पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/166

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेटिव्ह व्हाइस चान्सलरांचे पहिलें भाषण. १५१ तर कमी होत चालली असें आढळून येतें. तेव्हां युनिव्हर्सिटीसारख्या संस्थानन्या व्यवस्थापकांनी इकड अवश्य लक्ष दिलें पाहिजे. युनिव्हर्सिटी ही वरिष्ठ शिक्षणाची संस्था होय. कोणत्याही शास्त्राचे साद्यंत अध्ययन केलेले पंडित या संस्थेतच आढळून यावयाचे व येथेच निरनिराळ्या शास्त्रात व कलात नवे शोध करण्याची सर्व सामुग्री मिळावयाची. साराश, युनिव्हर्सिटी म्हणजे विद्येचे व विद्वानाचे मुख्य स्थान होय; व या सरस्वतीमंदिरात शिरल्याबरोबर निरनिराळ्या विषयांत पारंगत असलेले विद्वान जर दृष्टीस पडणार नाहीत, तर लोकानी, सरकारनें आणि युनिव्हर्सिटीनें आपले कर्तव्य बजावलें नाहीं असेंच म्हटले पाहिजे. प्राच्य विद्येपेक्षा इंग्रजी अथवा युरोपियन विद्या या देशातील लोकास शिकविणे विशेष महत्त्वाचे व जरूरीचे आहे असा लार्ड मेकॉले साहेबानी जेव्हा आग्रह धरला, तेव्हा निष्काम बुद्धीनें पूर्वीची विद्याभ्यास करण्याची आमची सवय जाऊन, आम्ही युनिव्हर्सिटींची परिक्षा पास झाल्याबरोबर आपणास कृतकृत्य मानण्यास लागावे, व पाश्चात्य विद्येचा खरा अंकुर या देशात उद्भवण्यास जीं साधनें अवश्य आहेत त्यापैकी कोणतीं साधने आम्हास उपलब्ध होऊं नयेत असे त्याच्या मनात होतें असें आम्हास वाटत नाहीं, न्याय, व्याकरणशास्त्राच्या ऐवजी इतिहास, अर्थशास्त्र, पदार्थविज्ञानं, आाणि रसायनशास्त्र अदिकरून नवी शास्त्र हृल्त्री अामह्ास शिकावी लागतात; पण त्यामुळे कोणत्याही शास्त्रात प्रवीणता संपादन करण्यास ज्या गुणाची व साधनाची आवश्यकता आहे ते गुण व ती साधने आता बदललीं आहेत असे नाही. यासाठी विश्वाविद्यालयासारख्या सस्थेत शास्त्राध्ययनाची पूर्ण साधने आहेत कीं नाहीत हे पाहणे जरूर आहे. गेल्या वर्षी खुद्द नामदार गव्हर्नरसाहेबानीच या गोष्टीचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता. परतु डॉ० भाडारकर यानी या विषयाबद्दल आपल्या भाषणात जितकी फोड केली आहे तितकी नामदार साहेबानी केली नव्हती. आमची युनिव्हर्सिटी खरोखरच विद्वत् परिषद अगर विविध विद्येोगपचयस्थान होण्यास आमच्या कॉलेजातील प्रोफेसर चांगले पाहिजेत. इतकेच नव्हे तर खुद्द विश्वविद्यालयातही विद्यैक व्यासंग असणारे काही लोक मुद्दाम तेवढ्याच करिता पगार देऊन ठेविले पाहिजेत. असे पगारी प्रोफेसर ऑक्सफर्ड, केब्रिज़, आणि जर्मनी येथील युनिव्हर्सिटींमधून नेहमीं ठेवण्यात येतात व त्यामुळेच जर्मनी आज नवीन शेोधाचे आगमस्थान होऊन बसली आहे. परंतु आमच्याकडे अशा प्रकारच्या प्रोफेसराची एकही जागा नाहीं इतकेंच नाहीं, तर कॉलेजातील प्रोफेसराच्या जागाही तिसया अगर चवथ्या प्रतीच्या युरोपियन लोकास देण्यात येतात ! आज कॉलेजें स्थापन होऊन जवळ जवळ पन्नास वर्षे झाली; पण इतक्या मुदतीत जर्मन पडितांखेरीज येथ आलेल्या कोणत्याही प्रोफेसरानें एकादा शास्त्रीय नवा ग्रंथ लिहिल्याचे आढळून येत नाही. असे जे डॅक्टिर भाडारकर यानीं सागितलें तें अक्षरश: खरे आहे. असले प्रोफेसर असल्यावर मग आमची नवीन विद्वान्