पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/411

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. विचार केला तरी त्यांत कांहीं वावगे होणार नाहीं. मराठी भाषेतील शब्द विशेषेकरून शब्दांतील अंत्य किंवा उपांत्य वर्ण किंवा अनुस्वार हे कसे लिहावे, हा मुख्य प्रश्न आहे. कित्येक संस्कृताचे अभिमानी असून, संस्कृत शब्दास प्राकृत भाषेत निराळ्या रीतीनें लिहिणे प्रशस्त नाहीं असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरा पक्ष असा आहे कीं, मराठी भाषा ही जरी प्राकृतद्वारां संस्कृतापासून निघाली असली तरी मराठी भाषेचे म्हणून कांहीं स्वतंत्र नियम आहेत; व ते नियम मराठी भाषेत आलेल्या संस्कृत शब्दासही अवश्य लावले पाहिजेत. तिसरा पक्ष केवळ उच्चार शरण आहे. म्हणजे शब्दाचा जसा उच्चार करतों तसा तो लिहावा, इतर गोष्टीकडे लक्ष देण्याची जरूर नाहीं, असे त्याचे म्हणणें आहे. चवथा पक्ष व्युत्पत्ती, भाषेची सोय आणि उच्चार, या सर्वासही सारासार विचारानें महत्त्व देऊन त्याप्रमाणे लेखन पद्धतीचे नियम ठरवावें, अशा मताचा आहे. यापैकी कोणता पक्ष ग्राह्य याचे पहिल्यानें थेोर्ड विवेचन करणें जरूर आहे. पहिल्यानें उच्चारवादी पक्षाचे परीक्षण करूं. ज्याप्रमाणें उच्चार करावयाचा तसा शब्द लिहावयाचा म्हटले तर प्रायः सर्वत्र अनवस्था होण्याचा प्रसंग आहे. उच्चार प्रमाण धरावयाचा तो कोणता ? सुशिक्षित वर्गाचा कीं आशिक्षित वर्गाचा ? सुशिक्षित वर्गाचा म्हणावें तर भाषा बोलण्याचा अधिकार सुशिक्षित वर्गास आहे. आणि अशिक्षित वर्गास नाहीं, असें मानतां येत नाहीं. शिवाय सुशिक्षित वगीत तरी बोलण्याची पद्धत एकच कोठे आहे ? कोंकण आणि देश, यांवरील उच्चार निरनिराळे आहेत. इतर्केच नव्हे तर, घाटावरही, खानदेशी, धारवाडी, मिरजसागलीकडील, इंदुरी, ग्वाल्हेरी, वगैरे उच्चार निरनिराळेच पडतात. आमच्याच देशांत ही स्थिती आहे असें नाहीं, तर विलायतेंत इंग्रजी भाषेसंबंधानेही अशीच अवस्था आहे. वेल्स, स्कॉटलंड, आयलैड किंवा खुद्द इंग्लंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील परगणे यातले आशिक्षितांचेच नव्हे तर सुशिक्षिताचेही उच्चार निरनिराळे होतात; इतकंच नव्हे तर हिंदुस्थानांत हिंदु लोक जें इंग्रजी बोलतात तेंही मद्रास, मुंबई, बंगाल, या प्रांतांत थोडेस निरनिराळ्या रीतीनें बोलतात. सामान्यतः असेंही म्हणता येईल कीं, कोणीही मनुष्य आपली जन्मभाषा सोडून इतर भाषा बोलू लागला म्हणजे जन्मभाषेच्या उच्चाराची त्यास जी जन्मत:च संवय लागते तिचीच झांक दुसच्या भाषेच्या उच्चारांत आढळून येते. साहेबलेोक मराठी भाषा कशी बोलतात. याचा ज्यार्ने थोडासा विचार केला असेल त्यास ही गोष्ट सहज कळून येईल. उदाहरणार्थ, मराठी भाषेत ‘तुम्ही' हा शब्द दुस-या अक्षरावर जेोर देऊन उच्चारतात. पण इंग्रजी भाषेत अशा प्रकारच्या शब्दांत पहिल्या अक्षरावर जेोर देण्याची पद्धत असल्यामुळे साहेबलोक त्याचा उच्चार “तुम्ही” किंवा “टु' मी ” असा वेडावाकडा करीत असतात. सारांश, केवळ