पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/206

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणेचे मागे १९१ जात, आणि इतर ठिकाणीं कोणीं केोणत्याही शास्राचा अभ्यास केला असल्यास त्याच आपल्या विद्वतेची व गुणाची परीक्षा घेण्यास या नामांकित क्षेत्रांतून जार्वे लागत असे. तात्पर्य, अनेक शास्रांचा व विद्यांचा रात्रदिवस जेथे खल चाललेला आहे असे आश्रम जुन्या काळीं या देशांत पुष्कळ ठिकाणीं आढळून येत असत. बुद्ध लोकांचा काळ हिंदुस्थानच्या इतिहासांत अर्वाचीन समजला होता, पण त्या कालींही नालंदप्रमाणें मोठमोठीं विद्यामेदिरें बाधली होतीं; व तेथे शकडों विद्यार्थी आपला विद्याभ्यास पुरा करून देशभर जात असत. शास्त्राचा अभ्यास सतत व मनन करणारे पुष्कळ विद्वान् ज्या ठिकाणीं राहतात व त्याची किर्ति ऐकून दूरदूरचे शेकडो विद्यार्थीं विद्यार्जनाकरितां जेव्हा त्याजपाशीं येतात तेव्हां एखाद्या स्थलास विद्यापीठ, विद्यामदिर, अथवा विद्याश्रम ही संज्ञा प्राप्त होते. हल्लीं सुधारलेल्या राष्ट्रांतूनही हाच प्रकार आढळून येतो. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, अथवा अमेरिका या देशांत ज्या युनिव्हसैिट्या आहेत त्या वर सागितल्याप्रमानेंच विद्येचीं माहेर घरें आहेत असें म्हटले तरी चालेल. लोकांनीं तयार केलेल्या विद्याथ्यांची परीक्षा घेऊन आपले काम भागले असे सुधारलेल्या राष्ट्रातील युनिव्हर्सिट्यास वाटत नाहीं. शास्रांचा अभ्यास उत्तरोत्तर वाढत जावा, व प्रत्येक शास्त्रात काहींना तरी नवीन शेोध व्हावा या हेतूनें त्या स्थापन झाल्या असतात; व तो हेतू तडीस नेण्याकरिता चांगल्या रीतीनें निर्वाह चालेल, असें वेतन देऊन बरेच विद्वान् गृहस्थ या युनिव्हर्सिट्यातून त्याची योग्यता पाहून केवळ विद्यावृद्ध करण्याच्या इराद्यानें ठेविलेले असतात. अशा प्रकारचीं विश्वाविद्यालये असलीं म्ह्णजे शास्त्रास उत्तजन येऊन विद्येची अभिवृद्धि कायमची होत असते. अलीकडे पदार्थविज्ञान शास्राचा अभ्यास मानसिकशास्त्रापेक्षां विशेष जारीर्ने सुरूं आहे,करितां मोठमोठया विद्यालयातून या शास्राभ्यासास लागणारी यंत्नसामुग्रीही या विद्यालयातून भरपूर ठेवावी लागते. अशा प्रकारची विश्वविद्यालये अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, वगैरे देशांत आहेत हें वर सागितलेंच आहे; व त्याचेच अनुकरण करून आमच्या देशांत आमच्या दयाळू सरकारनें युनिव्हर्सिटया स्थापन केल्या आहेत, अशाकरिता कीं, पाश्चात्य विद्याची व कलाची आम्हांस अभिरुचि लागून आमच्यापैर्की बुद्धिमान् लोकांनीं ज्ञानसंपन्न होऊन इतरास देशी भाषेच्या द्वारें आपल्या ज्ञानाचा फायदा करून द्यावा.हिंदु लोकांस प्राच्यावद्या शिकवाव्या कीं,पाश्चात्य विद्या शिकवाव्या याच्याबद्दल मकॅलेिसाहेबांच्या वेळी मोठा कडाक्याचा वाद होऊन अखेरीस युरोपियन लोकांच्या शास्रांचे आम्हास अवश्य ज्ञान करून दिले पाहिजे, असा निर्णय ठरविण्यांत आला; व त्या ठरावाप्रमाणे प्रत्येक इलाख्यांत विश्वविद्यालयाची स्थापना होऊन त्यांत अनेक विषयांत विद्याथ्यांच्या परीक्षा घेण्याचे काम सुरू होऊन परीक्षेत पास झालेल्या गृहस्थास विशिष्ट पदव्या मिळू लागल्या. येथपर्यंत सर्वे ठीक झाले; परंतु गेल्या पन्नास वर्षाच्या अनुभवावरून आतां असे दिसून येत आहे कीं, दुधाने ज्याप्रमाणें ताकाचे अनुकरण करावयाचे त्याप्रमाणे युरोपियन