पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/327

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ लो० टिळकांचे केसरींतील लेख

  • श्री. गायकवाडसरकार यांचा वेदांत

राज्यसूत्रे हातांत बाळगणा-या पुरुषांनीं ब्रह्मविद्येत प्राविण्य संपादन केल्याचीं उदाहरणें आम्हांस अपाराचेत आहेत असें नाहीं. जनक व भीष्म यांच्या गोष्टी उपनिषदांत व इतिहासांत प्रसिद्ध आहेत, व भागवतमांचे प्रवर्तन क्षत्रियांनींच केले असावें असे म्हणण्यास चांगला आधार आहे. या गोष्टीं लक्षात आणल्या म्हणजे अलीकडील राजांनीं वेदान्त विषयावर आपले विचार प्रगट केल्यास किंवा त्याचा प्रसार केल्यास त्यांत काहीं नवल नाहीं. त्यातून श्री. सयाजीराव गायकवाडसरकारासारखा सुशिक्षित व विद्याव्यासंगी राजा असल्यावर त्याचे विचार विशेष महत्त्वाचे असणे व त्याचा प्रसार झाल्यानें लोकांचा फायदा होणें अधिक संभवनीय आहे. परंतु राजे किंवा संस्थानिक कितीही सुशिक्षित, बहुश्रुत आणि विद्याव्यासंगी असले तरी ज्या विषयावर ते बोलणार किंवा आपले विचार प्रगट करणार त्यासंबंधाने पूर्ण व्यासंग करून त्या विषयांत प्राविण्य संपादन करणे हें त्याचे काम आहे; व तसें प्राविण्य जर त्यांनी संपादन केलें नसेल तर केवळ आधकाराच्या जोरावर त्यांचे विचार कधीही लोकमान्य होणार नाहीत. आज हे विचार सुचण्याचे कारण बडोदें येथे श्रीमत्स्वामी इंसस्वरूप यानीं राजमहालात श्री. गायकवाडसरकार यांच्या समेोर जीं व्याख्यानं दिली, त्यानतर महाराजानीं जें एक लांबलचक तासभर वेदान्तावर व्याख्यान दिले ते होय. श्रीमंत सर सयाजीराव महाराज सेनाखासखेल यांची बहुश्रुतता व विद्येविषयीं आसक्ती हीं सर्वश्रुत आहेत; व त्यांनी जर आपल्या प्रवासातील माहिती किंवा आपण अनुभवलेल्या, आपणास परिचित असलेल्या राजकीय किंवा सामाजिक विषयावर आपली मतें आम्हांस सांगितलीं असतीं तर तिचा आम्हीं सन्मानपूर्वक विचार केला असता. परंतु वेदान्तासारख्या गहन विषयावर वरचेवर दहा पांच इंग्रजी ग्रंथ वाचून किंवा श्रवण करून ज्या गोष्टी शाळेतील पोरासही सागण्याची लाज वाटेल अशा श्री. महाराज सरकारांनीं भर सर्भेत श्रीमत्स्वामी हंसस्वरूप यांच्यापुढे बोलून दाखवाव्या हे आमच्यामर्त कांहीं उचित नाहीं, श्री. सयाजीराव महाराज याची वेदान्त विषयाचा विचार करण्याकडे प्रवृत्ति झाली आहे ही अभिनंदनीय गोष्ट होय. पण हल्लींच्या व्याख्यानावरून असे दिसून येतें कीं, त्याचे विचार अद्याप अपरिपक्व असून ते लोकांपुढे मांडण्यापूर्वी महाराजांनीं अद्याप पुष्कळ अभ्यास केला पाहिजे. “ जगांत कांहीं गेोष्टी अशा आहेत कीं, त्याची प्रत्यक्ष साक्ष पडणें शक्य नसते. असें जरी आहे तरी ईश्वर नाहीं असें मात्र माझे म्हणणें नाहीं. ईश्वर आहे असें मानून चालले असतां बरें ' असा महाराजांनी आपले भाषणांत ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट

  • (केसरी ता, १ आक्टोबर १९०१, )