पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/269

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ लो ० टिळकांचे केसरींतील लेख आम्हास वाटतें. पहिला भाग शिवाजीपूर्वीचा, दुसरा फक्त शिवाजीचा, तिसरा बाजीरावापर्यंतचा, चैौथा पानपतच्या युद्धापर्यंतचा आणि पांचवा नाना फडणीसाच्या मृत्यूपर्यंतचा. हे भाग कोणत्या तत्त्वावर आम्हीं केले आहेत हे वाचकांच्या सहज लक्षात येइल. आमच्या मते शिवाजीमहाराजांचा आणि त्यांच्या मार्गे संभाजी, राजाराम व शाहू याचा असे दोन निराळे काळ मानले पाहिजेत, परंतु हा भेद ग्रीन साहेबाच्या इग्लिश लोकाच्या इतिहासाप्रमाणे महाराष्ट्र लेोकांचा जर केोणी इतिहास लिहूं लागला तर त्या वेळी विचार करण्यासारखा आहे. यामुळे हल्लीच्या निबंधास काहीं कमीपणा येत नाहीं. बखरीवर ज्या टोपा दिल्या आहेत त्या अधिक काळजीनें द्यावयास पाहिजेत. उदाहरणार्थ, दुस-या अकांतील बावीस पानातील संस्कृत लेोकावरील टाप पहा. हा छीक रायगड येथील जगदीश्वराच्या देवळावर कोरलेल्या लोकाचा अपभ्रंष्ट पर्याय आहे, पण त्याबद्दल टीकेत काहीं उल्लेख नाहीं. शिवाजीमहराजांच्या पहिल्या अकात चैौथ्या पानांवर दिलेल्या जन्मतिथीसंबधानेंही टीपेंत दुस-या दोन तिथी इतरत्र दिल्या आहेत त्यांचा उल्लेख करावयास पाहिजे होता. मोडीचे बालबोध करतानाही कांहीं चुका झाल्या आहेत. उदाहरणार्थ अंक एक पृष्ट चार यात * भीमेनें उतार देऊन पलीकडे जल ’ असे आहे ते ** पलीकडे नेले ” असें पाहिजे. असेो, सरतेशेवटी लोकानीं या पुस्तकास अवश्य आश्रय देऊन मराठ्याच्या इतिहासाचीं साधनें अधिकाधिक उपलब्ध करण्याचे श्रेय संपादावें अशी त्यास विनंती करून व प्रकाशकानी आरंभिलेल्या उद्योगाबद्दल त्याचे अभिनंदन करून हा लेख पुरा करितो, विलायतेंत नुकताच सामाजिक सुधारणेसबंधानें जेो एक कायदा पास झाला तो मंजूर करिते वेळीं पार्लमेंट सभेत जो वादविवाद झाला त्याची प्रसिद्ध झालेली हकीकत वाचण्यासारखी आहे. विलायतॆत अमुक एका सभेनें किंवा अधिका-यानें ठरविलेली गोष्ट लोकानीं मान्य करावयाची, व त्याप्रमाणें निर्बध असू नये अशी कोणाची इच्छा असल्यास त्यानें लोकात चळवळ करून पुन्हा सभेकडून तो निर्बध फिरवून घ्यावा, व असा निबंध फिरवून घेईपर्यंत त्यार्ने सभेच्या पूर्वीच्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे अशी व्यवस्था असल्यामुळे आमच्याकडील सुधारकाप्रमाणें तिकडील सुधारकात बजबजपुरी मात्र नाहीं. सर्व कामें लोकांच्या प्रतिनिधीच्या बहुमतानेच अखेरीस निकालास लागतात, व तो निकाल सर्वास कबूल करावा लागतो. आपल्या इकडे मेलेल्या बायकेच्या बहिणीशीं लग्न करण्यास धर्मशास्राप्रमाणें कोणतीही अडचण नाहीं. कारण बाय