पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/192

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सं.वना & \9 VS: نیای ۹ महाराष्ट्र लोक हे धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें, आणि यवनांशी लढाया करून हिंदुधमाँचे रक्षण करणारे असें दुस-या गंधर्वाने म्हटलेले आमच्या कित्येक वाचकांस माहित असेलच. डॉ० भांडारकर व रा० ब० रानडे यांच्या वादाचा प्रकारही कांहीं अंशीं या गंधर्वद्वयांच्या वर्णनाप्रमाणेच आहे. आपण नेहमीं सत्य बोलती व लोकाचे दोष बाहेर काढती एवढ्याचसाठी आपणास कोणी नैराश्यवादी म्हणत असल्यास खुशाल म्हणोत, असें डॉ० भाडारकर यानीं ज खोंचून लिहिलें होतें त्यास रा० ब० रानडे यानीं असे उत्तर दिले आहे की, ** सत्यवादीपणाचा कोणीही इतका डौल मिरविण्याचे कारण नाही. समुद्राच्या बाहेरही पुष्कळ मासे सापडतात व सत्यवाद्याचा प्रकारही त्यातलाच होय. सत्यवादीपणा पत्करला म्हणजे निंदकाचे व्रत घेतलेंच पाहिजे असें नाहीं. सत्य आणि प्रिय असें भाषण करतां येत नाहीं असे नाही इतकेच नव्हे, तर असले भापण करणारे गृहस्थ लोकांच्या अधिक उपयोगी पडतात.' रा० ब ० रानडे याचे हे उत्तर अगदीं सयुक्तिक व यथार्थ आहे. युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात काय काय सुधारणा केल्या पाहिजेत हें रा० ब ० रानडे यानी स्पष्ट सुचविले नाही असा त्यांजवर डॅ० भाडारकर याचा एक आक्षेप होता. करिता पुढील सहामाहीत युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापकानों केोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे हे रा० ब० यांनी आपल्या पत्रांत सरतेशेवटी सागितले आहे. युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रम सुधारणेंत एकदोन विषयात नापास झालेल्या विद्याथ्यांस तेवढ्याच विषयांत परीक्षेस बसण्याची सवलत ठेवणे, शरीराशिक्षणाची परीक्षा घेण्याची काही तरी तजवीज करणे आणि स्कॉलरशिपा वगैरे अविवाहित विद्याथ्यास देण्याचा ठराव करून ब्रह्मचर्य पाळण्यास उत्तेजन देणे या रा० ब० रानडे याच्या मुख्य सूचना होत. ह्या व इतर सूचनाचा युनिव्हर्सिटीनें आता काही तरो विचार करण्यास लागावें असें आम्हास वाटतें. वादविवाद बरा झाला आहे व आमच्याकडील पहिल्या प्रतीच्या दोन विद्वान् गृहस्थांनी या एकंदर प्रकरणाचे परीक्षण केलें असल्यामुळे आतां त्यावर विशेष लिहिण्यासारखे काहीं राहिले नाही. हा प्रश्न ज्या दोघा विद्वान् गृहस्थानीं लेोकापुढे माडला त्याचे लोकाच्या वतीनें आम्ही आभार मानतों व अशी सूचना करितो की, आता हा वाद संपून त्यापासून जी कांहीं निर्विवाद अनुमानें निघत आहेत तेवढी तरी अमलात आणण्याची युनिव्हसेिंटीनें काहीं तरी व्यवस्था करावी. २२