पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/172

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशी भाषांस उत्तेजन देण्यास युनिव्हर्सिटीनें काय केलें पाहिजे १५७ सुरसासि गोडी न त्याहुनी पर्णपुटीं न थेोडी ” असे म्हणून मराठी भाषेचा गौरव करणारे सेनेटर आमच्या युनिव्हर्सिटीत फारसे सापडावयाचे नाहीत. हें आम्ही नेहमीं लक्षात ठेविले पाहिजे. कोणतीही भाषा प्रगल्भदशेस येण्यास तिचा बाजारात, न्यायभाषेत, दरबारात वगैरे सर्व ठिकाणी अप्रतिहत संचार सुरू असला पाहिजे आमच्या देशी भाषास तशी सवलत हल्लीच्या राजकीय स्थितीत मिळणे शक्य दिसत नाही. पंजाबच्या युनिव्हर्सिटींत सर्व विषय देशी भाषात शिकवून, व आमचेकडे ज्याप्रमाणे परीक्षेस संस्कृत ठेविले आहे तशा रीतीनें इंग्रजीचा अभ्यास करून विद्याथ्याँस बी. ए. ची पदवी देणारी एक शाखा आहे. पण सर्व विषय इंग्रजीत शिकून बी. ए. च्या परिक्षेत पास झालेल्या विद्याथ्र्यापेक्षां असल्या प्राच्य बी. ए. चे महत्त्व कमी मानीत असल्यामुळे या शाखेंत जितके विद्यार्थी परीक्षा देतात त्यापेक्षा इग्रजी शाखेत परीक्षा देणारची सख्या पुष्कळपटीने अधिक असते. साराश, देशी भाषाच्या उत्कर्षाकरिता खाजगी रीतीने आम्हीं किती जरी प्रयत्न केले तरी हल्लींच्या राज्यपद्धतीमुळे देशी भाषेच्या उत्कषसि जेो थोडाबहुत अडथळा आला आहे व येत आहे तो दूर करणे अशक्य आहे, हे लक्षात ठेवून देशी भाषेच्या उत्कर्षाबद्दल ज्या कांहीं सूचना करावयाच्या त्या केल्या पाहिजेत. इंग्रजीचे ज्ञान ज्या कारणामुळे आवश्यक अगर अपरिहार्य आहे त्या कारणानें नाही तरी अन्य कारणानें सस्कृतादि जुन्या भाषाचे ज्ञानही देशी भाषाच्या उत्कर्षास अवश्यक आहे असें थोड्या विचारानी कळून येईल. गेल्या पाचपंचवीस वर्षात देशी भाषातून जे चागले ग्रंथ झाले आहेत ते वाचले असता संस्कृतादि जुन्या भाषातील शब्दाचा त्यात किती भरणा असती, व नव नवे विचार देशी भाषेत व्यक्त करण्याम या जुन्या भाषाची किती मदत होते हे कोणासही उघड दिसून येईल. कोणत्याही भाषेत चागली ग्रंथरचना होण्यास (१) शब्द सामुग्री, (२) विनारसंग्रह आणि (३) ग्रंथाची जरूरी या तिन्ही साहित्यांची अपेक्षा असते. पैकी पहिले साधन बहुतेक अशी आमच्या देशातील जुन्या भाषाच्या अभ्यासानेंच प्राप्त होणार आहे. विचाराचा साठा बयाच अंशीं पाश्चिमात्य ग्रंथकारांकडून आपणास उसना घेतला पाहिजे. पण हे उसने विचार इकडील लोकास ग्राह्य होण्यास त्याची व जुन्या विचाराची सांगड घालून दोघासही इकडील पोषाख दिला पाहिजे. ही गोष्ट आमच्याकडील संस्कृतादि जुन्या भाषांचा ज्यास चांगला परिचय नाहीं त्याच्या हातून चांगलीशी वठेल असे आजपर्यंत घडलेल्या हकीकतीवरून आम्हास वाटत नाही. लैटिन आणि ग्रीक या भाषाचे अध्ययन विलायतेंतल्या युनिव्हर्सिटींतून आता चालू ठेवण्याची काहीं जरूर नाहीं अशी विलायतेत हल्ली चळवळ सुरू आहे; पण ती न्याय आपणास इकडे लागूकरितां येत नाहीं. लेंटेिन व ग्रीक भाषाची इंग्रजीस जी मदत झाली आहे तितकी संस्कृतादि प्राच्य भाषाची आमच्या देशभाषास झाल्यावर या प्रश्नाचा आम्हास