पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/224

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २ ०९ एकदां गृहीत धरले व चेोहोंपैकीं तिहींची अयथार्थता दाखविली म्हणजे युक्लिडच्या पद्धतीनें चैौथे कारण सिद्ध होर्ते अशी प्रि. गोळे याच्या मनाची यथार्थ समजूत असल्यामुळे त्यांनी हा अनुमानविधि पुस्तकांत घातला असावा हें आम्ही जाणून आहों; व या अनुमानपद्धतींत चूक काढणे अशक्य आहे हेही आम्हांस माहित आहे. चेोहोपैकीं तीन कारणाचे निरसन झाल्यानें चौथे कारण आपोआपच फलित होतें हें खरे आहे. प्रश्न काय तो येवढाच कीं, कारणाची संख्या चार आहे कीं चेोहोंपेक्षा अधिक आहे, चार असल्यास प्रि. गोळे याचे अनुमान बरोबर आहे; व नसल्यास ज्या पायावर इमारत उभारली तेो पायाच मजबूत नसल्यामुळे शेवटचे अनुमान एक देशीयत्वाच्या दोषानें दुष्ट झालेले आहे असे म्हणणें भाग पडतें. ब्राह्मणवर्गाच्या व्हासाचे खरें कारण बालविवाहादि रूढ चाली होत असें जें सुधारकवर्गाचे म्हणणें आहे ते एकदशीय म्हणून प्रेि. गोळे यांनी ज्याप्रमाणेंच सदर उहासाचे कारण दुष्ट शिक्षणक्रम असें प्रेि. गोळे याचे मत आहे तेंही आमच्या दृष्टीनें एकदेशीय म्हणून त्याज्यच आहे. हा शिक्षणक्रम होईल तितका सुधारणें हें प्रत्येकाचे कर्तव्यकर्म आहे; व तो सुधारण्याकरिताच जर प्रि. गोळे यानीं प्रस्तुतचा ग्रंथ लिहिला असेल, व त्याबद्दलचा विचार करण्यास लोकांनीं लागार्वे म्हणून ब्राह्मणवर्गीच्या उहासाचे मुख्य कारण शिक्षणक्रम आहे असा बाऊ दाखविला असेल तर त्याबद्दल आमचे काहीं म्हणणें नाहीं. शिक्षणक्रम सुधारण्याच्या कामी त्याची आमची एकवाक्यता आहे; मात्र त्यामुळेच सद रील व्हास झाला असें आम्हास वाटत नाही. अामच्या येथील शिक्षणक्रम पंधरा वीस वर्षापूर्वी इंग्लंड, जर्मनी, अमेरिका वगैरे राष्ट्रातही शेकडों वर्षे चालू होता; तो सुधारण्याची कल्पना पचवीस तीस वषांतली आहे, व तीही युरोपातसुद्धा अद्याप पूर्णपणें अमलांत आली नाहीं. असे जर आहे तर तो शिक्षणक्रम युरोपात शैकडों वर्षे चालू - सूनही ज्यानें तेथील लोका-या बुद्धीचा -हास झालेला नाही, त्याच शिक्षणक्रमाने तीस चाळीस वर्षात ब्राह्मणवगीच्या शरीराचे व मनाचे पीठ झालें हें म्हणणें असमंजसपणाचे आहे. साराश, प्रेि. गोळे यानीं या मोठ्या महत्त्वाच्या प्रश्नाचा अगदीं एकदेशीय विचार केला आहे; व हाच त्याच्या ग्रंथावर मोठा आक्षेप आहे. ब्राह्मणाखेरीज इतर वगीतील लोकाचा शारीरिक व मानसिक व्हास होत आहे की नाहीं, व होत असल्यास तो कोणत्या कारणानें हेातो, इतर प्रातांतील अगर इलाख्यातील ब्राह्मणवर्गाची इल्लीं काय स्थिति आहे; तिची व आमच्या स्थितीची तुलना करितांना आमच्या -हासाचीं जीं कारणें दिसतात तीं सामान्य आहेत किंवा आम्हासच विशिष्ट रीतीने लागू पडतात; आमची पूर्व स्थिति इतर इलाख्यातील ब्राह्मणाच्या पूर्वस्थितीपेक्षा अधिक योग्यतेची होती की काय, इत्यादि पुघ्कळ महत्त्वाचे प्रश्न प्रस्तुत प्रकरणीं उपस्थित होतात; पण त्यांपैकी एकाचाही प्रि. गोळे यानीं विचार केलला आमच्या २६