पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/366

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेो. रानडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश. ३५१ प्रमाणें इंग्रजी भाषेतील शब्दांस प्रतिशब्द देणे हें हल्लीच्या परिस्थितीत इंग्रजी भाषेतील शब्दांचा देशी भार्षत परिपाक करूं इच्छिणाच्या कोशकाराचे कर्तव्य आहे. हें कर्तव्य प्रेो. रानडे यानीं चागल्या रीतीनें बजावलें आहे असें हल्लींच्या त्याच्या कोशाच्या भागावरून व त्यास जेोडलेल्या प्रस्तावनेवरून दिसून येतें. कै. पांडुरंग गोपाळ मंत्री यांनीं या कोशाकरितां वनस्पतिशास्राचे एक हजार शब्द तयार करून दिले आहेत; व डॉ. देशमुख, प्रेो. गज्जर, रा. ब. महाजनी, डॉ. गर्दै, वगैरे निरनिराळ्या ठिकाणच्या नव्या जुन्या विद्वानानीं सहाय्य केल्यामुळे प्रेो. रानड यांच्या कोशास एक प्रकारचे सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. इतक्या विद्वानाचे साहाय्य मिळण्यास किती प्रयास पडतात, हें अनुभवाशिवाय कोणाच्याही लक्षात येणे कठिण आहे. तथापि इतके सर्व परिश्रम घेऊन प्रो. रानडे यानीं मराठी भाषेचे सद्यःस्वरूप या कोशाच्यारूपानें महाराष्ट्र लेोकांपुढे मांडलें याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. हा उद्योग एकदम नजरेंत भरण्यासारखा नसल्यामुळे कित्येकांस त्याचे पूर्ण स्वरूप लक्षांत येत नाहीं. तथापि थोडीशी भेहनत घेऊन या कोशातील ठळक ठळक शब्द जर कोणी पाहील तर प्रेो, रानड याच्या श्रमाची किंमत त्यास सहज कळून येईल. उदाहरणार्थ, Art Jzz zzII. JI aJzaTQRIA £Tsíaú Artifice, Artist, Artistic, Artisan वगैरे पुष्कळ शब्द निष्पन्न झालेले आहेत. या सर्व शब्दांचा इंग्रजींतील अर्थभेद लक्षात आणून त्याप्रमाणें मराठीत शब्दयोजना करण्याचा प्रो. रानडे यांनी केलेला प्रयत्न; आणि अशा प्रकारचा प्रयत्न नवा असल्यामुळे जरी क्ववित कोणाचा एखाद्या स्थळीं मतभेद असला तरी रानडे याच्या कोशांत दिलेल्या प्रतिशब्दापासून इंग्रजीतून मराठीत भाषातर करणारांस पुष्कळच मदत होईल यात बिलकुल शेका नाहीं. तसेच Association हा शब्द पाहिला असतां केवळ * सभा ’ येवढ्या महाराष्ट्र शब्दानेच त्याचा अर्थ व्यक्त न होतां निरनिराळ्या प्रसंगीं निरनिराळे कसे शब्द योजावे लागतात हेंही लक्षात येईल. अशा त-हेचीं दुसरीही या कोशात पुष्कळ उदाहरणे आहेत. पण ती सर्व येथे देऊन आम्ही जागा अडवीत नाहीं. आणखी एकाच गोष्टीचा उल्लेख करून संपवितों. ती ही कीं, जे काहीं इंग्रजी शब्द महाराष्ट्रभाषेत रूढ झाल्यासारखे आहेत ते टाकून देण्यात आतां कांहीं अर्थ राहिलेला नाहीं, हें तत्त्व प्रो. रानडे यांच्याप्रमाणें आम्हांसही मान्य आहे. बुकास पुस्तक, पेन्सलीला शलाका, स्लेटीस अष्म पाटी किंवा रेल्वेस लोहमार्ग आणि स्टेशनास वाष्परथोक्लासस्थान अगर तिकिटास प्रवासपत्र वगैर प्रतिशब्द देण्यांत कांहीं इंशील नाहीं. भाषेत परकीय शब्द नसणें हें स्वाभमानाचे लक्षण आहे खरें, पण त्याचा अर्थ असा की, परकीय शब्दांचा स्वदेशी शब्दांवर शिरजेारपणा होऊं नये; परकीय शब्द मुळींच स्वभाषेतून येऊं नयेत असा नव्हे. संस्कृत भाषेतही सामी, तामरस इत्यादि शब्द किंवा ज्योतिष शास्रांतील जामित्र,