पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/265

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨ ૧૦ लो० टिळकांचे केसरींतील लेख व शंकराचार्यानीं सांगितलेलें ब्रह्मस्वरूप निरस आहे असे म्हणण्याचा त्यांचा झोंक आहे; आनंदाच्या व्याख्यंतच जेथ मतभेद तेथे आनंदमय ब्रह्मस्वरूपाच्या समजांतही फरक झाल्यास त्यांत काहीं नवल नाहीं. यासंबंधानें भगवद्गीर्तेत पुढील लेक दिलेला आहे: विषया विनिवर्तेते निराहृारस्य देहिनः । रसवज्र्ये रसेोऽप्यस्य परंदृष्ट्र निवर्तते । यावरून आनंदमय ब्रह्मस्वरूपाची ओळख झाल्यावर * रस ? नाहींसा होतो असा भगवद्गीतेचा उघड आशय आहे. न्यायमूर्ति रानडे यांस तो रस पहावयास पाहिजे आहे, तेव्हां त्यांचे ब्रह्म याहून खालच्या पायरीचे आहे असे म्हणणें माग येतें. सरतेशेवटीं हिंदुधर्मातील तत्त्वविचार व खिस्ती धर्मातील तत्त्वविचार यांची जी त्यांनी तुलना केली आहे. त्यासंबंधाने दोन शब्द सागून त्याच्या व्याख्यानाचे हें परीक्षण संपवितों. खिस्ती धर्माचे बाह्यस्वरूप म्हणजे त्यांच्या मठांची व धर्मसंस्थाची व्यवस्था ही कांही अनुकरणीय आहे हें न्यायमूर्तीचे म्हणणें लक्षांत ठेवण्यासारखे आहे. श्रीशंकराचार्य अथवा रामदास यानीं जेव्हां धर्मसंस्थापना करण्याचे मनात आणिले तेव्हां निरनिराळ्या ठिकाणीं मठ स्थापन करून धर्मसंस्थाची त्यानी अगोदर व्यवस्था लाविली, हे इतिहासावरून आपणांप्त दिसून येतें. परंतु धर्माची खरी योग्यता केवळ धर्मसंस्थाच्या व्यवस्थेवर अवलंबून नसते हेही केवळ विसरतां कामा नये. ज्या धर्मात ईश्वर व जीव याच्या परस्परसबंधाचे अतिसूक्ष्म रीतीनें विवेचन झालेलें नाहीं तो धर्म कोणत्याही शिकलेल्या लोकात प्रसृत होण्याची आशा नको. खिस्ती धर्माची सांप्रतची स्थिति अशा प्रकारची आहे. साच्चदानंद या तीन प्रकारच्या स्वरूपाचे खिस्ती धर्मातील तीन गोष्टीशीं जें न्यायमूर्तिनीं साम्य दाखविले आहे तें पुष्कळच ओढून ताणून बसविलेले आहे. दारूस व भाकरीस खिस्ताच्या रक्तामांसाचे प्रतिनिधि बनविणें हें जीव आणि ईश्वर याचे ऐक्य मानण्यासारखेंच आहे असे म्हणणें आमच्या मतें अगदींच उपहास्यास्पद आहे. यापेक्षां याचे साम्य रानटी लोक आपल्या आवडत्या मनुष्यास मारून त्याचे मांस खातात याच्याशीं अधिक आहे, असें जें स्वामी विवेकानंदांनीं एके ठिकाणीं म्हटले आहे तें अधिक सयुक्तिक आहे. खिस्ती धमोत व हिंदुधर्मातील भक्तिमार्गात न्यायमूर्ति रानडे यांनीं असा एक दुसरा भेद दाखविला आहे कीं, खिस्ती घर्मोत एकच ग्रंथ ईश्वरप्रणीत मानला जातो. भागवत धर्मोत सर्वत्व धर्म व धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत मानतात आमच्या मतें हें विधान जरा चुकीचे आहे. भागवत धर्मातील लोक प्रार्थनासमाजातील लोकांप्रमाणे कुराण, बायबल आणि वेद हे सर्वच सारख्या योग्यतेचे मानून आपल्या विचाराप्रमाणें या सर्व ग्रंथांतील