पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/214

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमच्या बुद्धीस खरोखर उतरती कळा लागली आहे काय ? १९९ गोखले यांनीं साहस केलें असें आमच्यार्ने म्हणवत नाहीं. आमचा अलीकडे विद्याथ्याशीं फारसा निकट संबंघ नाहीं तत्रापि आम्हासही मि. गोखले यांच्यासारखा वारंवार भास होतो. आम्हाजवळ जितका पुरावा असावा तितका नसल्यामुळे नुसता भास होतो असे म्हणूनच आजपर्यंत आम्हीं आपलें समाधान केलें; व पुढेही बहुतवर्षे असेंच समाधान करावे लागेल. मि. गोखले यानीं मंडलीक, कुंट, परमानंद, तेलंग, रानडे, भाडारकर व मेथा वगैरे बड्याबड्या धैडाच्या नावांचा उच्चार करून आपल्या श्रोत्यास इल्लीच्या विद्यार्थीमडळात असे पुरुष का दृष्टीस पडत नाहीत असा प्रश्न केला आहे. आपले विधान सिद्ध करण्याची ही पद्धत आम्हांस अगदी नापसत आहे. एक दोन ठळक पुरुष दिसले म्हणजे पूर्वीच्या लोकाची बुद्धिमत्ता मोठी होती असे म्हणणें हें न्यायास अनुसरून नाही; कारण सर्व पिढीत एखादा बुद्धिमान् पुरुष निघत असतो. परंतु त्याजबरोबर लक्षावधि शंखशिरोमणि असतात त्याचा विचार कोणी करीत नाही. न्यायमूर्ति रानडे याच्या मागे शंभर वर्षांत त्याच्या तोडीचा मनुष्य दृष्टीस । पडेल काय ? हल्लीं एकनाथ, वामन, तुकाराम, मोरोपंतासारखे कवि निर्माण होत नाहीत म्हणून हल्लीचे लोक बुद्धीने नादान असे म्हणता कामा नये. जुन्या विद्याथ्यांचा अभ्यासक्रम निराळा, त्यास आलेले प्रसंग निराळे, किंबहुना त्याची राहणी निराळी हल्लीच्या विद्याथ्योच्या भेवतालची वस्तुस्थिति अगदींच बदलून गेली आहे. हल्लींचा विचार इतकाच आहे कीं, सरासरीच्या मानाने इल्लीच्या विद्याथ्यांची बुद्धिमत्ता पूर्वीच्या लेोकाहून कमी आहे की काय ? आम्हास या विषयासंबंधाने जो भास होतेो तो वर नमूद केलाच आहे. आम्हीं जरी भास हा शब्द वापरला आहे तत्रापि तो अगदींच निराधार आहे असे नाही. लेंटिन भाषेत अशी एक म्हण आहे की, ** जर शरीर सदृढ असेल तर बुद्धीही तरतरीत असावयाची ' आणि ह्याच म्हणीचे रहस्य ह्या विषयाच्या मुळाशी आहे.न्यायमूर्ति रानडे यांनी सुशिशित लोक अल्पवयी मरतात ह्याचे कारण त्या ची गरीबी असे दाखविले आहे.तेच कारण ह्या विषयास लागू असावे. आमच्या लोकाचा जो अनेक बाजूंनी एक प्रकारचा उहास होत आहे तोच प्रकार त्याच्या बुद्धीस कां लागूं होऊं नये ? आमच्या विद्याथ्यांस खावयास नाहीं, आमचे विद्यार्थी नेहमीं जें अन्न खातात तें निःसत्त्व असतें हें जगजाहीर आहे; तेंही कित्येक प्रसंगीं वेळेवर मिळण्याची मारामार पडतें. साधारण असा नियम आहे कीं, तरुणाचे हाडपेर बावीस वर्षापासून पसतीस वर्षापर्यंत भरत असतें. त्या वेळेसच त्याजवर शरिराची वाढ खुटण्यासारखी दुस-या प्रकारची जबाबदारी येऊन पडते. खाण्यास अन्न चांगले नसतें, त्यातच संसाराची सुरवात होते; आणि त्याच सुमारास बिकट अभ्यास करण्याचा त्यास प्रसंग येऊन व परीक्षाची काळजी लागून त्यांचे रक्त अांतल्याअांत जळून जातें. हल्लींच्या अभ्यासाचे दडपण इतकें कहीं मोठे आहे कीं, चागला विद्यार्थी देखील त्याखालीं दडपून जातो. नवीन नियमाप्रमाणें