पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/177

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ लो० टिळकांचे केसरीतील लेख मृत्यु येतो अशी ज्यांची समजूत नसेल त्यानीं या प्रश्नाचा व्यावहारिक दृष्टया विचार करण्यास लागार्वे हें त्याचे कर्तव्य होय. डॉ. भांडारकर व न्यायमूर्ति रानड या दोघां विद्वानांच्या हातून या प्रश्नाचे अशा रितीनें परिक्षण झाले आहे ही मोठ्या सुदैवाची गोष्ट होय. व दोघाही विद्वानाच्या चर्चेनें जे सिध्दांत अखेर कायम ते ग्राह्य मानण्यास कांहीं हरकत नाहीं. वर जे दोन प्रश्न सांगितले त्यांपैकीं ग्रेज्युएट लोक अकाली मरतात कीं नाहीं याचे डेॉ. भांडारकर यांनीं जे विवेचन केले होतें त्यात सन १८६२ । ८० पर्यंत पास झालल्या एम्. ए. गृहस्थापैकी दक्षिणी शंकडा ४४ आणि पाशी शंकडा १६ मरतात; आणि बी. ए, पैकी दक्षिणी शैकडा २०, गुजराथी शेकडा २२, आणि पाशीं शकडा ९ मरतात असे त्यानीं आकडयानीं सिद्ध करून दाखविले होतें. हे आकडे रावब. रानडे यानी पुनः तपासून घेऊन सन १८९३ अखेरपर्यंत ( सन १८९३ सालीं पास होऊन १८९४ च्या फेब्रवारीत ज्यांनीं डिग्री घेतली ते लोक सोडून देऊन ) युनिव्हर्सिटीतून बाहेर पडलल्या सर्व ग्रॅज्युएटांची इकीकत आणविली कित्येकाच्या मतें ग्रॅज्युएट अकालीं मरतात किंवा नाहीं हें पाहणें असल्यास दहा वर्षापूर्वीचे ग्रंज्युएट घेतले पाहिजेत; परंतु ही समज चुकीची आहे. जे लोक अकालीं मरतात ते प्राय: ग्रॅज्युएट झाल्यापासून दहा पंधरा वर्षातच मरतात; करिता आजपर्यंत पास झालेले सर्व ग्रॅज्युएट घेऊन व त्याची हकीकत पाहून जें अनुमान निघेल तेच अधिक विश्वसनीय मानले पाहिजे. खेरीज युनिव्हर्सिटी स्थापन झाल्याबरोबर पहिली काही वर्षे पाशी व गुजराथी लोक यांचा कॉलेजांतून फारसा भरणा नसे. सबब डॉ, भाडारकर यांनीं याप्रमाणे सन १८६२ पासून सन १८८० पर्यंत म्हणजे पहिल्या अठरा वर्षीचीच संख्या घेऊन अनुमानें काढिली आहेत, तसे केले असता निरनिराळ्या ज्ञातींतील परस्परप्रमाणही बरोबर कळण्याचा संभव नाहीं. ह्यामुळे रा. ब, रानडे यानीं सन १८९३ अखेर सवै ग्रंज्युएट लोकाची संख्या घेऊन जे अनुमान केले आहे तेंच आधक प्रशस्त आहे असे मानले पाहिजे. सन १८९३ अखेर एकंदर ग्रंज्युएटाची संख्या २१९८ असून, पैकीं १०५ एम्. ए; १३२८ बी. ए., ३२ बी. एससी. ५ एम्. डी. ४२४ एल. एम्. एस्, १ एम्. सी. ई. व ३० ३ एल. सी. ई. आहेत; आणि बी. ए. व एम्. ए. मिळून एकंदर १४३३ सांपैकीं ३५६ एलूएलू. बी. झाले आहेत. या सर्वोचे जातवार प्रमाण पाहूं गेले असतां असें आढळून येतें कीं, यांपैकी शैकडा ४७ दक्षिणी, शेंकडा २५ पाशीं, १७ गुजराथी, ६ खिश्वन, २ सिंधी, आणि मुसलमान शैकडा २ पेक्षाही कमी आहेत. पैकीं खिस्ती, ज्यू, मुसलमान आणि सिंधी ह्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे त्यांच्याबद्दल