पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/368

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुधर्मावरील अलिकडचीं कांहीं पुस्तकें. ३५३

  • हिंदुधर्मावरील अलिकडचीं कांहीं पुस्तकें.

धर्मशिक्षणावांचून विद्याथ्यांचा स्वभाव जितका करारी बनावा तितका बनत नाहीं अशा प्रकारची ओरड जरी एका बाजूनें चालू आहे तरी शाळाखात्यांतील अधिकारी याचा हिंदुधर्मावर इतका कटाक्ष आहे कीं, मराठी पुस्तकाच्या आरंभीं ‘श्रीगणेशायनमः” हे शब्द किवा नुसतें ‘श्री’ हें अक्षरसुद्धा त्याना खपेनासें झाले आहे. शाळाखात्यातील अधिकारी व विशेषेकरून हल्लींचे डायरेक्टरसाहेब यांचा हिंदुधर्मावर इतका रोष का व्हावा, हे आम्हांस समजत नाहीं. विद्याखात्याकरिता जी मराठी क्रमिक पुस्तकें आहेत ती ज्या शाळातून चालतात त्या शाळांतील विद्यार्थी बहुतेक हिंदुधर्माचेच असतात. क्वचित् ठिकाणीं कहीं मुसलमान किंवा नेटिव्ह खिस्ती असण्याचा संभव असतो.पण या थाङयाश्या विद्याथ्याकरिता किंवा त्याच्या सबबीवर मराठी क्रमिक पुस्तकात असलेल्या भारतभाग वतातील काही सुप्रसिद्ध कथा काढून टाकणें किवा पुस्तकाच्या आरंभी * श्रीगणेशाय नम: ? ही अक्षरे न ठेवणे म्हणजे अगदींव वेडपणा होय. यास आम्हीं धर्मवेडेही म्हटले असतें, पण हिंदुस्थानसरकार अशा प्रकारच्या धर्मवेडात सहसा शिरत नाही असा अनुभव असल्यामुळे विद्या खात्यातीळ अधिका-यांच्या या : कृत्याम अप्रबुद्ध, छादिष्ट किंवा वेडगळ म्हणणे भाग पडत आमच्या ऐकण्यात अशीही गोष्ट आली आहे की, येथील फमेल हायस्कुलात किंवा ट्रेनिग कॉलेजात बायकांस किंवा मुलींस जी गाणी शिकवावयाची तहिं शिव, विष्णु किवा राम इत्यादि हिदुदेवताची असू नयेत असा विद्याखात्याच्या अधिपतीचा हुकूम झाला आहे ! ही जर गोष्ट खरी असेल तर सरकारी विद्याखात्याच्या अधिपतीचे वर्तन आणि शाळाक्षात्याच्या सुधारणेसबधाने सरकारी ठराव या दोहीमध्यॆ अत्यंत विरोध आहे अथवा ती अगदी विसंगत आहेत असे म्हणणें भाग येतें. विद्याथ्यांचा स्वभाव बनणे म्ह्णजं सत्यनिष्ठा, देशप्रीति, करारीपणा, इत्यादि गुणाची त्यांच्या अंगी अभिवृद्धि होऊन राष्ट्रातील लोकाचे पुरस्कर्त होण्याची योग्यता त्याच्या अॅगीं यावी हे इष्ट आहे; ही गोष्ट जर खरी असेल तर वरच्यासारखे प्रकार सरकारी शाळातून का व्हावे हे आम्हास समजत नाहीं. धर्मशिक्षण द्यावयाचे व विशेषेकरून तें लहान मुलांस द्यावयाचे म्हटलैं म्हणजे निरनिराळ्या धमीतील सामान्य सिद्धान्त मुलास सागितल्यानें तें काम कधीही सिद्धीस जावयाचे नाही. लहान मुलांमध्ये किंवा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्तीपेक्षां मनोवृत्तीचेच विशेष प्राबल्य असते. आणि ज्या धर्माचे उपदेशक, प्रवर्तक, किवा उत्पादक विद्याथ्यांस पूज्य नसतात किंवा धर्मकथा लहानपणी घरींदारी न ऐकल्याने त्यास प्रिय झालेल्या नसतात त्याच्या द्वारें त्यांच्या

  • { केसरी तारीख ३-११-१९०३ )

Yゞ