पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/323

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० ८ लो० टिळकांचे केसरींतील लेख

  • ज्ञेयाज्ञेयुमीमांसा.

उत्तरार्ध गेल्या खेपेस ज्ञेय आणि अज्ञेय अथवा जड आणि चित् सृष्टीसंबंधीं स्पेन्सरसाहेबांचे काय सिद्धांत आहेत हे थोडक्यांत सांगितलें, हरएक शास्रांतील मूलतत्त्व कोणतीं हे ठरावणें ज्ञानाच्या एकीकरणाचा पहिला हप्ता होय; परंतु भिन्नभिन्न शास्रांतील मूलतत्त्वे अशा रीतीनें ठरल्यावर तीं पुनः एकत्र करून त्यातून सामान्य सिद्धांत काढणें व सर्वज्ञ एकाच अज्ञेय तत्त्वाची व्याप्ति आहे असें सिद्ध करणे हे तत्त्वज्ञाचे काम स्पेन्सरसाहेबांनीं ज्या पद्धतींचा अंगिकार करून तडीस नेले आहे त्याहून आमच्या जुन्या तत्त्वज्ञांची पद्धत भिन्न आहे; परंतु सिद्धात बहुतेक एकसारखेच आहेत, या गोष्टीचा उल्लेख मागील खेपेस केला होता. आज त्याचाच थोडासा जास्त विचार करून रा. रा. फडके यांच्या पुस्तकाचे हें परीक्षण आम्ही सपविणार आहों. विषयाचे महत्त्व लक्षांत आणले असता दोनचार लेखांतही तो आटपणे अशक्य आहे, पण तितक्या विस्तारानें लेख लिहिण्याची तूर्त सवड नसल्यामुळे गेल्या अंकीं ज्याप्रमाणे स्पेन्सरसाहेबांच्या सिद्धांतांचा थोडक्यात साराश दिला त्याचप्रमाणें या अकीं तत्सदृश आमच्याकडील तत्वज्ञांच्या सिद्धांताचा थेोडक्यात उल्लेख करण्याचा आमचा विचार आहे. ज्ञेय आणि अज्ञेय असे जे तत्त्वज्ञानाच्या विषयाचे दोन भाग स्पेन्सरसाहेबांनीं केलेले आहेत त्यासारखेंच आमच्याकडे एकपक्षीं न्याय आणि सांख्य आणि दुस-या पक्षीं वेदांत ही शास्ने होत. उत्क्राति, शक्तीचे समतेोलन, गतीचे सातत्य वगैरे आधिभौतिक शास्त्राच्या अनुभवावरून जसे कांहीं सामान्य सिद्धान्त स्पेन्सरसाहेबांनी काढलेले आहेत तसेच सृष्टीच्या अवलोकनॉन “ द्रव्यगुणकर्मसामान्यविशेषसमवायाभावाः सप्तपदार्था:” असे आमच्या नैयायिकांनीं सृष्टींतील सर्व पदार्थाचे व त्याच्या गुणधर्माचे सात सामान्य विभाग कल्पून व त्यांस * पदार्थ ' असे पारिभाषिक नाव देऊन त्यात सर्व वस्तूंचा संग्रह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सात पदार्थापैकीं कर्म किंवा क्रिया यास गुण म्हणतां येईल किंवा नाहीं, अभाव हा स्वतंत्र पदार्थ आहे कीं नाहीं, सामान्य म्हणजे साधारणत्व हा एक पदार्थ मानल्यानंतर त्यापासून विशिष्टत्व उत्पन्न होण्यास * विशेष ’ या दुस-या पदार्थाची जरूर आहे कीं नाहीं, इ० न्यायशास्रामध्यें पुष्कळ विचार आहेत. कणादाचे वैशेषिक दर्शन तर * विशेष ’ हा स्वतंत्र पदार्थ मानल्यामुळेच उत्पन्न झालेले आहे असेंहि एक मत आहे. सृष्टतीिल वस्तुमात्राचे अवलोकन करून त्यांचा व त्यांच्या गुणधर्माचा दहापांच ठळक ठळक वगीत समावेश करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल, तर तो आमच्याकडे सांख्य