पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/341

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२६ लो० टिळकांचे केसरीतील लेख त्यागाखेरीज मोक्षप्राप्ति नाहीँ या सागण्यावरून अर्जुनाला पुन्हा शेका उत्पन्न झाली व त्याला श्रीकृष्णानीं उत्तर दिलें कीं, कर्म बद्ध करीत नाहीं, फलाशा ही जीवाला बद्ध करिते. फलाशा सोडून कर्म केल्यास मोक्षप्राप्ति होते. फलाशेला भिऊन कर्मत्याग करणे हा भित्र्याचा मोक्ष आहे. रानांत जाऊन बसण्यांत फारसा पुरुषार्थ नाहीं. आपणांस मोह संसारात पाडोल म्हणून ह्याच्यासमेोर न जाणे हा भित्रपणाचा मार्ग होय. जगात राहून * कर्मणेयवाधिकारस्त मा फलेषु कदाचन ।’ या तत्त्वाप्रमाणें फलाशा सोडून कालसदी न भिता जो धीरानें कर्म आचरतेो तोच खरा धीर पुरुष होय. मोहाशीं सामना देऊन त्याचा पाडाव करण्यात खरा पुरुषार्थ आहे. कर्म हें कधी वाया जाणार नाहीं, आज, उद्या केव्हा तरी त्याचे फळ हें मिळणारच. कर्माचे फळ काळ, वेळ व परिस्थिति इत्यादिकावर अवलंबून असते. तथापि ज्याला फलाशा नाही त्याला निराशाही होण्याची भीति नका. मग कर्तव्य म्हणूनच मनुष्य कार्य करूं लागतेो. निहंतुक कार्य करावयास प्रवृत्त असणें हेंच गीर्तेतील मुख्य सार आहे. कार्याचा परिणाम बरा होवो अगर वाईट होवो, तें आनंदानें व सुखसमाधानानें करावयास सांगणारा धर्मग्रन्थ जगाच्या वाङ्मयांत भगवद्गीता हाच एक आहे. स्वत:चे किंवा परक्याचे हिताहत करण्याची बुद्धि काढून टाकणें हेंच फलाशा सोडून देणें आहे. निहंतुक क्रिया कधींच पापमय होऊं शकत नाहीं. पापाला हेतू ( Intention ) हा महत्त्वाचा भाग आहे. निहंतुक गुन्हाच घडू शकत नाहीं. “ येनैवालिंगिता काता तेनैवालिंगिता सुता ?’ यातील आलिंगनक्रिया एकच असली तरी हेतू निरनिराळे असल्यामुळे त्यांना भिन्नपणा आला आहे. धैर्य खचलें असता धीर देणे, कर्तव्याची जागृति करणे, आणि आपली सारी कर्मे ईश्ररास अर्पण करणे हें गीतेंत सागितले आहे. येथे पुष्कळ विद्यार्थी जमले आहेत त्याना तरी माझे सागणे हेंच आहे. गीतेचे आस्थापूर्वक परिशलिन करून आपलें मन आतांपासून उदात्त करा, आणि नीतीची तत्त्वें उज्वलित करून पुढल्या प्रसंगाची तयारी आतापासून असू द्या. गीतेंत सांगितलेले आहेतुक काम करावयास मनात सात्त्विक वृत्तींचा उदय झाला पाहिजे, परमेश्वरावावर दृढभक्ति जइली पाहिजे, आणि आपणांस करावयाचे काम ईश्वरानें अगोदरच नेमून ठेवले आहे असा भरवंसा असला पाहिजे, आणि म्हणूनच गीतेंत, “मामनुस्मर युद्ध च ” असा उल्लेख केलला आहे. अर्जुनाला आलेला प्रसंग आपणा सर्वोस आलेला आहे किवा यावयाचा आहे. तारुण्याची तरतरी व जेोम आहे तोंपर्यंतं सर्व ठीक आहे. परंतु संसारात पडून अडचणी उभ्या राहिल्यावर मनाची होणारी चलबिचल भगवद्गीतेंतल्या उपदशामृतार्ने नाहीशी होईल व मला उमेद आहे कीं, केव्हांना केव्हां तरी श्रीकृष्णाप्रमाणें उपदेश करणारा आम्हांस भेटून, “नष्टे मोहः स्मृतिर्लब्धा इ.” असे म्हणून आम्ही आपल्या हल्लींच्या स्थितीत आपलें कर्तव्य करण्यास सिद्ध होऊं. ’