पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/382

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्बर्ट स्पेन्सर. ३६७ सांख्यांचे तत्त्वज्ञान अशा रीतीनें व्यवहारोपयोगी करण्याचा आमच्यामध्यें पूर्वी कधींच प्रयत्न झालेला नव्हता. नाहीं म्हणावयास भगवद्गीता हाच काय तो अपवाद आहे; पण वेदांत्यांच्या हातांत या अपूर्व व्यवहारोपयेोगी तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाची बरीच दुर्दशा झालेली आहे. स्पेन्सरसाहेबांच्या ग्रंथापासून जर कांहीं नर्वे वळण आपणांस घ्यावयाचे असेल तर तें हेंच होय कीं, सृष्टीच्या बुडाशीं जीं काहीं अगम्य तत्त्वे आहेत त्यांचा विचार करून तत्त्ववत्त्यांनी आपणांस मुक्ति मिळाली म्हणून उगीच बसावयाचे नाहीं. या गूढ तत्त्वांचा विचार करणें तत्त्वज्ञाचे जितकें कर्तव्य आहे तितकेंच हीं तत्त्वें व्यवहारास कशीं लावावा हें जगाच्या नजरेस आणून देऊन मानवजातीची पूर्णावस्था कशी संपादावी ह्याचा त्यांस बोध करणें हेंही त्यांचे काम होय. हीं दोन्हीही कार्मे स्पेन्सरसाहेबांनी आपल्या ८४ वर्षाच्या आयुष्यांत उत्तम रीतीनें बजाविलीं आहेत; व यामुळे कपिल, गौतम, कणाद, बुद्ध वगैरे प्राचीनकाळीं जे मोठमोठे तत्त्ववेते होऊन गेले त्यांच्याप्रमाणे तत्त्वज्ञ या दृष्टीनें यांचे नांवही चिरकाल राहील. शास्त्राच्या प्रगतीमुळे यांनीं सिद्ध केलेल्या तत्वांत पुढेमार्गे काहीं फेरफार करावें लागले तर ती गोष्ट त्यांनीं सिद्ध केलेल्या उत्क्रांती तत्वास अनुरूपच आहे किंवा होईल असें म्हटलें असतां त्यांत कांहीं गैर हेोणार नाहीं. परंतु तेवढ्यामुळे त्यांनीं समग्र आधुनिक शास्त्राचे सर्व आयुष्यभर अालेोडन करून संसारसुखाची अपेक्षा न धरती परोपकार बुद्धीनें जगाच्या बुडाशीं असलेलीं जीं तत्वें शास्त्रीय पद्धतीनें सप्रमांण सिद्ध केलेली आहेत त्यांची योग्यता कमी होत नाहीं; अगर ज्ञानी या नात्यानें स्पेन्सरसाहेबांस जो मान आम्हीं द्यावयास पाहिजे त्यांतही कमतरता येत नाहीं. अशा प्रकारचे ज्ञानी पुरुष फारच विरला. शेकडों वर्षात एखाद दुसराउत्पन्न होत असतो; व खिस्ती मिशन-यांच्या कोत्या समजुतीप्रमाणें जरी हे नास्तिक ठरले, तरी श्रीकृष्णांनीं भगवद्गीर्तेत म्हटल्याप्रमाणें आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी यांपैकीं प्रियो द्देि ज्ञानिनोऽत्यर्थेमहुं स च मम प्रियः । उदाराः सर्वे एवै ते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ॥ ज्ञानी हेच अखेरीस ईश्वरास प्रिय होतात व त्याच्या पदाप्रत पावतात हें निश्चित आहे. असे पुरुष देशांत उत्पन्न होणें हेंच देशाच्या सजीवतेचे लक्षण होय. व असलेच पुरुष जगाच्या गूढ तत्वांशी झुंजून तीं मानव जातीस अधिकाधिक सुगम करून देऊन मनुष्यमात्राची अाध्यात्मिक व अधिभौतिक उन्नति करून देतात व आपल्यास व आपल्या बांधवास कृतार्थ करून घेतात. स्पेन्सरसाहेबांनीं लग्न केलें नव्हतें, द्रव्याचीही तृष्णा धरली नव्हती, किंवा पार्लमेंटमध्यें, लोकलबोडीत अगर म्युनिसिपालटीमध्ये सभासद होण्याची हाव धरली नव्हती; तर वैराग्यानें आणि एकनिष्ठपणानें एकोणिसाव्या शतकातील आधिभौतिक विचारार्ने ग्रस्त झालेल्या उत्तरार्धातही आध्यात्मिक प्रश्नांचा विचार करण्यांत जन्म घालविला,