पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/383

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*Sと लो० टिळकांचे केसरींतील लेख. आणि आपल्या अलौकिक बुद्धिसामथ्र्यानें या बाबतींत पुडील पिढीच्या विचारांस नवीन वळण घालून दिले. असले पुरुषच जगाचे खरे हितकर्ते होत आणि वर सांगितल्याप्रमाणें ते कोणत्याही देशांत उत्पन्न झाले असले तरी * विद्वान् सर्वत्र पूज्यते ’ या न्यायानें सर्व देशांतल्या व सर्व ठिकाणच्या लोकांस ते एकसारखे पूज्य असतात. स्पेन्सरसाहेबांचे वय मरणसमयीं ८४ वर्षाचे असल्यामुळे व शास्रीय विचारांची तत्वज्ञानदृष्टया एकवाक्यता करण्याचें जें काम त्यांनी हातीं घेतलें होतें तें बहुतेक पुरे झाले असल्यामुळे त्यांचे मृत्यूबद्दल हळहळ वाटावयाचे कांहीं कारण राहिलें नाहीं; तथापि, विशाल बुद्धिमतेचे पुरुष क्वचित् निर्माण होतात हें लक्षांत आणलें आणि आमच्या देशांतील बुद्धिवान् लोकांची सद्य:प्रवृति मनांत आणली म्हणजे दु:ख वाटल्याखेरीज राहत नाहीं. % सामाजिक परिषद, राजकीय चळवळीची ही स्थिति झाली. सामाजिक विषयासंबंधानेंही मद्रासेस अशाच प्रकारची स्थिति होऊन सामाजिक सभा भरल्यानंतर दुसरे दिवशीं तेथील हायकोर्टाचे जज्ज सर सुब्रह्मण्य अय्यर यांच्या अध्यक्षतेखालीं एक मोठी सभा भरून त्यात प्रेो. रंगाचार्य व मिसस अॅनीबिझांट याचीं भाषणें झालीं व * हिंदु असोशिएशस ' नांवाची सभा स्थापण्यांत आली. आमच्याकडे सुधारक मतांचा ज्या कारणाकरितां आज कित्येक वर्षे निषेध करण्यांत येत आहे ताँच मर्ते मद्रासच्या या हिंदु असोशिएशन सभेस पसंत असून तेवढयाकरितां या सभेची मंडळी सामाजिक परिषदेपासून निराळी झालेली आहे. कै. न्या. रानडे हे यावेळीं मद्रासस असते तर कदाचित् त्यांनी ही दुफळी होऊं दिली नसती; पणं न्या. चंदावरकर यांस तसली हातोटी साधलेली नसल्यामुळे त्यांनीं सामाजिक परिषदेच्या पूर्वी (कै. रानडे करीत हेोते त्याप्रमाणे) जें प्रास्ताविक भाषण केले त्यांत विरुद्ध पक्षाचे त्यांस समाधान करतां आले नाहीं. देशांत परकीय राज्य झाल्यामुळे आपल्या सभोवारची परिस्थिति पालटलेली आहे, व त्या परिस्थितीस अनुसरून आपल्या समाजाच्या चालीरीतीत जर फेरफार झाले नाहीत तर आपला टिकाव लागणार नाहीं असे मोठ्या गंभीरपणानें मि. चंदावरकर यांनी आपल्या भाषणांत सांगितलें; इतकंच नव्हे तर, ‘एकं सद् विप्रा बहुधा वदंति' हा ऋग्वेदांतील मंत्र म्हणून असें प्रतिपादन केलें कीं, यांत ज्याप्रमाणें देवासंबंधानें बहुत्वांत ऐक्य दाखविले आहे त्याप्रमाणेच हिंदुसमाजांत जरी निरनिराळ्या जाती असल्या, तरी त्या सर्वांत ऐक्य आहे हें दाखविण्याचा व तें संपादन करण्याचा सुधारकांचा प्रयत्न आहे. न्या. चंदावरकर यांनी हें जें तत्त्व आम्हांस सागितल त्यांतील खरै इंगित

  • (केसरी, तारीख ५-१-१९०४)