पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/331

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१६ लो० टिळकांचे केसरींतील लेख आमच्या खुषीविरुद्ध जे दोन कडक शब्द लिहावे लागले त्याबद्दल ते आम्हांस माफी करतील अशी विनंति करून हा लेख आम्ही संपवितो. ॐमराठे आणि वेदोक्त कर्म अलीकडे इंग्रजी विद्येनं व पाश्चिमात्य शिक्षणानें संस्कृत झालेल्या मराठेमंडळीच्या मनांत जीं कांहीं खुळे शिरली आहेत, त्यांपैकींच वेदोक्तकर्माचे खूळ हें एक होय. बरेच दिवसापूर्वी हें बंड प्रथमतः श्री. गायकवाडसरकार यांच्या प्रोत्साहनानें बडोद्यास सुरू झालें, व त्याचा संसर्ग आतां कोल्हापूरपर्यंत जाऊन भिडला आहे. व इतर ठिकाणीही तोच प्रकार होण्याचा संभव आहे. हें खूळ एकच ठिकाणीं होतें तोंपर्यंत त्याबद्दल विशेष लिहिण्याचे कांहीं कारण नव्हत. पण बडोदें आणि कोल्हापूरसारख्या संस्थानचे आधिपति राजा या नात्यानें आपणाकडे असलेला धमीच्या बाबतीत ति-हाइतपणाचा अधिकार विसरून जाऊन जेव्हां एका विविक्षित ज्ञातीचे पुरस्कर्ते बनतात, इतर्केच नव्हे तर त्यांच्या खुळास पाठबळ देऊन परधर्मी सार्वभौमराजाकडे आपल्या संस्थानांतील प्रजेस धांव घेण्यास लावतात, तेव्हां यासंबंधानें दोन शब्द लिहिणें जरूर होतें. आम्ही जें या सेंबंधार्ने आज विवेचन करणार आहों तें कोणाही व्यक्तीस अनुलक्षुन नसून या प्रश्नाची आजपर्यंतची हकीकत कशी आहे, त्याची व्यवस्था कोणत्याप्रकारें झालेली आहे, व पुढे ती कोणत्या धोरणावर झाली पाहिजे इत्यादि सामान्यतत्त्वांचाच आजच्या व पुढच्या लेखांत विचार करणार आहों. याबद्दल कोणास कांहीं वाईट वाटण्याचे कारण नाहीं. जातिभेद हा हिंदु लोकांच्या अगदीं हाडीं खिळलेला आहे. जीवास परमेश्वराची प्राप्ति कशानें होईल एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ धरिला तर हिंदुधमति जातीचा अगर खाणें पिणें अथवा इतर आचार यांचा बिलकुल संबंध येत नाहीं हे उघड आहे. कारण, आमच्या धर्मौत परमश्वर वसिष्ठास जितका साध्य होता तितकाच विश्वामित्रासही होता, याज्ञवल्क्यास जितका होता तितका जनकासही होता, आणि ज्ञानेश्वर-एकनाथांप्रमाणेंच, तुकाराम, गोरा कुंभार आणि चोखाभेळा यांसही गति प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारच्या धर्मात खाणे, पिणें आणि जाती यांचा समावश होत नाहीं. हे आचार स्वतंत्र आहेत व ते स्मृतिग्रंथांतून आचार आणि व्यवहार या सदराखालीं पडतात. तथापि हिंदुलोकांची ज्ञातीधर्मावरील आसक्ति इतकी दृढ आहे कीं, हिंदूचे खिस्त झाल तरी त्यांच्या मनावर परंपरागत आलेले ज्ञातिभेदाचे संस्कार जळलेल्या दोरींत तिचा पोळ जसा कायम राहती तद्वत् कायम राहतात. हे परंपरागत किंबहुना रक्तमासगत भेदाभद अजीबात --- - - -

  1. ( केसरी, ता, २२ माहे आक्टोबर, १९०१ )