पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/228

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांचा विद्या. २१३ फारसें महत्त्व नाही असें त्या प्रातातून वर वर फिरून आलेला गृहस्थही सांगू शकेल. उत्तर हिंदुस्थानांत कायस्थ म्हणून एक कारकुनीपेशांच्या लोकांचा वर्ग आहे. पण महाराष्ट्रात ब्राह्मण लोकास मराठेशाहीत जें उत्तेजन मिळालें तें मुसलमानी राज्यात या कायस्थ लोकांस न मिळाल्यामुळे त्याची योग्यता महाराष्ट्र ब्राह्मणाइतकी इंग्रजी राज्याचे आरंभीं वाढलेली नव्हती. अर्थात् इंग्रजी राज्यपद्धतीमुळे आमची योग्यता कमी झाली असें आम्हास वाटते तितकें त्यास वाटत नाहीं. आतां इतर प्रांतातून ब्राह्मणाशवाय दुस-या वर्गीची सध्याची स्थिति पाहिली तरीही वर सांगितल्याप्रमाणेच अनुमान निधल रजपूत, शीख या जातीतून प्रि. गोळे याच्या मतानें मारक ठरलेल्या शिक्षणक्रमाचा अद्याप प्रसार झालेला नाही. तरीही पण या ज्ञातीतून पूर्वीचा उत्साह अगर कर्तबगारी असलेली आढळून येत नाहीं. मराठी लोकापेक्षा शरीरानें धिप्पाड असे उत्तर हिंदुस्थानात पुष्कळ लोक आहेत. पण उत्साह, धैर्य, साहसप्रियता, हिंमत अथवा कर्तबगारी या गुणासंबंधार्ने पाहिलें तर त्याचा बहुतक पूर्ण अभावच या लोकात आढळून येतो. हिंदुस्थानासारख्या उष्ण कटिबंधातल्या देशात थंड हवेतील देशांपेक्षां स्वभावत:च उत्साह कमी असणार हें स्वाभाविक आहे, व इंग्रजी राज्यापूर्वी काहीं ज्ञातति जो थोडाबहुत उत्साह होता तोही आता गैर अभ्यासानें बहुतक नाहींसारखा झाला आहे. चोहोकडे हीच स्थिति आहे. व त्याचे मृळ कारण शिक्षणक्रम नव्हे, अथवा विधवाविवाहप्रतिबंधही नव्हे. इंग्रजांनी येथे आपलें राज्य कसै स्थापिले व त्यास आमच्यामधील कोणत्या दोषाचे साहाय्य मिळालें हैं सागण्याचा आजचा प्रसंग नाहीं. प्रस्तुत विषयाचा विचार करिताना आपणास येवढेच पाहणे आहे की, महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्गीच्या उत्साहाचा जो व्हास झालेला आहे तो तेवढ्या वर्गापुरताच आहे किवा एकदर देशातही अशीचे निकृष्टावस्था आलेली आहे, अशा दृष्टीने पाहिले म्हणज वर लिहिलेल्या विवेचनावरून आपणास असे आढळून येईल की, हिंदुस्थानातील सर्व प्रातातील व सर्व जातींतील लोकास सारखीच निकृष्टावस्था प्राप्त झालेली आहे; व त्याचे प्रधान कारण म्हणजे परराज्य होय; कोणत्याही राष्ट्रातील लोकाच्या उत्साहबुद्धीवर परवशतेचा किती भयंकर परिणाम घडतो इकडे प्रि. गोळे यानीं जर नीट लक्ष पुरविले असते तर देशातील एकंदर लोकाच्या उत्साहशून्यतेचे खरे कारण त्यास तेव्हांच कळून आले असतें पण तसा विचार त्याच्या ग्रंथात कोठेही केलेला नाहीं इंग्रजी राज्यात रार्व लोकांस शातता आणि सौख्य मिळत आहे हें म्हणणे काहीं अंशीं खरें आहे. पण एकोणिसाव्या शतकातील सुधारलेल्या ह्या परकीय प्रभूची राज्यपद्धति अशी काही विलक्षण आहे की, त्यानीं हिंमतीची, शौर्याची, बुद्धिचीं, कल्पनेचीं, कारागिरीचीं अथवा कर्तबगारीची सर्व कामें आपल्याच हातात ठेविलीं आहेत. ही त्यांची राज्यपद्धति त्यानीं इतकी जारीने सुरू ठेविली आहे की नेटिव कितीही हुषार असला तरी त्यास मोठ्या कर्तबगारीचे काम