पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/286

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशोधन. २७१ होती. पण तीहि रा. रा. व्यंकटेश बापूजी केतकर ह्यांनी ज्योतिर्गणित व केतकी हे दोन ग्रंथ करून नुकतीच भरून काढली आहे. केतकरांस हे ग्रंथ करण्यास किती परिश्रम पडले याची परीक्षा सामान्य मनुष्यास होणे कठीण आहे. कोणत्याही प्रकारच्या नवीन माहितीचा पूर्वापार चालत आलल्या जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जेोडून पुन: पंचांगज्योतिष्यांकरितां जितकी सुलभ पाहिजे तितकी जुनी पद्धति कायम ठेवून ग्रंथ करणे यास चागली बुद्धि लागते इतकेंच नव्हे तर परिश्रमही पुष्कळ करावे लागतात. तसे परिश्रम रा. रा. केतकर यांनी घेऊन हे नवीन करणग्रंथ त्यानीं संस्कृतात केलं थाबद्दल त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. वे. शा. सं. विनायकशास्री खानापूरकर यानीही सूर्यसिद्धान्त व सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाची सोपपत्तिक मराठीत भाषांतरे तयार केली आहेत, व ताँ छापून प्रसिद्ध झालीं म्हणजे त्यावरून जुन्या ग्रंथाचे स्वरूप व त्यांतल्या उणीवी कोणाच्याही सहज लक्षांत येण्यासारख्या आहेत. अयनांश १८ घ्यावे किंवा २२ ध्याव याबद्दल केतकर व खानापूरकर याचा मतभेद आहे. पण केतकरांच्या ज्योतिष गणितग्रथांत रैवत आणि चैत्र म्हणजे १८ आणि २२ अशा दोन्ही अयनांशपक्षाचे गणित आहे. यावरून केतकराचाही एखाद्या विशिष्ट पक्षाबद्दल विशेष अभिमान आहे असे दिसत नाहीं. किंबहुना चित्रापक्ष केतकरांनी पहिल्यार्ने आपल्या ग्रंथांत घातला नव्हता व तो कै. दीक्षित वैगरे लेोकांची मतें पाहून पुढे त्यांत ग्रथित केला असें भारतीय ज्योतिषशास्त्रांत दिलेल्या हकीकतीवरून समजतें. केतकरांनीं दोन्ही पक्षाचा आपल्या ग्रंथात समावश केला असल्यामुळे निरयण त-हेची दोन्ही म्हणजे केरोपंती आणि बापुदेवशास्त्री किंवा रघुनाथाचार्थ यांचीं पंचागें यावरून तयार करितां येतील. अशा तहेचा हा संस्कृतात पहिलाच ग्रंथ आहे; व त्यामुळे आरंभीं सागितलेल्या चार पक्षापैकीं एका पक्षाचा आक्षप आतां नाहींसा झाल्यासारखा आहे. येथवर गेल्या ३५ वर्षात पंचांगशोधनाबद्दल जी खटपट झाली तिचे थोडक्यांत स्वरूप सागितले. यासंबंधोन जास्त उद्योग करण्याचा काल आतां आला आहे अशी आमची समजूत आहे. हा उद्येोग कोणत्या दिशेनें करावा, निरनिराळ्या पक्षांची एकवाक्याता करण्यास काहीं मार्ग आहे कीं नाहीं, या उद्योगास कोणकोणाचे साह्य पाहिजे व तें कसें मिळवावे वगैरे गोष्टींचे विवेचन पुढील अंकीं करूं.