पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/291

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ लो० टिळकांचे केसरींतील लेख आतां एवढी गोष्ट खरी आहे कीं, या तटस्थवृतीमुळे सामाजिक गोष्टींत धर्माधिकायांस जी सत्ता असावयाची तीही नाहींशीं होऊन सामाजिक व्यवस्थेत एक प्रकारचा लंगडेपणा आलेला आहे. हा लंगडपणा काढावा कसा हा एक मोठाच प्रश्न आहे त्याचा विचार येथे करणे शक्य नाहीं. तूर्त येवढेच सांगणें आहे कीं, हा लंगडपणा काढण्याकरितां परधर्मी सरकारास आपल्या सामाजिक किंवा धर्म बाबतींत हात घालण्यास अधिकार असावा असे म्हणणे म्हणजे आपल्या घराची एक बाजूची भिंत मोडकळीस आली आहे म्हणून सर्व घरास आग लावून द्या असें प्रतिपादन करण्याइतकेंच शहाणपणाचे आहे. स्वधर्मी आणि परदेशी सरकार यांमधील भेद लक्षात न ठेवतां एकाचे अधिकार दुस-यास असावे असें प्रतिपादन करणें अगदीं चुकीचे होय. न्यायमूर्तीनों ही चूक पहिल्यानेंच केली आहे असें नाहीं व तिच्याविरुद्धही आम्ही पहिल्यानेंच लिहिती असें नाहीं. मार्गे याबद्दल चर्चा झालेली आहे, परंतु हल्लींच्या निबंधांत त्याचा पुनः थेोडा उल्लेख आल्यामुळे त्याबद्दल आम्हांसही पुन: दोन शब्द लिहिणे जरूर पडलें, निबंधात केशवपन आणि विधवाविवाह यासंबंधाचा आणखी एक मुद्दा होता. पानपतच्या लढाईत पडलेल्या सदाशिवराव भाऊंच्या बायकोर्ने आमरणांत सौभाग्य राखिलें व तिला त्याप्रमाणें राखू दिले, यावरून न्यायमूर्तीनीं जी अनुमानें काढलीं आहेत तीं आमच्या मतें चुकीचीं आहेत. सदाशिवरावभाऊ घोड्यावरून उतरून पानपत येथे युद्धाच्या गर्दात शिरले आणि दिसेनासे झाले एवढीच काय ती त्यांबद्दलची त्या वेळीं त्यांच्याबरोबर असणाच्या लोकांस नक्की माहिती होती. त्यास ठार मारल्याचे कोणी पाहिले नव्हतें अगर त्यांचे प्रेतही कोणाच्या दृष्टीस पडले नव्हतें; अर्थात् सदाशिवरावभाऊ मेले असें प्रत्यक्ष पाहून सांगणारा केोणीही नव्हता ते मेल असें अनुमान होतें, पण अशा अनुमानिक मरणावर विश्वास ठेवून कोणतीही स्री वैधव्य स्वकिरणार नाहीं इतकेंच नव्हे तर शास्रही त्यास अनुकूल नाहीं. पेशवाईतील गोष्ट तर राहूं द्याच पण आज मित्तीस अशा प्रकारचीं उदाहरणें असल्याचे आम्हांस माहीत आहे. तेोतया सदाशिवरावभाऊ पुढे उपस्थित झाला होता यावरूनही आम्हीं म्हणतो तीच गोष्ट सिद्ध होते. नारायणराव पेशव्यांच्या बायकोसंबंधानेंही असाच प्रकार होय. नाराययणरावांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची बायको गरोदर होती व गरोदर स्रियांचे वपन करीत नाहीत असें शास्र असून व्यवहारही आहे. एकदां अशा कारणाकरितां वपन तहकूब राहिले म्हणजे तें पुढे कांहीं दिवस तसेंच राहतें ही गोष्टही हल्लीं उपलब्ध असलेल्या उदाहरणांवरून कळण्यासारखी आहे. सारांश, या दोन्ही उदाहरणांवरून कोणतीही नवी गोष्ट सिद्ध होत नाहीं व न्यायमूतींनी आपल्या मताच्या पुष्टीकरणार्थ म्हणून त्यांचा जो उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे. सदाशिवरावभाऊ किंवा नारायणराव यांच्या कुटुंबावर जे प्रसंग आले तशा प्रसंगीं चांगल्या घराण्यांतून अद्यापही हीच वहिवाट कायम आहे, ही गोष्ट न्यायमूर्तीनीं जरा शेोध केला