पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/168

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेटिव्ह व्हाईस चान्सलरांचे पहिलें भाषण १५३ पावले. रामजोशी आणि मोरोपंत याचे वय मरणसमयी अनुक्रमें ५० व ६५ वर्षाचेच होतें. रामदास, मुक्तेश्वर आणि श्रीधर वगैरे कांही कवींनीं सत्तराच्या पुढे मजल मारिली होती; पण एकंदर मराठ्यांच्या इतिहासाचे अवलोकन केलें असता काम करणारे आणि भेहनती गृहस्थ साठ वर्षांहून जास्त जगल्याचे क्वचितच आढळून येईल. साराश, विलायतच्या थंड हवेत ज्याप्रमाणे आयुष्याची मर्यादा ऐशीं-नव्वदपर्यंत जाते तशी आमच्याकडे असल्याचे सामान्यत: आढळण्यांत येत नाही, व विशेषतः कामाचे, उद्योगी आणि सतत परिश्रम करणारे गृहस्थ फार दिवस वाचल्याचीं तर बहुधा गेल्या शेदीडशें वर्षात फारशी उदाहरणे सापडतील, असें आम्हास वाटत नाहीं. आमच्याकडे कोणत्याही मनुष्याच्या कर्तबगारीचा काळ म्हटला म्हणजे पंचवीसपासून पंचेचाळीस वर्षापर्यंतचा होय, व अलीकडे कित्येक विद्वान् गृहस्थ ४५ साचे पूर्वीच दुर्दैवाने मेल्याची जरी कित्येक उदाहरणे घडून आली आहेत,तरी एकंदरीने आमचे दक्षिणी लोक मराठे शाहीपेक्षा आता विशेष अल्पायुषी झाले आहेत असे आम्हास वाटत नाहीं. सकस व पुष्टिदायक अन्न सेवन करावें, व्यायाम ध्यावा आणि स्त्री-पुरुषानी जास्त दिवस व्रतस्थ राहावें, असा जो भाडारकर यानी उपदेश कला आह ता गैरवाजवी आहे असें आम्ही म्हणत नाही. उलट होईल तितके करून प्रत्येकान त्याप्रमाणे वर्तन करण्यास झटावें अशी आमचीही तरुण मडळीस सूचना आहे. आमचे एवढेच म्हणणे आहे की, डॉ० भाडारकर यानी अलीकडे कित्येक विद्वान् लोक लवकर मरतात याचा युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाशीं काही एक संबध न जेोडतो त्याचा सर्व दोष फक्त कदन्न, व्यायामाभाव आणि बालविवाह याजवरच लादण्याचा जे प्रयत्न केला आहे तो अगदी चुकीचा आहे. युनिव्हर्सिटीतून चागले विद्वान् निपजावेत, व त्यानी युरोपातील युनिव्हर्सिटीच्या प्रोपे,सराबराबर टक्कर मारावी अशी ही आमची मनापासून इच्छा आहे. हिंदु लोक युरोपियन लोकापेक्षा बुद्धीने कमी आहेत असे आम्हास वाटत नाही, व इग्रजी राज्यात निष्काम विद्यार्जनास अनुकूल अशी जर साधने आम्हास मिळतील तर आमच्यापैकी काही लोक निदान युरोपियन विद्वानाच्या तोडीचे निपजतील अशी आमची पूर्ण खात्री आहे; पण हे विद्वान् निपजण्यासाठी प्रत्येक बी. ए. होणाच्या मनुष्यास बार बारा चौदा चैौदा वर्षे अभ्यास करावयास लावून त्यास अगदीं पिळून काढावा हें अगदीं निर्दयपणाचे आणि वेडेपणाचे काम आहे. आम्हास परकीय भाषेतून अभ्यास करावा लागतो हें लक्षांत आणून सामान्य बी. ए.ची यत्ता विलायती बी. ए.च्या यतेपेक्षां किंचित् कमीच असली पाहिजे. ही यत्ता वाढवून विद्वान् निपजतील अशी जर कोणाची समजूत असेल तर ती अगदीं चुकीची आहे. एका हाताचीं सर्व बोटे जर कोणीं ओढून सारखीं करूं म्हटले तर ज्याप्रमाणे तो आपणास उपहासास्पद करून घेईल त्याचप्रप्रमाणें वरील सूचना करणाराची होय. आमच्या समा १९