पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/173

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8いく लो० टिळकांचे केसरींतील लेख विचार करितां यईल. हल्लींच्या स्थितीत देशी भाषांची आणि त्याच्या मातुश्रीची फारकत करून देणें आम्हास सर्वोशीं आहितकारक आहे. राज्यपद्धतीमुळे इंग्रजीचे आणि देशी भाषा प्रैौढ दशेस आल्या नसल्यामुळे संस्कृतादि प्राच्यभाषांचे ज्ञान संपादन करणें आम्हास अशक्य आहे हें वरच्या विवेचनावरून वाचकाच्या लक्षांत येईल. आता संस्कृत आणि इंग्रजी यांचे ज्ञान संपादन करून महाराष्ट्रादि देशभाषाचे ज्ञान संपादन करणे किती शक्य आहे अशा दृष्टीनें जरी या प्रश्नाचा विचार केला तरी युनिव्हर्सिटीच्या हल्लींच्या अभ्यासक्रमांत पुष्कळच सुधारणा करिता येण्यासारखी आहे असे आढळून येतें. मॅट्रिक्युलेशन परिक्षेस लागणारे विषय देशी भाषातून विद्याथ्याँस समजून देऊन पुढ दोन तीन वर्षे त्याजकडून इंग्रजी भाषेचा अभ्यास करविला तर विद्याथ्र्यावरील परीक्षेचे ओझें बरेंच हलकें हेोईल असें पुष्कळ अनुभविक लेोकाचे मत आहे; परतु अशा प्रकारची व्यवस्था नसल्याचा दोष प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीकडे येत नाही. मॅट्रिक्युलेशनपर्यंत अभ्यासक्रम कसा चालवावयाचा याची व्यवस्था व नियम विद्याखात्याः कडून होत असतात, सबब ते भाग सोडून देऊन वरच्या परीक्षेसेंबंधानेंच आपण येथे विचार करूं. महाराष्ट्रादि देशभाषांतून ज्या प्रकारचे ग्रंथ होणे आवश्यक आहे तशा प्रकारचे ग्रंथ केवळ देशी भाषांतील जुन्या ग्रंथाच्या अध्ययनाने निर्माण होतील असें आम्हांस वाटत नाहीं. उदाहरणार्थ, आपण मराठी भाषा घेतली तरी केवळ मोरोपत, वामन वगैरे कवींच्या ग्रंथावाचून शिल्पशास्त्र, अर्थशास्र, रसायनशास्र इत्यादि उपयुक्त विषयावर मराठीत ग्रंथ पाहिजे आहेत असें नेटिव्ह प्रेसचे रिपोर्टर रावसाहेब साठे याचे म्हणणे आहे. असे ग्रंथ हाण्यास फारशी मदत होईल असें दिसत नाही. मराठी कवीचे ग्रंथ इंग्रजी अगर संस्कृत कवींच्या ग्रंथाप्रमाणें परिक्षेस नेमण्याच्या योग्यतेचे नाहीत असे आम्ही म्हणत नाहीं, परंतु ज्या हेतूसाठी मराठी भाषेचा युनिव्हर्सिटीत प्रवेश व्हावा असे लोकांचे म्हणणे आहे, तो हेतु सिद्धीस जाण्यास देशी भाषातील जुन्या कवीचे ग्रंथ विद्याथ्यांकडून घोकविण्यापेक्षा निरनिराळ्या शास्त्रीय विपयाचा अभ्यास व मनन देशी भाषांतून त्याचेकडून करविल्यास जास्त उपयेोग होईल हे उघड आहे. उपयुक्त विषयांवर देशी भाषांतून आधुनिक विद्वानाकडून व्हावे तितकें ग्रंथ होत नाहीत, व युनिव्हर्सिटीकडून अशा प्रकारच्या ग्रंथरचनस जितके उतजन मिळावें तितकें मिळत नाहीं असा रावसाहब साठे याचा आक्षप आहे. हा आक्षप पुष्कळ अंशीं खरा आहे हे आम्ही वर लिहिलेंच आहे परंतु हा दोष काढून टाकण्यास अगर ही स्थिति सुधारण्यास युनिव्हर्सिटीखेरीज इतर संस्थानी व लोकांनीही प्रयत्न केला पाहिजे हें आम्हांस विसरता कामा नये. आधुनिक विद्वानानीं उपयुक्त विषयावर ग्रंथ लिहिण्याचे मनांत आणले तर त्या सर्वोच्या छपाईचा खर्च ग्रंथांची विक्री होऊन निघल कीं नाही याची आम्हांस थेोडीशी शंकाच वाटते. कोणत्याही भाषेत ग्रंथसंग्रह होण्यास ग्रंथाची जरूरी अथवा खप हें एक अंग आहे