पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/254

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अज्ञेयवाद. २३९ शास्रास धरून सूक्ष्मरीतीनें विचार केला आहे तसा आमच्या जुन्या ग्रंथांत नाहीं, हें आम्हांस मान्य आहे. पण दिक्कालादि पदार्थांच्या अज्ञेयत्वाची उदात्त कल्पना आमच्या मनावर ठसवून देण्यास स्पेन्सरसाहेबांच्या ग्रंथांचीच आमच्या लोकांस जरूर आहे असें आम्हास वाटत नाहीं. यासंबंधानें रा.रा.फडक्यांचा आमच्याबद्दल थेोडासा गैरसमज झाला आहे तोही येथे दूर केला पाहिजे. रा. रा. फडके यांनीं या ग्रंथाच्या शेवटी जेोडलेल्या हर्बर्ट स्पेन्सर थाच्या चरित्राचा उपोद्घात केसरीकार ध्या, सुधारककार ध्या किंवा मलबारी शेट घ्या त्या सर्वोस स्पेन्सर साहेबांची मर्त सारखीच मान्य आहेत. “ नामदार टिळक यांचा या बाबतीत कै. आगरकराशीं कांही मतभेद होता अगर असेल तर तो स्पेन्सरसाहेबांच्या विचाराच्या याथाथ्यांबद्दल किंवा अयाथाथ्यांबद्दल नव्हे; तर प्रस्तुतकालीं व प्रस्तुतस्थितींत ते आपणास किती व किती प्रमाणाने लागूं करितां येतील याबद्दलच होता किंवा असेल. ’ रा. रा. फडके यानीं आमच्याबद्दल हा जेो अभिप्राय दिलेला आहे तो चुकीचा आहे असे त्यास कळविणें भाग आहे, यापैकीं पहिल्या भागांत स्पेन्सरसाहेबांचीं मर्त आम्हां दोघांसही यथार्थ वाटतात असे लिहिले आहे तें अगदी बरोबर आहे; परंतु पुढे जेो भद दाखविला आहे तो मात्र वास्तविक नाहीं. अमचे मित्र कै, आगरकर अथवा सुधारकाचे प्रस्तुतचे एडिटर याच्या व आमच्यामध्ये जर काही मतभेद असला तर तो रा. रा. फडके समजतात त्यापेक्षां निराळ्या तच्हेचा आहे. आमचे असें म्हणणे आहे कीं, स्पेन्सरसाहबांच्या अज्ञेयसिद्धान्ताचे आमच्या बंधूस जितकें महत्त्व वाटते तितके हिंदुस्थानात जन्मून आम्हांस वाटण्याची जरूर नाहीं. **यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' अशा रीतीने आत्म्याची व्याख्या ज्या लोकांच्या ग्रंथातून केलली आहे त्यास जगाच्या मूळाशीं काही अज्ञेय आहे त्याचे स्वरूप कळले नाहीं तरी त्याचे अस्तित्व कबूल करावें लागतें; अर्थात् तें सत् आहे, व शास्र व धर्म यांची या बाबतीत एकवाक्यता होण्याचा संभव आहे, हीं तत्त्वें सांगण्यास स्पेन्सरसाहेबांच्या ग्रंथाची अवश्यकताच आहे असे आम्हास वाटत नाहीं. इंद्रियार्थ सन्निकर्षापासून झालेलें ज्ञान प्रत्यक्ष असतें व तसें प्रत्यक्ष ज्ञान“इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः । मनसस्तुपराबुद्धि र्यद्बुद्धेः परतस्तु सः । ” असल्या विषयाबद्दल होणे शक्य नाहीं हें तत्त्व आमच्या पूर्वीच्या वेदांत्यास दर्शनानुसाशन, पदार्थविज्ञानशास्र अथवा जीवनशास्र यांच्या साहाय्याने जरी सिद्ध करितां आले नसले तरी त्या तत्त्वाची त्यास इतकी पुरी ओळख पटली होती कीं, त्याबद्दल जास्त पुराव्याची त्यास यत्किचितही जरूर नव्हती; किंबहुना रपेन्सरसाहेबानीं या अज्ञेयवादास जें स्वरूप आणिले आहे त्यापेक्षाही परिणत स्वरूप आमच्या ग्रंथांतून या तत्त्वास प्राप्त झाले आहे, अशी स्थिति असतां दिक्कालादिकांनासुद्धां अनवछिन्न अतएव त्याच्या मुळांशीं असूनही स्वरूपतः अज्ञात अशा तत्त्वाचा केवळ स्पेन्सरच्या आधारावर आम्हास उपदश करूं पाहणें म्हणजे एक प्रकारें घरचे सोनें विसरून जाऊन लोकांच्या रुप्याकरितां धांव