पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/310

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर. २९५ देतां सिद्धीस नेण्याच्या हौसेचा अभाव इत्यादि अवगुण जर आजमितीस इंग्रजी शिकलेल्या तरुण मंडळींत आढळून येत असले तर त्याचे सर्व श्रय विष्णुशास्री यांच्या पूर्वीच्या पिढयांनीं जो क्रम सुरू केला होता त्यांसच दिलें पाहिजे. या विषवृक्षाचे बीं विष्णुशास्री याच्यापूर्वी फार दिवस लागले होतें व शास्रीबुवाच्या लेखाचा जर काहीं परिणाम झाला असला तर या विषवृक्षाची वाढ थोडीबहुत कमी करण्याकडेसच झाला असे ज्यास पूर्वीची हकीकत माहीत आहे त्यास तरी हटलेच पाहिजे. विष्णुशास्री यानीं आपल्या वेळच्या कांही बड्या मंडळींची टर उडवून तरुण पिढीच्या मनातील वृद्धांबद्दलची पूज्यबुद्धि घालविली असें कित्येकाचे म्हणणे आहे; पण तें चुकीचे आहे. खरा प्रकार असा आहे की, शास्रीबुवाच्या पूर्वीच्या दोन पिढ्यातील मंडळी, प्राचीन आचारविचार किंवा सामाजिक व धार्मिक व्यवस्था याच्या पूर्व प्रवर्तकांस मूर्ख ठरवून त्याच्या जागीं आपण स्थानापन्न होण्याच्या तयारीस लागलेली होती; व त्याचा असा भरंवसा होता कीं, आपल्या मागून आपल्या तालमींत तयार झालेली जी तरुण पिढी येईल ती आपलें गौरव करून आपल्यास अभिनव धर्मसंस्थापकाचे किंवा सामाजेकरचना प्रवर्तन करणाच्याचे अढळ स्थान प्राप्त करून देईल! पण त्याचे स्वत:च आचरण अगदीच अव्यवस्थित असल्यामुळे हा त्यांचा भरंवसा तडीस न जातो त्याच्या अविचाराचीं फळे त्यास भेोगावी लागली. ज्या लोकानी मनु,शंकराचार्य,रामदास किंवा तुकाराम इत्यादिकासही मूर्ख ठरवून आचार,विचार, विहार व आहार याच्या स्वछंदावर नवीन धर्माचे निशाण उर्भे केले त्यास त्याच्या पुढच्या पिढानें मूर्ख ठरविल्यास ती गोष्ट जगाच्या रहाटीच्या फारशी विरुद्ध झाली असें म्हणता यावयाचे नाही. विष्णुशास्री यानी आपल्या लेखानीं काय कामगिरी वजावली हें समजण्यास वर दिलेल्या तत्पूर्वीच्या दोन तीन पिढ्याची सामान्य हकीकत पुरे आहे. राष्ट्राच्या अभ्युदयास स्वभाषा, स्वधर्म यांबद्दल योग्य अभिमान व प्रेम समाजाच्या पुढायांच्या आगीं असणें किती जरूर आहे वगैरे गोष्टीचा विचार न करतां अथवा आपली बलाबलता न पाहता ज्यांनीं केवळ अभिनव शिक्षणाच्या जेोरावर देशसुधारणेची पताका हाती घेतली होती त्यास, शास्रीबुवासारखा पुरुष न निपजला असता तरीही अखेरीस अपयशाचेच धनी व्हावे लागले असतें. त्यास जें महत्त्व आले होतें तें अागांतुक होतें आणि इंग्रजी ज्ञानाचा जास्त प्रसार होऊन विद्वानाचा दर पुढे लवकरच उतरणें अगदीं स्वाभाविक होते व त्याप्रमाणे झालेही. विष्णुशास्री हे या मंडळीच्या खया स्वरूपाचे आविष्करण करण्यास केवळ निमित्तमात्न झाले असे म्हटले तरी चालेल. उतास गेलेलें दूध ज्याप्रमाणें केव्हाना केव्हां तरी अग्नींत पडून दग्ध व्हावयाचे, तशीच या दोन तीन पिढ्यांतील पुरुषानीं आरंभिलेल्या चळवळीची स्थिति होत आली होती. शास्रीबुवास सदर चळवळीवर त्यांच्या पुरस्कत्यांवर हल्ला करून त्यांच्या खज्या स्वरूपाचे आवि