पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/384

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक परिषद, ३६९ काय हें त्यांसच कळले आहे कीं नाहीं याची आम्हांस शंका आहे. केसरी पत्रांत तरी आम्हीं अनेक वेळां असें स्पष्ट लिहिले आहे कीं, सुधारणा मुळींच नका असे म्हणणारांपैकीं आम्ही नाहीं. मनुष्य किंवा समाज यास सर्भेवतालच्या परिस्थितीप्रमाणें आपापले स्वरूप बदलण्याची शक्ति ईश्वरानेंच दिली आहे; आणि न्या. चेदावरकरासारखे सुधारक न निघाले तरीही हे फेरफार होतील व होत जाणार यांत बिलकूल शंका नाहीं. मुसलमानी राज्यांत आमच्या चालीरीती बदलल्या नाहींत काय ? अथवा देशांत ज्या वेळीं बैौद्ध धर्माचे प्रस्थ माजले होतें तेव्हां आम्हीं आपल्या सामाजिक रीतीभातींत कांहीं फेरफार केला नाहीं काय ? होय; केला आहे, तर मग आतांच एवढा वाद कां ? उघडच आहे कीं, बौद्ध राजांच्या अमलाखालीं किंवा मुमलमानी राजांच्या अमलाखालीं राहूनही आम्हीं अद्याप हिंदुत्वाचा आभिमान कायम ठेवला आहे व तेोच पुढे कोणतीही परिस्थिति आली असतां कायम ठेवावा अशी आमची इच्छा आहे. सुधारकांचा व आमचा कांहीं मतभेद आहे तो हाच होय;आणि त्याचे एकच उदाहरण दिलें असतां खुलासा होण्यासारखा आहे. आमच्या देशांतील वाणी, भाट्य वगैरे पुष्कळ जातींतील लोक आफ्रिका, सुएज, चीन, हांगकांग, ब्रह्मदश वगैरकडे व्यापाराकरितां जाऊन आलेले आहेत. नुकत्याच चीन देशांत गेलल्या शीख, रजपूत, आणि पुरभय्ये यांच्या पलटणी परत आल्या, पण त्यांस जातींत परत घेण्याची केोठेच अडचण पडली नाहीं. परंतु एखादा आमचा सुधारक विलायतस जाऊन बॅरिस्टर होऊन परत आला म्हणजे त्यास जातींत घेण्याचा मोठा बेोभाटा होऊन सामाजिक परिषदेच्या मंडपांत त्याची मोठी भवती न भवती चालत असते. पण कोणी असा विचार करीत नाहीं कीं, या बेट्याला कोठे ज्ञातीधर्मीप्रमाणे राहावयाचे असतें ? हा हवें तें खाणार, हवें ते पेिणार, हवा तसा पोषाख करणार, धर्माच्या नांवानें माहिती शून्य आणि इच्छाही शून्य. अशा स्थितीच्या मनुष्यास जातीने आपल्या समाजांत न घेतले म्हणून सामाजिक परिषदेंत ओरड करण्यांत फायदा काय ? हिंदु लोकांचे नांव सोडून द्या; पण उद्यां हिंदुस्थानांत आलेला एखादा इंग्रज विलायतेस परत गेल्यावर धोतरें नेसू लागला, चमचा काटे न घेतां हातानें जेऊं लागला, आणि डोक्यावरचे केस काढून आमच्याप्रमाणें शेंडी ठेवून वागूं लागला, तर त्याला विलायतॆतील लोक आपल्या समाजांत जेवणाखाण्यास किंवा इतर प्रसंगीं आमंत्रण देऊन बोलावतील काय ? आपण असेंही समजूं कीं त्यानें खिस्तीधर्म सोडला नाहीं, फक्त आचार मात्र हिंदूंचा घेतला आहे; तरीही पण विलायतंतील बायकापोरेंच नव्हे तर शहाणे लाकही त्यास आपल्या टेबलावर जवावयास ध्यावयाचे नाहीत. विलायतेंत जर ही स्थिति तर इंग्लंडाहून परत आलेल्या आमच्या * न हिंदुर्न यवनः ’ अशा ४६