पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/190

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डेॉ. भांडारकरंआणि ऑनरेबल रावबहादुर रानडे. १७५ आहे तें बोलतो अशी जर कल्पना केली तर डॉक्टरसाहेबाप्रमाणेच त्यांस दोष देणारे लोकही सत्यवक्तेच मानले पाहिजेत. समाजाची उन्नति होण्यास एकाच बाजूनें सुधारणा होऊन उपयोगाचे नाहीं, कोणत्याही समाजरचनेंत थोडें तरी दोष असतातच; परंतु या दोषाकडे दुर्लक्ष करून लोकामध्यें एकप्रकारचा हुरूप, अभिमान, कर्तृत्वशाक्त, उन्नतीची आशा उत्पन्न करणे यांतच राष्टाचे हित आहे, व याकरिता सर्व प्रकारच्या चळवळींची अवश्यकता आहे इत्यादि तत्त्वाचा उपदेश करणारे लोक लबाड का व आमच्या डोळ्यापुढे आमचे दोष नेहमीं मांडणारे व आमचे जें काही आहे ते वाईटच आहे असें प्रतिपादन करणारे डॅक्टिरसाहेब सत्यवादी का हे आम्हास समजत नाही. डॅक्टिरसाहेब थास आम्ही लबाड म्हणत नाही, पण त्याचा उपदश ज्याअर्थी आधींच निरुत्साह झालेल्या लोकास अधिक नाउमेद करण्यासारखा आहे त्या अर्थी तो टाकाऊ आहे व रा. ब. रानड यानी डॅक्टिरसाहेबावर आणलेले दाषैकदृक्त्वाचे आणि आत्मनेिंदेचे आक्षेप अगदी बरोबर आहेत असे म्हणणें. अगदी ओघानेच प्राप्त होते. डॉक्टरसाहेबाच्या या मनेोवृत्तीचा व मनाचा आम्ही मागेच उल्लेख केला आहे. रा. ब. रानडे यानीं कारलाईल व रस्किन या प्रसिद्ध इंग्लिश ग्रथकारावर एके प्रसंगी हेच आक्षेप आणले होते तेव्हा त्यांच्या पंक्तीस बसण्यास आपणास काही कमीपणा वाटत नाही असें डॉक्टरसाहेबानी आपल्या उत्तरात म्हटले आहे. या काटीनें डॉक्टरसाहेबाचे समाधान झाले असेल, पण दुस-या कोणाचे होईल असें आम्हास वाटत नाही. * कालोह्यय निरवधिर्विपुलं च पृथ्वी ’ ही भवभूतीची उक्ती सर्वास ठाऊकच आहे. तेव्हा डॉक्टरसाहेबाच्या विचाराचा पुरुष पूर्वी कधी निपजला नाही व पुढे कधीं होणार नाहीं असे कोण म्हणेल ? एवढयानेच जर डॉक्टरसाहेबाचे समाधान होत असेल तर त्यात आम्हीही केोणतेही प्रकारे विन्न आणू इच्छित नाही. बाकी समाजाची घटना व उन्नति यासंबंधाने एकंदरीत रा. ब. रानडे याची मते, अधिक सयुक्तिक, हितावह व यथार्थ आहेत असे सामान्यत: म्हणण्यास प्रत्यवाय दिसत नाही. या दोघाही विद्वानाच्या मतापैकी आम्हास जी ग्राह्य वाटत नाहीत त्याचा आम्ही वेळोवेळीं उल्लेख केललाच आहे; पण आमच्यासंबंधाने प्रश्न नसल्यामुळे त्याचे विशेष विवरण करण्याची येथे जरूर नाही. रा. ब, रानडे व डॅक्टर भाडारकर या दोघा विद्वद्वर्याच्या मताचे तारतम्य पाहून ग्राह्याग्राह्यतेचा निर्णय करणें एवढेच आमचें आजचे काम आहे. هذه همسمعدمه. يمد عينيه به مع جميميميه جيم