पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/352

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बडोदें राज्यांतील बालविवाहाचा कायदा. ३३७ नाहीं. गतवर्षी पुनर्विवाहाचा कायदा बडोदें राज्यांत करण्यांत आला; व तो बहुतेक इंग्रजी कायद्याचेच स्वरूपाचा असल्यामुळे ह्याबद्दल विशेषशी चळवळही झाली नाहीं. इंग्रजी पुनर्विवाहाचे कायद्याने जसे फारसे पुनर्विवाह लागले नाहीत किंवा सामाजिक सुधारणेच्या कार्यास मोठीशी मदत झाल्याचेही दिसून आलेले नाहीं, तोच प्रकार बडोदें संस्थानांतही व्हावयाचा पुनर्विवाहिनाची आपत्र्ये कायदेशीर ठरल्यानें बापाच्या इस्टटीचा वारसा त्यास मिळाला एवढेच काय तें पुनर्विवाहाच्या कायद्यानें काम केले. त्यापासून समाजाचा विशेष फायदा नाहीं व नुकसानही झाले नाहीं. परंतु बालविवाह प्रतिबधक कायद्याची गोष्ट तशी नाही. इल्लींचा बडोदें येथे प्रसिद्ध झालेला कायद्याचा मसुदा महाराजाच्या सामाजिक सुधारणेचा दुसरा हप्ता आहे. हल्लींचा कायदा अगदी अपूर्व आहे म्हटलें तरी चालेल. काहीं वर्षापूर्वी हौसुरास एक बालवृद्ध विवाह बंद करण्याकरिता एक कायदा करण्यात आला. पण त्यात व हल्लींचे गायकवाडी कायद्यात जमीनअस्मानचे अंतर आहे. हल्लीचे कायद्यासारखा मसुदा आजपर्यंत हिंदुस्थानात कोटेंही निघाला नव्हता व पुढेही कित्येक वर्षे निघेलसे वाटत नाहीं. असा अपूर्व कायदा करणाराच्या शहाणपणाची तारीफ करावी तेवढीं थेॉडीच ! सामाजिक परिषदेच्या अत्युच्च वातावरणात भराच्या मारणाच्या सुधारकांसही आजपर्यंत जेथे जाववलें नाहीं तेथे बडोदें राज्यातील सर्व लोकास एकदम नेऊन पोचविण्याचे या कायद्यानें मनांत आणले आहे. खुद्द हिंदुस्थान सरकारचेही १२ वर्षावर संमतीवयाची यता नेण्याचे धैर्य झालें नाहीं. पण गायकवाडी अधिकारी विवाहोत्सुक वधुवरांस एकदम १४ व १८ चे मयाँदेवर नेऊन बसविण्यात बिलकूल कचरत नाहीत. तेव्हां अशा अश्रुतपूर्व कायद्याचा येथे थोड्या विस्ताराने विचार करणे वावर्गे होणार नाहीं. सदरहू कायद्याची १४ कलमे आहेत व त्याचे समर्थन करण्याकरितां प्रारंभीं नायबदिवाण मि. भांडारकर यांचे सहीचा १० कलमी उपोद्धात जेोडला आहे. बालविवाह म्हणजे अज्ञानाचा विवाह व अज्ञान म्हणजे पुरी १४ वर्षाचे आंतील मुलगी व पुरा १८ वर्षाचे अांतील मुलगा. अशा व्याख्या करून ज्या कोणा आईबापास किंवा पालकांस आपल्या अज्ञान मुलाचे लग्नकर्तव्य असेल त्यांनी अगेोदर स्थानिक मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली पाहिजे, असा नियम केला आहे. परवानगीचा अर्ज स्टेंप कागदावर असून त्यात नांव, गांव व लग्न कर ण्याची कारणें दिलीं पाहिजेत. नंतर मॅजिस्टुटानें सुनवणीचा दिवस नेमून अर्जदाराचे जातीच ३ असेसर नेमावे व त्यासह वर्तमान अर्जीतील कारणाचा व पुराव्याचा विचार करून मर्जी वाटल्यास लग्न करण्याकरिता मोहोरबंद परवाना द्यावा. परवाना द्यावयाचा तो मॅजिस्ट्रेट आणि निदान दोन असेसर यांच्या मते पुढील चार कारणापैकी एखादें कारण असल्याची खात्री होईल तरच द्यावा. ( १) अर्जदार YR