पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/175

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० लो० टिळकांचे केसरीतील लेख विद्याथ्यांस देशी भाषेत लिहिण्यास सांगण्यास कांहीं अडचण येते असें आम्हांस दिसत नाहीं. करितां इंग्रजी व संस्कृत या भाषाच्या ज्ञानाची यत्ता कमी न करितां एक दोन विषय देशी भाषेतून शिकविण्याची जर कॉलेजांतून सोय करितां आली तर सदर भाषास उत्तेजन देण्याचे कामीं युनिव्हर्सिटीनें आपलें कर्तव्य केलें असें होईल अशी आमची समजूत आहे. म्हणून युनिव्हर्सिटींत देशी भाषांचा प्रवेश करण्याबद्दल जी हल्ली खटपट सुरू आहे तीस होईल तितके करून अशा प्रकारचे वळण द्यावें अशी आमची सूचना आहे. शंकर पांडुरंग पंडित * रावबहादुर शंकर पाडुरंग पंडित यास गेल्या रविवारी मुंबईस देवाज्ञा झाल्याचे दुःखकारक वर्तमान आले आहे. हे आज पाच सहा महिने आजारी असून गेल्या आठ पंधरा दिवसात ह्याची तब्बत जरी सुधारत होती अशी बातमी आली होती, तरी एकंदरीत त्यास झालेला रोग दुम्साध्य आहे असे डॉक्टर लोकाचे मत होते. आमच्या ग्रंज्युएट मंडळींत हुषार म्हणून जे गृहस्थ मानले जातात त्यात शंकरराव यांची गणना होते. याची एम्. ए.ची परीक्षा सन १८६७ सालीं उतरली, व कॉलेजात असताच भाषाज्ञानाबद्दल याचा लौकिक झाला होता. रघुवश, मालविकाग्निमित्र आणि वेदार्थयत्न ह्या ग्रंथावरून याची विद्वत्ता व परिश्रम लंकास कळून येतील. सरकारी नोकरीतही शंकररावाचा चागला प्रवेश झाला असून काही दिवस त्यानी ओरिएण्टल ट्रॉन्स्लेटरचे काम केले होतें, व हल्ली पोरबंदर सस्थानचे ते दिवाण होते. याचा स्वभाव तापट असल्यामुळे कित्येक प्रसगी याजवर सरकारची नाराजी होत असे, पण तिकडे यांनी कधीही विशेष लक्ष दिले नाही. मुलकी खात्यातील नोकरी संभाळून यांच्याप्रमाणें विशेष व्यासंग कायम ठेवणारे फारच थोडे गृहस्थ सापडतील. याचे वय सुमारे ५३ वर्षाचे होते. अखेरीस अखेरीस त्याना हवा पालटण्याकरिता म्हणून मुंबईस रावबहादुर रानडे याचे घरी नेले होते; पण मृत्यूपुढे सर्व मानवी प्रयत्न व्यर्थ आहेत. याच्या मृत्यूनें आमच्यामधील एक अनुभविक, उद्योगी आणि विद्वान् गृहस्थ आज नाहीसे झाले. याची जागा पुढे भरेल तेव्हा खरी. TMAAASAAAAASA SSASAS SSAS SSAS SSAS SSAS SSAS ----- ------------ - - -------- ----- - - _ --- - - --- -- -------. -- { *केसरी-ता, २० मार्च १८९४]