पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/253

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

スまく लो० टिळकांचे केसरींतील लेख विचारांचा असला तरी वाचण्याजोगा झालेला आहे असे म्हणण्यास आम्हांस कोणतीच हरकत दिसत नाहीं, प्रेि. गोळे यांचे विचार आम्हांस मान्य नसले तरी ते एकदा वाचण्यासारखेही नाहींत असे आम्ही म्हणत नाहीं. हेच विचार याहीपेक्षा व्यवस्थित रीतीनें प्रि. गोळे यांस लोकापुढे माडता आले असते, परंतु नसते विषय मध्ये आणून सर्व पक्षांच्या व विचाराच्या लोकाची टवाळी करण्याची जी ग्रंथकाराची बुद्धी आहे त्यामुळे विसगतता, अप्रासंगिकता व अप्रेोयजकता या त्रिदोषानें या ग्रंथाची किमत बरीच कमी झालेली आहे हे दोष काढून टाकून जर प्रि. गोळे शास्रीय पद्धतीनें एखाद्या विषयाचे आमूलाग्र विवेचन करतील तर त्यांचा ग्रंथ इतका चटकदार न झाला तरी अधिक उपयुक्त व विचारणीय होईल अशी आमची खात्री आहे. ही सूचना प्रेि. गोळे यास पसंत पडेलच असें आम्ही सांगू शकत नाहीं; तथापि ती करणें आमचे कर्तव्य आहे. करितां त्याबद्दल जर प्रिन्सिपालसाहेबास वाईट वाटत असेल तर त्याची माफी मागून व आज पांच सात आठवडे त्यानीं आपल्या ग्रंथाने आमचे विचार लेोकांस कळविण्याची आम्हांस जी संधि दिली त्याबद्दल त्याचे आभार मानून हैं त्याच्या ग्रंथातील प्रमुख मुद्दयाचे स्वल्प परीक्षण पुरै करितीं. taeaaaaaaaaaaasw, sesaana.

  • अज्ञेयवाद.

आमचे मित्र रा. रा. नारायण लक्ष्मण फडके बी. ए. यांनाँ स्पेन्सरसाहेबांच्या ग्रंथाच्या आधार मराठींत अज्ञेय मीमासा या नावाचा तयार केलेला ग्रंथ सदर ग्रंथाचे प्रकाशक रा. रा. दाभोळकर याचेमार्फत आमचेकडे येऊन दोन तीन महिने झाले. परंतु दुस-या विषयांच्या गदींमुळे त्या ग्रंथाकडे वळण्यास आम्हांस आतापर्यंत फुरसद झाली नाही. ग्रंथाचे बाह्यस्वरूप रा. रा. दाभोळकर यांच्या उपयुक्त ग्रंथमालेतील इतर ग्रथाप्रमाणेच सुबक झालेले आहे; व एकंदरीत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथमालेस हल्लींचा ग्रंथ पूर्णपणे समजण्यासारखा झाला आहे. रा. रा. फडके यांनी ग्रंथाच्या अखेरीस हर्बर्ट स्पेन्सर यांचे स्वल्प चरित्र जोडलें असल्यामुळे हा ग्रंथ अधिक उपयुक्त झालेला आहे. ग्रंथाची भाषा विषयानुरोधानें कठीण असावयाचीच; परंतु त्यातलेत्यात ती सुगम होण्याचा जितका करवेल तितका प्रयत्न रा. रा. फडके यांनी केलेला आहे. जगात ज्या ज्या वस्तु आपणांस इंद्रियगोचर होतात त्यांचे यथार्थज्ञान होणें आपणास अशक्य आहे, हें अलीकडील पदार्थविज्ञानादि शास्रांच्या आधारानें सिद्ध केलेले ज्यास पहावयाचे असेल त्यास हा ग्रंथ वाचून पुष्कळच फायदा होईल हे सांगावयास नकोच. आपणास जगाचे जें ज्ञान होत आहे तें कोणत्या प्रकारचे आहे याचा स्पेन्सर साहेबानीं जसा अलीकडील

  • { ता. ११ ऑगस्ट १८९६).