पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/320

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञेयाज्ञेयमीमांसा. ३०५ फुरसतीच्या वेळीं अशाच प्रकारची स्वभाषेची सेवा करण्याचे जर इंग्रजी शिकलेल्या दुस-या विद्वानांनीं मनांत आणिलें तर त्यापासून त्यांचा व लोकांचा पुष्कळ फायदा होण्याचा संभव आहे. अलीकडे दीन तीन इातर्के ज्योतिषशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थेविज्ञानशास्र, विद्युच्छास्र वगैरे आधिभौतिक शास्रांची पुष्कळ अभिवृद्धि होऊन जगांतील नैसर्गिक शक्तीनें एकंदर पदार्थीचीं जीं स्थित्यतरें किंवा रूपांतरें होतात त्याचे नियम आपणास अधिकाधिक कळत जाऊन त्यापासून मनुष्यजातीचा अत्यंत फायदा झालेला आहे, ही गोष्ट सर्वास निर्विवाद कबूल आहे. जडसृष्टींतील पदाथांचे सूक्ष्म अवलोकन, तदंतर्गत गुणधर्माचे व्यवस्थित व सखोल विवेचन, आणि परस्परविभिन्न दिसणा-या पदार्थांचे किंवा गुणधर्माचे एकमकाशीं सदृशत्व किंवा विसदृशत्व समजणे ही आता जशीं सुगम झाली आहेत तशीं पूर्वी कधीही झालेली नव्हतीं. ज्या पाण्यास आमच्या पूर्वीच्या शास्त्रातून आदितत्त्व मानलेलें आहे तेंच पाणी वायुरूप दोन तत्त्वापासून बनलेले आहे असे आता सिद्ध झालेले आहे. जडद्रव्यासंबंधानें हा दृष्टात झाला. पदार्थोच्या अवस्थसंबंधानें पाहिले तर कोणताही पदार्थ प्रवाह, घन किंवा वायुरूपी असणे हे त्याचे भिन्नभिन्न गुणधर्म नसून कमजास्त ऊष्णतेनें हीं तीन स्वरूपं त्यास प्राप्त होतात असेंही आतां सिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे सर्व पदार्थोस सामान्यत: व्यापून असणारे दिक्कालादि पदार्थ अनादि व अनंत असले तरी त्याचा इतर पदार्थाशीं कोणत्या प्रकारचा संबंध असतो याचे अर्वाचीन शास्रातून जितके चागलें विवेचन आहे तितकें जुन्या ग्रंथातून नाहीं; व त्याचे कारणही उघड आहे. गेल्या दोनशें तीनशें वर्षात आधिभौतिक शास्त्राची जी अभिवृद्धि झाली तिच्या योगार्ने हें ज्ञान आपणास प्राप्त झालेले आहे; व प्रथमदर्शन हे इतके रमणीय आहे कीं, या ज्ञानाच्या विचारात गुंतलेले गृहस्थ येथेच आपल्या ज्ञानाची परमावधि झाली असें म्हणून त्या ज्ञानाच्या पलीकडे जाण्यास किंवा पाहाण्यास आपणास असमर्थ करून घेतात; इतकेंच नव्हे तर त्यातच आपणास कृतकृत्य मानून घेतात. तत्त्वज्ञानाची व त्याच्या सिद्धाताची जर कोणास विशेष जरूर असेल तर ती असल्याच गृहस्थांस होय. यांची स्थिती आणि वडिलाच्या वेळची विहीर म्हणून त्यातील खारे पाणी पिणाच्या मनुष्याची स्थिति एकसारखीच असते. अनेक आधिभौतिक शास्त्रांच्या सिद्धांताचे परीक्षण करून व त्यात सारखेपणा कोठे आहे आणि विसदृशत्व कोठे आहे हे पाहून निरनिराळ्या शास्रातील सिद्धात एकाच सामान्य सिद्धांताची निरनिराळे स्वरूपॅ असतील कीं नाहीं हे ठरावेणें हें तत्त्वज्ञाचे काम होय. एखाद्या आधिभौतिक शास्राच्या अभ्यासांत जन्म घालून त्या शास्त्राच्या ज्ञानाची मर्यादा वाढविणारे गृहस्थच आधीं विरळा सांपडतात; परंतु याहीपेक्षां सर्व शास्रांचे सिद्धांत एके ठिकाणीं करून त्यांतून कांहीं तरी ३८