पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/234

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २१९ होईल तितका प्रयत्न आम्हीं केला पाहिजे याबद्दल त्यांची व आमची एकवाक्यता आहे. मतभेद काय तो ब्राह्मणांच्या -हासांचे मुख्य कारण कोणतें याबद्दलचाच आहे. आम्हीं सांगितलेलें कारण हल्लींच्या स्थितींत तरी अपरिहार्य आहे हें आम्ही जाणून आहों. तथापि खरें कारण कळल्याखेरीज चांगल्या उपायांची योजना करतां येत नाहीं, किंबहुना चांगलें उपाय शेोधून काढण्यास खरीं कारणें-मग ताँ परिहार्य असोत या अपरिहार्य असोत-समजणे अवश्य आहे अशा समजुतीवर ताँ आम्हीं येथे दाखल केली आहेत. तीं कारणें लक्षात ठेऊन आम्हास आमची स्थिति सुधारण्यास जे कांहीं इलाज करावयाचे असतील ते केले पाहिजेत. बालविवाह बंद करा, गतभर्तृकांचीं लमें लावा, अथवा शिक्षणक्रम प्रि. गोळे म्हणतात त्याप्रमाणें बदला. तेवढ्यानें देशावर हल्लीं आलेलें औदासिन्य नाहीसे होईल असे आम्हांस वाटत नाहीं. वर सागितलेल्या उपायांनी काहींच होणार नाहीं असें नाहीं. सद्बुद्धीनें कोणतेंही काम केले तरी त्यापासून काहींना काहीं तरी फायदा होतोच होतो; व तसा शिक्षणक्रम सुधारल्यापासूनही होणार आहे. पण तेवढ्यार्ने आपला इष्ट हेतु साध्य होणार नाही. तो तडीस जाण्यास दुसरे काहीं उपाय योजिले पाहिजेत, ते केोणते ते पुढील खेपेस सांगूं. [ नंबर ४ ] आजपर्यंत केलेल्या विवेचनावरून प्रि, गोळे याचा विचारक्रम किती कोता व गैरसमजाचा आहे हें दिसून येईल. ब्राह्मण किंवा विद्याव्यासंगी वर्गाच्या अवनतीचीं मूळ कारणें ज्यास शेोधून काढावयाची असतील त्याने आपली दृष्टि न्यूस्कूल किंवा फग्र्युसन कॉलेजच्या चार भिंतीपलीकडे बरीच लांबवर पोचविली पाहिजे. ब्राह्मण लोकात अवलोकन शक्तीचा उहास झालेला आहे असें प्रेि. गोळे याचे म्हणणे आहे; व ब्राह्मण आणि त्याची विद्या हें पुस्तक पाहिले म्हणजे प्रि. गोळे याचे म्हणणे खरें असावें असेंही वाटू लागते. एरव्ही एका मोठ्या खाजगी विद्यालयाच्या प्रधानाध्यापकाकडून हल्लीं हिंदुस्थानांत परकीय राज्यामुळे सर्व प्रांतांत सर्व जातींची कोणत्या प्रकारची पायमल्ली होत आहे इकडे दुर्लक्ष झालें नसतें. प्रि. गोळे हे विद्वान् व विचारी आहेत हें ठिकठिकाणच्या त्यांच्या मार्मिक टीकेवरून उघड होतें; पण नेहमीच्या पाहण्यातील दहा पाच गोष्टीची मार्मिक चर्चा केल्यानें, अथवा लोकांस न रुचले तरी आपले विचार निभाँडपणें लेोकापुढे मांडण्याचा आव घातल्यानें कोणत्याही विषयाचा सांगोपांग उहापोह होतो असें नाहीं. परवशतेपासून राष्ट्रावर कोणत्या प्रकारचे वाईट परिणाम होतात हें प्रि. गोळे यांस माहीत नाहींसें नाहीं. पण शिक्षणक्रमातील दोषावर लिहिलेल्या ग्रंथांस भपकेदार नांव देऊन नाकापेक्षां मोतीं जड या न्यायानें त्यांनी आपल्या ग्रंथास विनाकारण उपहासास्पद करून घेतले आहे. नुसत्या स्पष्टीक्तीनै अथवा लोकांस न आवडणारीं कृत्र्ये करण्यानें जर शहाणपण येत असेल तर उद्या एखाद्या