा आपले संबधी कर्तव्य करण्यांत गेलीं. समजा पुढील वीस वर्षे, म्हणजे ४० वर्षे वयापर्यंतचा काळ संसार करण्यात म्हणजे दुसरें कुटुंबासंबंधी कर्तव्य करण्यात घालविला. इतकी सूट दिल्यावर उरलेलीं दहावर्षे म्हणजे सारें एकपंचमाश आयुष्य देखील लोकहिताकडे देण्यात लोकांनीं कांकू करावीना ? विवाहित स्थितीत समाजहित साधणें दुर्घट आहे; तेव्हा हें लोकऋण फेडण्याला प्रसंग दोनच. एक विवाहापूर्वी किंवा कर्मधर्मसंयोगानें विधुरावस्था आली. तर ह्यापैकीं विवाहच लाबणीवर टाकण्याचा पहिला मार्ग निःसंशय उत्तम कारण आयुष्याचा नियम नाहीं. पण बालविवाहाचे दास बनून गेलेल्या आम्हांस तो दुष्कर वाटत असेल तर निदान दुसरा मार्ग तरी पत्करणें लोकांना जरूर नाही काय ? एकदां बायको मेल्यावर पुनः चूलबोळकी जमवून शिळी भातुकली खळू लागण्यापेक्षां, नशिबार्ने मिळालें तेवढे संसारसुख पुरै झालें असा विवेक करून शेष आयुष्य लोककार्यासाठीं खर्च करणे हा अधिक शाहणपणाचा