पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/284

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशोधन. २६९ व मद्रास येथेहि जुने व नवे असे दोन पक्ष होऊन कै. बापूदवशास्री व चिंतामणी रघुनाथाचार्य ह्यांनी केरोपंतांप्रमाणें दृक्तुल्य प्रत्ययाचीं नवीन पंचांगें या दोन्ही इलाख्यांत सुरू केलीं. केरोपंती पंचांग आणि या दोन्ही पंचांगांत अयनांश जरी निरानराळे मानले आहेत तरी सर्व हीं सर्व निरयण पंचागें आहेत व तंजावर येथील सुंदरेश्वर श्रेौती यांचे पंचांगही याच वर्गातले आहे हें ध्यानांत ठेविले पाहिजे. केरोपंती पंचांग प्रसिद्ध झाल्या दिवसापासून गेल्या ३६ वर्षीतलीं पंचांगासंबंधाची सामान्य स्थिति वर दिली आहे. इंग्रजी ज्योतिषग्रंथ आमच्याकडे लोकांस अवगत झाल्यावर कै० केरोपंत, चिंतामणी रघुनाथाचार्य किंवा बापूदेवशास्री यांच्यासारख्या प्रसिद्ध ज्योतिष्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला हें यावरून उघड होतें. ग्रीक व मुसलमानी ज्योतिषशास्त्राचे काहीं ग्रंथ वराहमिहिरादि प्राचीन ज्योतिष्यांच्या पहिल्यानें नजरेस पडल्याबरोबर त्यांच्या मनावर जो संस्कार झाला तो आणि केरोपंतादिकाच्या मनावर युरोपियन ज्योतिषग्रंथांचा जो परिणाम झाला तो यांच्यामध्यें पुष्कळ किंवा सर्वोशीं साम्य आहे असें म्हटलें तरी चालेल. ज्योतिष्यांचे दोन वर्ग आहेत. एक सिद्धान्तज्योतिषी आणि दुसरें पंचांगज्योतिषी. पैकीं पंचांगज्योतिषी हे ग्रहग्रतीचीं मार्ने किंवा वर्षमार्ने वगैरै सिद्धान्तांतील मूलभूत गोष्टींची कधीही चिकित्सा करीत नाहीत. ग्रह्लाघवासारख्या करणग्रंथात दिलेलीं मानें घेऊन सालीसालचीं पंचार्गे करणें एवढेच यांचे काम आहे. पण सिद्धान्तज्येोतिषी यांचा प्रकार निराळा आहे. प्रत्यक्ष वेधानें, सूर्य, चंद्र किंवा ग्रह यांची जी स्थिति येते ती पूर्वीच्या ग्रंथांतील मानें धरून गणितानें काढलेल्या स्थितीशीं जुळते कीं नाहीं हें पाहून ती जुळत नसल्यास पूर्वीच्या ग्रंथोक्त ग्रहगतीच्या मानात कांहीं फेरफार करून नवे ग्रंथ केले पाहिजेत कीं काय हें ठरविण्याचे यांचे काम आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्य ह्यांनी आपल्या ग्रंथांत हीच पद्धत स्वीकारून स्वकृत वेधास जुळतील अशीं मार्ने सिद्धान्तांत घेतलीं आहेत. भास्कराचार्य यांचा जन्म शके १०३६त झाले, तत्पूर्वी म्हणजे शके५२०सालीं जन्मास आलेल्या ब्रह्मगुप्तार्नेही आर्यभट्टाचे गणितास दोष दिलेले आहेत. व आपल्या सिद्धान्तांत ** ब्रह्मदेवानें सागितलेलै ग्रहगणित महान् काळ गेल्यामुळे खिळखिळे झाले आहे तें मी जिष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट करून सांगतों, ” अशी ग्रंथारंभीं प्रतिज्ञा केली आहे. ब्रह्मगुप्ताच्याही पूर्वीचे गर्गादि ग्रंथकार होत. ह्यांस यवनाचार्याचे ज्योतिषग्रंथ जेव्हां पहिल्यानें मिळाले तेव्हां त्यांतील ग्राह्यांश घेऊन आर्यज्योतिषांतील चुका दुरुस्त करण्यास त्यांनीं किमपि आळस केला नाहीं हें “ म्लेच्छा हि यवनास्तेषु सम्यक् शास्रमिदं स्थितं । ऋषिवते हि पूज्यंते किं पुनर्दैवद्विजाः ” या गर्गवचनावरून उघड दिसून येते. वराहमिहिरादिकांनीं यवनाचायांचा आपल्या सिद्धांतांत उल्लेख केला आहे हें त्यांचे ग्रंथ पाहिले असतां कळून येईल. यासंबंधाची आणखी विशेष माहिती कोणास पाहणें असल्यास ती कै० दिक्षित यांच्या ** भारतीय ज्येोतिषशास्रांत ” मिळेल. येथे