पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/377

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. प्रकारचा आहे असें द्वैत व विशिष्टाद्वैतवादी म्हणतात. पण त्याचा विचार करण्याची सध्यां जरूर नाहीं. चित् आणि जड सृष्टीच्या मुळांशीं काय आहे एवढ्याचाच आपणास विचार करावयाचा आहे; आणि त्याचा बोध वर जे सांख्यांचे आणि वेदांत्यांचे सिद्धांत दिले आहेत. त्यावरून होण्यासारखा आहे. सांख्य आणि वेदांताखेरीज सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल न्याय आणि वैशेषिक अशीही दुसरीं दोन मर्ते आहेत. त्यांच्या दृष्टीनें जगांतील सर्व पदार्थ द्रव्य, गुण, कर्म सामान्य विशेष, समवाय आणि अभाव या सात केोटींत पडतात; आणि सर्व द्रव्यांची उत्पाति परमाणू पासून झालेली असून द्रव्यामधील पृथ्वी, आप, तेज, वायु, आदिकरून मूलभेद होण्यास परमाणूमधील भेदच कारण होतात असे वैशेषिकांचे म्हणणें आहे. तात्पर्य, त्रिगुणाच्या साम्यावस्थेपासूनच पुढे विषमावस्था होऊन पदार्थाचे भद होतात असें जें सांख्यांचे मत आहे तें वैशेषिकांस कबूल नसून भेदाची उत्पत्ति भदापासूनच झाली पाहिजे, व त्याकरितां विशेष हें तत्त्व निराळे मानले पाहिजे, असे त्यांचे म्हणणें आहे. त्याचप्रमाणें प्रकृती आणिं पुरुष हीं दोनच तत्त्वे न मानतां त्यापेक्षा आदितत्त्वांची संख्या न्याय व वैशेषिक मतांत जास्त धरलेली आहे. या दोन्ही मताचे तत्त्ववेते ईश्रराकडे जगाचे कर्तृत्वं देतात, पण तें मत वेदांत्याच्या ईश्वरविषयक मतांपेक्षां बरेंच निराळे आहे. सांख्यांचे सेश्वर• सांख्य आणि निरीश्वर-सांख्य असें भेद आहेत. पण विस्तारभयास्तव ते येथें सागताँ येत नाहीत. स्पेन्सरसाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा प्राचीन तत्त्वज्ञानाशीं कितपत मेळ आहे एवढेच थोडक्यात आम्हांस सांगावयाचे आहे, व वर केलेला प्राचीन मतांचा उल्लेख तेवढयापुरता बस्स आहे. याखेरीज प्रस्तुत विषयास दुसरें उपयुक्त मत म्हटले म्हणजे चार्वाकाचे होय. वरील सर्व मतांत जीव किंवा चैतन्य हें जडाहून निराळे व नित्य मानलेले आहे. चार्वाकाच्या दृष्टीनें हें मत बरोबर नाहीं. जडाचेच देहाकार जें दृश्य स्वरूप झालेले आहे त्यांतील द्रव्यसंघाताचाच चैतन्य हा एक धर्म आहे. आणि देहाचा नाश झाला म्हणजे त्याबरोबर तो धर्मही नाहींसा होतो; कारण * न हि प्रेत्य संज्ञाऽस्ति ? असें चार्वाकांचे म्हणणें आहे. या मताप्रमाणें अर्थातच परलोक वगैरे कल्पना चुकीच्या होतात. तथापि जगांतील मनुष्याचे वर्तन नीतीचे व परोपकाराचे असावें असें सिद्ध करण्यास या मताची कांहीं हरकत येत नाहीं. पण तीही गोष्ट चार्वाक मतवाद्यांनीं कबूल केलेली दिसत नाहीं. असे; या प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या मतांशीं आधुनिक शास्रपद्धतीनें स्पेन्सरसाहेबांनीं ठरविलेल्या मूल तत्त्वांचा कितपत मेळ आहे याचा आतां विचार करूं, स्पेन्सरसाहेबास अलीकडील रसायनशास्त्र, जीवनशास्त्र, मानसशास्त्र, पदार्थविज्ञानशास्र, वगैरे सर्व आधिभैतिक व अध्यात्मिक शास्रे व त्यांतील सर्व नवे शोध पूर्णपणे अवगत होते इतकेंच नव्हे तर या शास्राची प्रगति पुढे कोणत्या दिशेने झाली पाहिजे यासंबंधीं त्यांचे विचार त्या त्या विशिष्ट शास्रांतील वाकबूगार