पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/202

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणेचे मार्ग くく、9

  • सामाजिक सुधारणेचे मार्ग

सुधारणेचे निरनिराळे मार्ग असल्यामुळे मतभेद कसा होतो याबद्दल रा० ब० रानडे यांनीं सामाजिक परिषदेच्या वेळीं जें भाषण केलें होतें, त्यावर आणि डॉ० भांडारकर यांनीं अध्यक्ष या नात्यानें जें भाषण केले होतें त्याबद्दल आमचे जे कांहीं विचार होते त्यापैकी काहीं विचार गेल्या अंकी दिले आहेत. आमचे सुधारक म्हणतात त्याप्रमाणें सामाजिक सुधारणा झाल्याखेरीज राजकीय हक्कास आम्ही पात्र होत नाहीं वगैरे डॉ० भाडारकर याच्या भाषणात जी काहीं वाक्यें आहेत ती समंजसपणाचीं आहेत असें आम्हीं लिहिलेंच आहे. यावरून एवढेमात्र सिद्ध होतें कीं, ही सुधारक मंडळी प्रसंग पडल्यास आपल्या हट्टाकरिता राजकीय चळवळीत व्यत्यय आणण्यास मार्गेपुढे पाहणार नाहीत. हिंदुस्थानचे राज्य आमच्या हवाली करा, असें इंग्रजसरकारास सागण्याचा कोणत्याही राजकीय चळवळीच्या पुरस्कत्यांचा हेतु नाहीं. अ. म्हास प्रस्तुतच्या राज्यपद्धतींत जे फेरफार पाहिजे आहेत, ते अशा प्रकारचे आहेत कीं, त्याच्याशीं जातिभेदाचा किंवा दुस-या कोणत्याही सामाजिक प्रश्नाचा म्हणण्यासारवा संबंध पॉचत नाही. असें असता अमुक एक सामाजिक सुधारणा आम्ही करू तरच आम्ही राजकीय हक्क मिळण्यास पात्र होऊं, अशा रीतीनें आपले मत प्रदर्शित करणे म्हणजे आधीच नाखुष असलेल्या सरकारास लोकाच्या मागण्या नाकबूल करण्यास उत्तेजन देण्यासारखें नव्हे काय ? आणि ते कशाकरिता तर आपली समाजसुधारणेची मते लोकानीं कबूल करावी म्हणून. म्हणजे समाज सुधारणेकरिता राजकीय सुधारणा अडकून राहिली तरी बेहेतर आहे, असेच म्हणण्यासारखे आहे. आम्हास हे म्हणणे अगदीं नापसंत आहे; व रा० ब० रानडे अथवा डॉ० भाँडारकर यासारखे विद्वान् गृहस्थ जरी त्या मताचे असले तरी जेौंपर्यंत ते मत आम्हास सयुक्तिक अथवा हितकारक वाटत नाहीं तोपर्यंत आमची प्रत्यक्ष किंवा परोक्ष त्या मतास संमती देणे म्हणजे आम्हीं आपल्या कर्तव्यास विसरण्यासारखेच आहे. न्या ० रानडे अथवा डाँ० भाडारकर यांच्या विद्वतेबद्दल आम्हासही त्याच्या अनुयायींप्रमाणेच अभिमान वाटत आहे. पण याच्यासारख्या विद्वानानीं २५॥३० वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उपक्रम केला, त्यांचा पाया चागल्या तत्त्वावर रचला गेला आहे, अशी आमची समजूत नसल्यामुळे आम्हांस त्याच्या कृतीचे वास्तविक स्वरूप लोकांपुढे मांडावें लागतें त्यास आमचा नाइलाज आहे. इंग्रजी राज्याच्या आरंभीं पाश्चात्य शिक्षणामुळे एकदम जे मनोविकार जागृत झाले त्यापैकी काहींकांचा जोर गेल्या २५॥३० वर्षात बराच कमी झालेला आहे. आमचा धर्म अगदीं टाकाऊ आहे, आमची समाजरचना अगदीं चुकीची आहे, वर्णव्यवस्था सर्वाशीं गैरफायद्याची व द्वैधीभाव वाढविणारी आहे, आणि

  • ( २८ जानेवारी, १८९६)