पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/416

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषेची लेखनपद्धति. 9 o & जींत * ए ’ हा स्वर -हस्व आहे हे पुष्कळांस माहीत असेलच. मराठींत व संस्कृतांत ‘ए’ हा शब्द दीर्घ मानला आहे. तथापि, * एक ’ या शब्दांतील * ए ? आणि एकदम या शब्दांतील * ए * यांच्या उच्चारात भद आहे हें कोणाच्याही लक्षांत येईल. हे उच्चाराचे भद ती ती भाषा बोलणाराकडूनच समजून घेतले पाहिजेत. आणि तसे समजून न घेता केवळ लखनपद्धतीवरून उच्चार करण्याचा जर कोणी प्रयत्न करील, तर मराठी लहानमुलाप्रमाणे एक तर तो प्रत्येक अक्षराचा निरनिराळा उच्चार करीत जाईल, किंवा त्याची जन्मभाषा निराळी असल्यास त्या जन्मभाषेतील उच्चाराची रीत मराठी शब्दास लावून साहेब लोक मराठीचा उच्चार करतात त्याप्रमाणे वेडावाकडा उच्चार करील. कानडी लोक मराठी बोलावयास लागले असता, किंवा मराठी लेोक कानडी बोलावयास लागले असता अथवा हिदुस्थानातील केोणताही मनुष्य इंग्रजी बोलावयास लागला असता थेोडाबहुत तरी अशा प्रकारचा उच्चार-संकर-किंवा त्यास-वर्णसंकर म्हटले तरीही चालेल-होतोच होतेा. जी भाषा आम्ही नेहमीं प्रचारांत बोलती त्यातील शब्दाचे उच्चार आमच्या अगवळणी किंवा जिव्हावळणी पडले असल्यामुळे आमच्या लक्षात वर सागितलेले बारेिकसारीक भेद येत नाहीत. पण जेव्हा एखाद्या प्रचारातून गेलेल्या किंवा मृतभाषतील शब्दाचा उच्चार करण्याचा किंवा परकी भाषा बोलण्याचा प्रसंग येतो तेव्हा या सर्व अडचणी आपेोआप नजरस येतात. मराठी भाषेतील क्रमिक पुस्तके परकीयाकरितां रचावयाची नाहींत हे आम्ही वर सागितलेंच आहे; व तसे असेल तर वर लिहिलेल्या गोष्टीचा त्यात समावश करण्याची गरज नाही हे खरें आहे. पण * जसे बोलावें तसे लिहावे, ’ * जसें बोलाव तसे लिहावें ’ म्हणून कित्येक जी ओरड करितात त्यांत तथ्य किती आहे व हे तत्त्व अमलात आणणें किती अशक्य आहे हे दाखविण्याकरिता उच्चार व लेखनपद्धति यामधील संबंधाचा वर लिहिलेला थाडासा उहापेोह करणे भाग पडले. आता लेखनपद्धतीसंबंधानें -हस्वदीघादिकाचे जे नियम आहेत त्याचा पुढे विचार करूं. خ۶حجمعصحیح و مماسب سهمیه و بسیجی

  • ( नंबर ३ ).

उच्चाराप्रमाणे कोणच्याही भाषेची लेखनपद्धति सवीशीं ठरावणे हे किती कठिण किंबहुना अशक्य आहे, याचा विचार गेल्या अंकों केलाच आहे. प्रातेोप्रांतीं उच्चाराचा भद असती एवढीच या प्रकारच्या लेखनपद्धतीस अडचण आहे असें नाहीं; तर मुखानें जितके उच्चार होतात तितके लेखांत अक्षरानीं

  • (केसरी, ता, २६ जुलै १९०४). to o