पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/302

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. न्या. महादेव गोविंद रानडे : و ام निकरानें होण्याचा संभव होता. पण त्यांच्या हातून आम्हा लोकांचे अशा प्रकारें कल्याण व्हावें असा ईश्वरी संकेत नव्हता असेंच म्हटले पाहिजे. एरव्हीं त्यांस ६० वें वर्ष लागले म्हणून त्यांची ज्युबिली करण्याऐवजी त्यांचा मृत्युलेख लिहिण्याचा दु:खकारक प्रसंग आमच्यावर आला आहे तो आला नसता. माधवरावजीचा महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्रीयांचा माधवरावर्जीकडे विशेष ओढा कां होता याचा यावरून विशेष खुलासा होईल. कायदेपंडीत, लेखक वगैर बाबतीत माधवरावजींची योग्यता इतर कोणत्याही राष्ट्रीय पुढाच्यापेक्षां कमी नव्हती. किंबहुना सर्व विषय अवगत करून घेण्याची हौस आणि कोणताही विषय हाती घेतला असतां त्यासंबंधी कांहीं तरी नवी शक्कल काढून त्यास मनोहर रूप देण्याची त्यांची अपूर्व हातोटी दुस-या कोणत्याही राष्ट्रीय पुढा-यात सांपडेल असें आम्हांस वाटत नाहीं. पण याहीपेक्षा त्यांच्या अांगचा लोकोत्तर गुण म्हटला म्हणजे आपल्या राष्ट्राचा अभ्युदय केव्हा ना केव्हा तरी खास झाला पाहिजे. किंबहुना ही गोष्ट परमेश्वरानेच संकल्पित आहे अशी जी त्याच्या ठायीं उमेद होतो ती होय. भावी सुपरिणामाबद्दल अशा तच्हेची नि:संशय मनोवृत्ति फारच थोड्या पुढायांचे ठायी आढळून येते. सरकारचा ताबेदारपणा, योग्य माणसांची कमतरता, समाजामध्यें रूढ असलेल्या समजुती इ. अनेक कारणांनीं माधवरावजींस आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करतां आल्या नाहीत. तथापि दूरवर नजर देऊन धिमपणानें अंगीकृत कार्ये त्यानीं अव्याइत रीतीनें चालू ठेविलीं होतीं. प्राचीन व अर्वाचीन सुधारणेच्या झगडयांत मनुष्यास पदोपदीं कसे बुचकळल्यासारखें होतें याचे एके प्रसंगीं त्यानीं मोठ्या मार्मिक रीतीनें वर्णन केले आहे. या सर्व अडचणी सोसून बिनतक्रार देशेोन्नतीच्या कार्याकरितां उत्साहानें भगवा झेंडा हातीं घेऊन सदैव पुढे राहणें हें काहीं लहानसहान मुत्सद्दीपणाचे काम नव्हे. पण माधवरावजींची लोकसेवा एवढ्यावरच थाबली नाही. त्यांनी आपल्या हयातीत, आपल्या जन्मभूमीतील लोकांस शहाणे करून सोडण्याचा क्रम अबाधित चालू ठेविला होता. राष्ट्रामध्ये लिहिणारे व बोलणारे पुढारी जरी पुष्कळ असले तरी अशा रीतीनें लोक समाजामध्यें जागृति उत्पन्न करण्याचे गुरुत्व ज्यांकडे देता येईल असे लोक फारच विरळा आहेत. माधवरावजी हे अशा विभूतीपैकीच एक होते व म्हणूनच त्यांजकरितां आज सर्व लोक आम्हा सर्वोचा एक अप्रतिम हितकर्ता गेला म्हणून हळहळत आहेत. अशा तहेचा पुरुष इंग्रजी राज्य झाल्यापासून तरी महाराष्ट्रात निघाला नाही व पुढेही माधवरावर्जीची जागा लवकर भरून येईल असे वाटत नाहीं. अशा तहेचा पुरुष काळानें आमच्यामधून ओढून न्यावा हें आमचे मोटें दुर्दैव होय. माधवरावजींच्या कुटुंबाची त्याच्या मृत्यूने जी हानि झाली आहे ती तर खरोखरीच दुष्परिहार्य होय. त्याच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे खरा व आम्हीं कितीही शांतवन केले तरी तें दुःख कमी होणें कठीण आहे,