पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/346

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युनिव्हर्सिट्या ऊर्फ सरकारी हमालखाने. ३३१

  • युनिव्हर्सिट्या ऊर्फ सरकारी हमालखाने.

हिंदुस्थान देशाचे राज्य हें इंग्रजसरकारचे हाती आल्यानंतर सदर सरकारनें पूर्वीच्या राजापेक्षां जी एक मोठी सुधारणा केली ती ‘ शिक्षण ’ होय व याकरिता इंग्रजसरकारचे आम्ही जितके आभार मानावे तितके थाडच, अशी काहीं वर्षांपूर्वी सर्वोची व आजमितीस बहुतेकाची समजूत आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. ज्या विद्येच्या जेोरावर इंग्रज लोकास आज सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे, तीच विद्या व त्याच कला,तींच शास्ने जिंकलेल्या हिंदु लोकास शिकवण्यास त्यानीं तयार व्हावे यापेक्षा मनाचा आणखी उदारपणा तो कोणता ? अशा प्रकारचे उद्गार पुष्कळाच्या तोंडून निघालेले अद्याप आमच्या कानांत घळत आहेत; आणि पहिल्या पहिल्यानें इंग्रजी शाळातून पाश्चात्य विद्येचे काही घुटक घेऊन जी मडळी बाहेर पडली त्यानीं तर वरील प्रकारचे उद्गारास अधीकच पुष्टीकरण दिले होते. त्यातून पहिल्यानें इंग्रजी विद्या शिकलेल्या लोकास एकदम मोठ्या जागा मिळत असल्यामुळे अपरिचित असलेल्या त्याच्या विद्येस याच्या अधिकाराचा पाठिंबा मिळून लोकामध्यें यांचे स्तेोम पहिल्या पहिल्यानें तर ज्यास्तच वाढलें होतें. पण इतर गोष्टीप्रमाणेंच याही गोष्टीचा बहार उत्तरोत्तर कमी होत चालला. इंग्रजी शिक्षण एकागीं आहे व ते फक्त सरकारी नोकरीस लागणारे अवश्य गुणच एतद्देशीय लोकाच्या अगात आणण्याकरिता योजलेले आहे, या शिक्षणक्रमात तयार झालेल्या लोकास धर्म, नीति, शास्रीय शोध, धेदेशिक्षण वगैरे राष्ट्राच्या उत्कर्षास अवश्य लागणाच्या ज्ञानाची व कलाची बिलकुल माहिती नसते, इत्यादि व्यर्गे लोकाच्या हळुहळू नजरेस येऊं लागलीं; आणि नोकरी मिळण्याचे प्रमाणही उत्तरोत्तर कमी होत गेल्यामुळे अधिकाराचा दुजेारा कमी होऊन इंग्रजी शिकलेल्याच्या ज्ञानाचा अपुर्तपणा आणि कच्चेपणा अधिकाधिक उघडकीस येत चालला. हा काल येण्यास तीसचाळीस वर्षातील शिक्षणाचा अनुभव कारण तर झालाच, पण त्याखेरीज दुस-याही गोष्टीवरील विचार आमचे मनात येण्यास कारणीभूत झाल्या आहेत. आमच्याकडे युनिव्हर्सिट्या स्थापन होऊन पन्नास वर्ष झाली तरी विद्वान् बहुतेक निपजलेच नाहीत असे म्हटले तरी चालेल. परंतु जपानांत मात्र तीस वर्षाचे आंत याहून भिन्न स्थिति झालेली आमच्या नजरेस येत आहे ! अशी स्थिति का व्हावी याच्या कारणांचे विवेचन आम्ही केलेंच आहे. करित ह्याचा पुन्हा उच्चार न करता इतकेच सांगतो कीं, ज्यास खरं शिक्षण म्हणतात तशा प्रकारचे शिक्षण इल्लीच्या संस्थातून आम्हांस बिलकुल मिळत नाहीं. हिंदुस्थानचे विद्याथ्याँस केंब्रिजच्या परीक्षेत पहिला नंबर मिळवता येतो तर त्याच्या समवयस्क विद्याथ्यांची हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत अशी स्थिति कां व्हावी, यास अपुत्र्या शिक्षणाखेरीज आम्हांस तरी दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. साराश,

  • (केसरी, ता, १९ माहे आगस्ट १९०२)