पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/391

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

રે ૭૬ लो० टिळकांचे केसरींतील लेख. आणि हिंदुधर्म-ग्रंथांचे मंथन करून त्यांनीं जें रहस्य काढून श्रोत्यांस अर्पण केलें आहे, तें त्यांच्या पूर्वीच्या लौकिकास कमीपणा आणणारे खचित नाहीं. बंगलोर येथे दिवाणबहादुर सर कृष्णमूर्ती यांचे अध्यक्षतेखालीं एक व्याख्यान झाले. त्यामध्ये पंडिताबाईंनीं * आपले चरित्र व आपण केलेली कामगिरी ? यांचे मोठे मनेोरंजक कथानक लाविलें होतें. आपल्या जुन्या चालीच्या व कर्मठ बापार्ने आपणास थोडेंबहुत संस्कृत कसे शिकविलें, व त्या तुटपुंज्या (Smattering) ज्ञानाचे साहाय्यानें व * विचारी मनाच्या ’ मदतीनें आपण सवै हिंदुशास्ने, तत्त्व ग्रंथ व पुराणग्रंथ यांचे ओलेडिन कसे केले, त्या अध्ययनामध्ये आपणास कसकसे जबरदस्त संशय आले. व शेवटीं बायबलानें * भिद्यते हृदयग्रंथिः च्छिद्यन्ते सर्व संशयाः ’ अशी आपली स्थिति होऊन आपण प्रभूच्या चरणाचा कसा आश्रय केला याचे त्यांनी केलेलें वर्णन फारच बहारीचे झाले आहे ! त्यांचा पति मरण पावल्यानंतर पंडिताबाईंचा हिंदुसमाजानें फारच छळ व जाच केला; व त्यामुळे त्यांस हिंदुधर्माचीं बंधनें तटकन् तोडून टाकण्याची स्फूर्ति झाली; आणि हिंदुधमौत न मिळणारें स्वातंत्र्य खिस्तीधमीत त्यास गवसल्यामुळे त्यांनी त्याची कास धरली ! हिंदु पुराणांतील सप्तसमुद्र व तीन खंडें, सात स्वगै व सप्तपाताल, गजमुख व अश्वमुख-देव-देवता, ग्रहणासंबंधाची व राहूंकेतूंची कथा, शाळिग्रामपूजा ह्या थीतांडासंबंधानें त्यांस जबरदस्त सशय येऊं लागले; व ह्या संशयाची निवृति करणारा हिंदुधर्मात कोणीच सदुरु त्यांस भटला नाहीं. हिंदु शास्ने स्रियांना पतीवाचून दैवत नाही असे लिहितात; विधवाना मोक्ष नाही व स्त्रिया ह्या पापाच्या पुतळ्या आहेत असें त्याचे मत आहे; स्त्रियानीं पतीची सदैव गुलामगिरीच केली पाहिजे असाच हिंदुशास्रांचा इत्यर्थ आहे. प्रायश्चित्त म्हणजे निवळ थीतांड आहे; गाईच्या शरीरापासून निघालेल्या पांच द्रव्यांच्या पंचगव्यानें पाप नाहीसें होतें असे म्हणणे हा केवढा मूर्खपणा ! अशा प्रकारच्या अनेक संशयांनीं पंडितेच्या * विचारी मनास ? पछाडलें. अमक्यातमक्या देवाची पूजा करा किंवा अमुक स्तोत्रे म्हणा, अथवा अमुक तीर्थास जा, अस जे जे परमेश्वरप्राप्तीचे मार्ग हिंदुशास्रार्ने सागितले ते ते पंडिताबाईंनीं अनेक वर्षे केले; परंतु सर्व व्यथै. पण पुढे जेहां त्यांनी बायबलाचे अध्ययन करून व येशूच वचनावर विश्वास ठेवून त्याची मनोभावें प्रार्थना केली तेव्हां तो प्रभू येशू आपल्या ह्या प्रिय भाक्तणीस एका रात्रींत पावला ! आणि त्यानें सत्य काय आहे याचा त्यांस उपदेश केला ! ? व तो प्रभू अजूनही त्यांच्या प्रार्थना ऐकतो व त्यांस दर्शन देतेो !!! त्यांच्याप्रमाणें दुस-या कोणीही जर येशूची अशीच प्रचिती पाहिली तर तो त्यांसही पावेल व ते मागतील तें तो त्यांस देईल, असें पंडिताबाईंनी आपल्या श्रोत्यांस सांगितलें; श्रीपांडुरंगाचे जनाबाईशीं जितके सलगीचे वर्तन होर्ते तितकें प्रभू येशूचेही जरी रमाबाईशीं आहे तरी त्यानें एक गोष्ट पंडिताबाईपासून लपवून ठेवलेली दिसतो. * तुमचा जो प्रभू एवढा सर्व-शक्तिमान आहे. व जो तुम्हास