पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/238

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २२३ हा विरोध टाळून सर्व जातींस आपापली स्थिति सुधारण्यास लावणे हें आमचे कर्तव्य आहे; व आम्हीं जो कांहीं उद्योग करणार तो हें लक्षांत ठेवूनच केला पाहिजे. एकाच ज्ञातीनें किंवा एकाच प्रांतांतील लोकांनीं सर्व हिंदुस्थानभर आपले वर्चस्व स्थापण्याचे आतां दिवस राहिले नाहीत. मराठेशाहीच्या काळांत व हल्लींच्या काळांत मोठा फरक आहे तो हाच हेोय. त्या वेळीं एकट्या मराठे लोकांनीं सर्व प्रांतांवर आपले स्वामित्व स्थापण्याचा प्रयत्न केला होता तसा प्रयत्न होणें आतां शक्य नाहीं. जे काहीं करावयाचे असेल तें सवै जातीकरिता व सर्व प्रांतांतलि लोकांकरितां. त्यांस बरोबर घेऊन त्यांच्या साहाय्यानेंच केले पाहिजे. परंतु असें झालें तरी ज्या जातीनें आजपर्यंत राजकारणांच्या कामात पुढाकार घेतला आहे, त्याचे महत्त्व कमी होतें असें मात्र समजूं नये. शंभर वर्षांपूर्वी दक्षिणेतील ब्राह्मणांनी इतर प्रात काबीज करण्याचे कामी आपले शौर्य व साहस प्रगट केले होतें. आतां तसे करता येणार नाही हे खरै; तथापि कोणत्याही सार्वजनिक हिताच्या कामी पुढाकार घेऊन ती चळवळ सर्व राष्ट्रभर पसरण्याचे काम महाराष्ट्रातील ब्राह्मणांनीच अंगावर घेतलें पाहिजे. ज्ञातीज्ञातींत जे विशिष्ट गुण आहेत त्याचा एकमेकावर वरचष्मा करण्याच्या कामी उपयेोग न करिता सर्वोचे जेणेकरून हित होईल त्याच कामांत उपयेोग केला पाहिजे; व अशा रीतीने सार्वजनिक कार्मे चाललीं तरच सर्व लोकांची एकी होण्याचा संभव आहे. सारांश, आजपर्यंत शिकलेल्या इतर ज्ञातीतील किंवा प्रांतांतील लोकांशीं विशेष दळणवळण न ठेवतां सरकारची नौकरी पत्करून सार्वजनिक कामात चळवळ करण्याची जी वहिबाट ठेविली आहे ती सोडून स्वतंत्रतेनें व रयतेबद्दल खरी कळकळ बाळगून त्यानीं या उद्योगास लागले पाहिजे. कोणत्याही लोकाचा प्रत्येक देशात एक विशिष्ट वर्ग असतो; व हिंदुस्थानातील तसा वर्ग म्हटला म्हणजे ब्राह्मण लोक होत. वर सागितलेल्या तर्व गोष्टी लक्षात आणून राजकीय कामात पुढाकार घेणें हें त्यांस भूषणास्पद आहे इतकेच नव्हे, तर त्याचे मुख्य कर्तव्य आहे असें आम्हास वाटत; व म्हणूनच प्रि. गोळे यांनी असल्या कामात पडणाच्या लोकांचा जो उपहास केला आहे तो अगदीं पोरकट व आविचाराचा आहे असें आम्ही म्हणतों. ( नंबर ५. ) ब्राह्मण लोकांमध्यें पूर्वीप्रमाणें नैसर्गिक तेज अथवा कर्तबगारी उत्पन्न होण्याकरितां केवळ शिक्षणक्रमांत सुधारणा करून उपयेोगी नाहीं, अथवा प्रि. गोळे यांनीं सागितल्याप्रमाणे सार्वजनिक चळवळीत न पडूनही चालणार नाही, असें या विषयांवरील शेवटच्या लेखात दाखविलेंच आहे. राज्यक्रांतीमुळे म्हणा किंवा अन्यकारणामुळे म्हणा, आमच्यामर्ते राज्यक्राति व नवीन प्रचारांत आलेली राज्यपद्धति हेच मुख्य कारण आहे. दक्षिणेतील ब्राह्मण अगर पाढरपेशे लोकांमधील स्वाभाविक तेज पुष्कळ कमी झाले आहे ही गोष्ट प्रि. गोळे यांच्याप्रमाणें