पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/365

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o ली० टिळकांचे केसरींतील लेख. भाषा हा विषयच असा काहीं नाजुक आहे कीं, जेव्हां एखाद्या भाषेत नवे विचार व्यक्त करावयाचे असतात तेव्हां ती ज्यांची स्वभाषा आहे त्यांच्या हातून ते जसे व्यक्त होतात तसे इतरांच्या हातून होत नाहीत. मिशनरी लोकांनी केलेल्या बायबलाच्या भाषांतरावरून ही गोष्ट उघड होत आहे. हे मिशनरी किंवा कॅडीसाहेब याना महाराष्ट्रातील लोकांचे साहाय्य नव्हतें असें नाहीं. तथापि एखादी भाषा आपली जन्मभाषा असल्यानें सदर भार्षतील अर्थाचे भद किंवा इतर स्वारस्य जितकें आपणांस अचुकपणे समजतें तितकें तें परकीयास समजणे कठीण आहे. अशा दृष्टीनें पाहिले म्हणजे इंग्रजी मराठी कोशाचे काम प्री. रानडे याच्यासारख्या विद्वान् मनुष्यानें हाती घेतले आहे, ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. त्यांतूनही विशेष समाधान मानण्यासारखी गोष्ट ही कीं, प्रो. रानडे यांनी या कामी अलिकडील निरनिराळ्या पाश्चिमात्य शास्त्रात प्रविण असलेल्या बहुतक विद्वानांचे सहाय्य घेतले आहे, इतर्केच नव्हे तर निरानराळ्या शास्रांतील पारिभाषिक शब्द त्या त्या शास्रांतील प्रवीण लेोकांच्या नजरेखालून जातील अशी पहिल्यापासून तजवीज ठेविली आहे. इंग्रजी भाषेतील निरनिराळ्या शास्रांचे ज्ञान आपल्या देशबांधवास व्हार्वे याबद्दल महाराष्ट्रातच नव्हे, तर बंगाल पंजाब, सिंध, गुजराथ, मलबार किवा मद्रास प्रांतात सुशिक्षित लेोकाचे प्रयत्न गेल्या पाचपन्नास वर्षे एकसारखे चालू आहेत; व ज्यानी ज्यानीं असे प्रयत्न सुरू केले आहेत त्यांस त्यांस सर्व ठिकाणी एकच म्हणजे नवीन शब्दसमूहाची अडचण आलेली आहे आणि ती दूर करण्याबद्दल प्रत्येक प्रांतांतील विद्वानाचे आपआपल्या परीनें प्रयत्न चालू आहेत. गणित, ज्योतिष, शिल्पकला, यांत्रिकज्ञान, भूगर्भशास्त्र, जीवनशास्त्र, कायदा, नीतिशास्त्र इत्यादि अनेक विपयावर पाश्चमात्य विचार देशी भाषातून उतरण्यास शब्दांची अडचण सर्व ठिकाणीं एकसारखीच असल्यामुळे व ही अडचण दूर करण्यास सर्वोच्या दृष्टीनें मुख्य साधन संस्कृत असल्यानें निरानराळ्या प्रातीतून पुष्कळ अंशीं एकाच धर्तीवर नवीन शब्दरचना आढळून येते. बडोद्यात श्री. सयाजीमहाराज यानीं काढलेल्या कलाभुवनाकरितां शास्त्रीय परिभापा निश्चित करून त्याचा कोश करण्याचे काम कहीं दिवसांपूर्वी चालू होतें, व हल्लीही बनारस येथे नागरी प्रचारणीं सर्भेत तोच क्रम सुरू ठेवला आहे. बंगाल्यांत विश्वकेश म्हणून इंग्रजीत ज्यास एन्सेंक्लोपीडिया म्हणतात तशा प्रकारचा एक कोश तयार झाला आहे; आणि निरनिराळ्या प्रांतांतील देशी भाषांतून जी वर्तमानपत्रे किंवा मासिक पुस्तके निघतात त्यांतून नवे शब्द नवी कल्पना किंवा नवी भाषासरणी आणि विचारपद्धति जारीनें प्रचारांत येऊं लागली आहे. ही जी भाषेच्या अभिवृद्धीची प्रवृत्ति हल्लीं चालू आहे, तिचे धोरण कोणत्या प्रकारचे आहे हें लक्षांत आणून त्याप्रमाणें नवे शब्द बनविणें किंवा परिभाषा ठरविणें अथवा ठिकठिकाणीं जे शब्द पूर्वीच बनविले असतील त्यांतील ग्राह्य कोणते अग्राह्य केोणते, हें ठरवून त्या