पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/423

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 о 6 लो० टिळकांचे केसरीतील लेख. -हस्व इकारान्त किंवा -हस्व उकारान्त संस्कृत शब्द आणि -हस्व इकारान्तं किंवा उकारान्त अव्ययें, यासंबंधानें जो वाद आहे त्याचा आम्हीं वर सांगितल्याप्रमाणें नियम केल्यानें आपोआप उलगडा होतो. दुसरा नियम उपान्त्य उहस्व “ इ ’ व ‘ उ ’ याबद्दलचा आहे. अन्त्याक्षर अकारान्त असता उ 'ान्त्य उहस्व इ व उ याचा उच्चार मराठी भाषेच्या स्वभावाप्रमाणें दीर्घ होतेो; जसें * कठीण ’ * करमणूक ’ इत्यादि. यासाठी मराठींत आलेले ‘ गुण ? * युग ? विष ? * सुख ' वगैरे शब्द * गुण ? * युग ? * विष ? * सुख ? असें दीर्घ उ गन्त्याचे लिहावे, असें एकपक्षाचे म्हणणें आहे. यास आधार काय तो उच्चार व प्राकृत भाषेची सरणी हा होय. व्युत्पतिदृष्टया या शब्दातील उपान्त्यस्वर दीर्घ का लिहावे यास काही कारण नाहीं. मार्गे आम्हीं सागितलेच आहे की, *वर' हा शब्द मराठीत पाहल्या * घ ’ वर जोर देऊन उच्चारतात व शेवटचा * र ' चा उच्चार जरा अस्पष्ट होतेो. या नात्यानें पाहिले तर * विष ’ या संस्कृत शब्दातील * वि ' चा उच्चार उदात्त व *ष ? चा अस्पष्ट करून तो शब्द विष असा उच्चारावा लागल, हें खरे आहे, परतु प्रश्न एवढाच आहे की, उपान्त्य -हस्व * इ ’ व ‘ उ ? उदात्त झाले तर ते दीर्घ लिहावे की काय ? उदात्त स्वर आणि दीर्घ स्वर यामध्ये भेद आहे -हस्व स्वरही उदात्त होऊं शकतो, हे लक्षांत ठेविले पाहिजे. यासाठी आमचे असें मत आहे की, या शब्दातील उपान्त्यस्वर संस्कृतातल्याप्रमाणेच -हस्व लिहून त्याचा उच्चार मात्र * घर ’ यातील * घ’ प्रमाणे करण्यास सांगावें. उच्चार दीर्घ नाहीं, उदात्त आहे हें * गुणावगुण ’ या सामासिक शब्दातील पहिला * गु ’ व दुसरा ‘गु ’ याच्या उच्चारावरून दिसून येईल. * अणुरेणु ? वगैरे शब्द याच वर्गातील आहेत. मराठी भाषेत उपान्त्य ‘अ’ ‘इ’ व ‘उ’ (व्हस्व ) उदात्त उच्चारले जातात. हे तिहींच्या म्हणजे ‘अ’ “इ’ व ‘उ’ हे उपान्त्य असता त्यांच्या उच्चारावरून स्पष्ट दिसते; व ‘अ’ला जो नियम लागू करावयाचा तोच ‘इ’ व ‘उ’ यासही केला पाहिजे. * घर ’ हा शब्द जर * घार ’ असा लिहित नाहीत तर * विष ’ हा तरी * वीष ’ असा का लिहावा, हे आम्हांस समजत नाहीं. * घ ’ व ‘ वि ? याचे उच्चार दीर्घ नव्हत, उदात्त आहेत हें * घर ’ या शब्दातील *घ ’ च्या उच्चारावरून स्पष्ट दिसत आहे. तर मग ‘विष' व * गुण ' याचे उपान्त्य दीर्घ करणे म्हणजे * इ ’ व ‘ उ ? यांच्या दीर्घ व उदात्त उच्चारातील भद नाहींसा करणे होय. शिवाय वर सागितलेच आहे कीं, उपान्त्य स्वर दीर्घ लिहिण्यास उच्चाराखेरीज दुसरा आधार नाहीँ. अर्थात् एकट्या उच्चाराच्या आधारावर संस्कृत शब्दाचीं मूलरूपे पालटणे बरोबर होणार नाहीं. तिसरा नियम व्यंजनान्त शब्दांचा होय; उ. * क्वचित् ’ * विद्वान् ? همه و همه

  • शरद् ’ इत्यादि' हे शब्द मराठी भाषेत प्रायशः व्यंजनान्त न लिहितां शेवटील